01/05/2023
महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन निमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वीरांना, हुतात्म्यांना अभिवादन.
राकट देशा, कणखर देशा, महाराष्ट्र देशा!
भारतातील सर्वात कृतिशील व प्रगती पथावर अग्रेसर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिन. १०६ हुतात्म्यांचा बलिदानानंतर आजचा हा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येऊ शकला. या महाराष्ट्राच्या भूमीसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या हुतात्म्यांना त्रिवार वंदन! त्यांच्या असीम त्याग,समर्पणातून आधुनिक महाराष्ट्र उभा राहिला. भाषिक स्वातंत्र्य, मराठी अस्मिता जागृत ठेवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा अभूतपूर्वच राहिला आहे.
#सर्व_नागरिकांना_महाराष्ट्र_दिनाच्या_आणि_कामगार_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा!
14/04/2023
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती.
१४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
03/01/2023
"झेलूनिया अंगावरती
शेना मातीची घान
दिले विद्येचे ज्ञान
लेकी कराया सज्ञान "
प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रसार करुन ज्ञानाच्या प्रकाशाने स्त्रियांचे आयुष्य तेजोमय करणाऱ्या, #ज्ञानज्योती_सावित्रीबाई_फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
15/10/2022
#अर्पितम्_सामाजिक_सेवा_संस्था" व " #आपलं_कल्याण" फेसबुक आपल्यासाठी घेऊन आले आहे, #निःशुल्क_रोजगार_प्रशिक्षण आणि #नोकरीची_सुवर्णसंधी.
#मॅजिक_बस_इंडिया_फौंऊडेशन' आयोजित रोजगार प्रशिक्षण उपक्रम.
18 ते 25 वयोगटातील इच्छुक तरुण तरुणींनी खाली दिलेल्या क्रमांक अथवा पत्यावर संपर्क साधवा.
सागर- 8452929492, हर्ष- 8425870851
अविनाश- 7276717037, मुस्कान- 8237991159
*सदर प्रशिक्षण हे पूर्णतः मोफत असून कुठल्याही प्रकारचे शुल्क, रजिस्ट्रेशन फी आकारली जाणार नाही.
"अर्पितम " सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य होण्यासाठी खालील लिंक वर अर्ज करा.
अधिक माहितीसाठी किंवा काही अडचणी, तक्रार असल्यास संपर्क साधावा. 9112862693
https://forms.gle/XsEDwfctai9NJVLc8
02/10/2022
|
जगाला अहिंसा,सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!
24/09/2022
★★★ सदस्य नोंदणी सुरू★★★
#अर्पितम्_सामाजिक_सेवा_संस्था" महाराष्ट्र राज्य -
#सदस्य_नोंदणी_ऑनलाईन_अर्ज
* सध्या फक्त कल्याण शहर क्षेत्रासाठी मर्यादित.
खालील लिंक वर क्कि करुन संपुर्ण अर्ज भरावा. ->
https://forms.gle/XsEDwfctai9NJVLc8
अर्पितम् सामाजिक सेवा संस्था ही सामाजिक संस्था (NGO)आहे . या संस्थेचा कोणताही राजकीय पक्ष अथवा व्यक्ती यांच्याशी संबंध नाही. यात शासकीय कर्मचारी,अधिकारी, नोकरदार, कोणत्याही समाजाचा किंवा धर्माचा व्यक्ती जुडून सामाजिक कार्यात संस्थेला मदत करू शकते.
ही संस्था राष्टीयस्तरीय सरकारमान्य नोंदणीकृत आहे. संस्थाशी जोडून आपण सध्या कल्याण शहर क्षेत्रात सामाजिक कार्य करू शकता. समाज जर एकत्रित आला तर संघटनेच्या माध्यमातून आपण विविध योजना राबवू शकतो तसेच सामाजिