Jeevandeep college goveli
Jeevandeep Arts, Science and Commerce College Goveli,Khardi and Mhasa
02/05/2025
"MAHARASHTRA DAY CELEBERATION"
29/04/2025
राज्यस्तरीय ऑनलाइन काऊंटडाऊन योगा कार्यक्रम
जीवनदीप महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन , मुंबई विद्यापीठ , राष्ट्रीय सेवा योजना विभाग, जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली, एस एस टी महाविद्यालय उल्हासनगर, आणि आरोग्य योगा अँड नेचरोपथी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दिनांक ३ मे ते २१ जून २०२५ दरम्यान ऑनलाइन योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे . तरी सर्वांनी खालील लिंक द्वारा नावनोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे .
श्री. रवींद्र घोडविंदे
( अध्यक्ष जीवनदीप शै. संस्था)
International Day of Yoga 2025 Participant Enrollment Form Govt. of Maharashtra, Higher and Technical Education Department Organized by: University of Mumbai, National Service Scheme Host Colleges: Jeevandeep College of Arts, Commerce and Science and SST College of Arts and Commerce, Ulhasnagar Conducted by: Arogya Yoga and Naturopathy Institute and Jeevan....
25/04/2025
15/04/2025
जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली . भूगोल विभाग व गोसेवा गतिविधि कल्याण जिल्हा आयोजित शुक्रवार दि.11/04/2025 रोजी मान्सून पूर्व शेतकरी मेळावा व कार्यशाळा [सेंद्रिय शेती ,गोशाळा व्यवस्थापन व शेतीचे उत्पादन व वितरण]. आमच्या महाविद्यालयात संपन्न झाले.या कार्यशाळेमध्ये मुरबाड व कल्याण विभागातील सरपंच व शेकडो शेतकऱ्यांनी आपली हजेरी दर्शवली व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेती विषयी असलेल्या समस्या, जीवन अमृत प्रकल्प तसेच सेंद्रिय शेती, गोशाळा व्यवस्थापन व शेतीचे उत्पादन व वितरण या संदर्भात मार्गदर्शक तज्ञ मा .श्री. हरी ओमजी शर्मा संयोजक- कोकण प्रांत गोसेवा गतिविधि , डॉक्टर विनोद रायकर- माजी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन ठाणे, श्री .कुमार जाधव - तालुका कृषी अधिकारी कल्याण जि. ठाणे ,श्री बाबासाहेब शिंदे- कृषी अधिकारी पंचायत समिती कल्याण ,त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी मा .श्री . किसनजी कथोरे साहेब - आमदार मुरबाड विधानसभा व कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे संस्थापक श्री. रविंद्र घोडविंदे सर , संचालक प्रशांत घोडविंदे व आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य .के.बी. कोरे सर व उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे सर यांच्या संकल्पनेतून आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालय परिसरातील शेतकऱ्यांना मान्सून पूर्व शेतीची तयारी कशी करावी व त्या संदर्भात काही समस्या यांचे तंतोतंत मार्गदर्शन तज्ञांनी केले. जीवनदीप महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.विजय हेरोडे सर व सहाय्यक प्राध्यापक राजू धसाडे सर तसेच कार्यक्रम नियोजनासाठी गठीत केलेल्या समितीने मोलाचे कार्य केले. या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे खूप खूप धन्यवाद !!!
15/04/2025
जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली .
राष्ट्रीय सेवा योजना विभाग
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्सवात साजरा
आज सोमवार दि.14/04/2025 भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वा जयंती महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. या जयंती निमित्ताने आनंद अनाथ आश्रम म्हस्कल येथे शैक्षणिक साहित्य या मध्ये पेन,पेन्सिल, वही , कोलगेट, व खाऊ चे वाटप करण्यात आले. अशा गरजू विद्यार्थ्याना मदत करून भीम जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र घोडविंदे सर , संचालक प्रशांत घोडविंदे , महाविद्यालयाचे प्राचार्य . डॉ. के.बी. कोरे व उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे तसेच सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन व सहकार्य भेटले. या कार्यक्रमाला NSS चे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश धनगर व NSS चे स्वयंसेवक उपस्थित होते.
26/10/2024
AICTE BMS Admission started for Academic Year 2024-25.
14/08/2024
शां. घो. कला, विज्ञान आणि गो. प. वाणिज्य महाविद्यालय शिवळे, मुरबाड येथे पार पडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५७ व्या युवक महोत्सवाच्या झोन क्र. ०६ च्या झोनल फेरी मध्ये जीवनदीप महाविद्यालय गोवेली च्या विद्यार्थ्यांनी मिळविले विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश...
दि.१३ ऑगस्ट, २०२४ रोजी शां. घो. कला, विज्ञान आणि गो. प. वाणिज्य महाविद्यालय शिवळे, मुरबाड येथे मुंबई विद्यापीठाच्या युवक महोत्सवाची झोन क्र. ०६ ची झोनल फेरी पार पडली.
या मध्ये जीवनदीप महाविद्यालय गोवेलीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत असे यश संपादन केले. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे...
१) 1st Rank - Classical Insturmental (Percussion) Solo: ताल वाद्य - सुमुख तेरेदेसाई - SYBMS
२) 1st Rank - Natyasangeet Vocal Solo - नेहा केणे - SYBA
३) 3rd Rank - Indian Light Vocal Solo - नेहा केणे - SYBA
४) Consolation - मेहंदी - साक्षी मोहिते - TYBA
५) 1st Rank - Indian Group Song -
१) नेहा केणे - SYBA
२) प्रिती महाले - SYBAF
३) अंकिता विशे - M. Com - Part - l
४) प्रियंका तिखे - FYBAMMC
५) निकिता शेळके - FYBMS
६) हर्षद केमारे - FYBSC IT
६) 2nd Rank - Skit Group A (Marathi) -
१) ओमकार भोईर - TYBCOM
२) विनय गायकर - TYBCOM
३) भूषण मिरकुटे - FYBAMMC
४) सानिका भोईर - SYBMS
५) दिपाली तरे - SYBCOM
६) हर्षला शेलार - SYBA
७) 3rd Rank - Indian Folk Dance
१) रोहन कांबळे - TYBA
२) योग पाटील - SYBA
३) चेतन वाडगे - FYBSC
४) योगेश लहांगे - FYBA
५) प्रतिज्ञा राऊळ - TYBMS
६) वैष्णवी मेस्त्री - TYBMS
७) राजनंदिनी लांजेवार - SYBA
८) सानिका बाबर - FYBMS
एकूण ०७ स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यासाठी श्री. गणेश केमारे सर, श्री. कमलेश रोहणे सर, श्री. तुषार शिरसाट सर, श्री. उत्कर्ष जाधव सर यांचे Accompanist म्हणून Music Event आणि Dance Event साठी तसेच Choreographer म्हणून Theatre Event साठी श्री. नितेश डोंगरे सर तर प्रा. महेश थोरात सर यांचे Dance Event साठी विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महेश थोरात सर, प्रा. विजय सोनार सर (सदस्य), प्रा. अपर्णा जाधव मॅम (सदस्य), प्रा. कल्पेश आहेर सर (सदस्य) उपस्थित होते.
जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्र घोडविंदे सर, संचालिका मा. सौ. स्मिता घोडविंदे मॅम, संचालक मा. श्री. प्रशांत घोडविंदे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे सर, उपप्राचार्य प्रा. हरेंद्र सोष्टे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन तथा सहकार्य लाभले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील सहकार्य लाभले.
एकूणच सर्वांच्या सहकार्यामुळे आणि सांस्कृतिक विभाग व विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आपल्या महाविद्यालयाला विविध स्पर्धांमध्ये घवघवीत असे यश संपादन करता आले.
23/03/2024
दिना २३-०३-२४ रोजी, जीवनदीप कॉलेज गोवेली अंतरगत पंचायत समिती कल्याण (आशा दिवस साजरा)
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
At Goveli Kalyan Murbad Road
Kalyan
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
10/10/2024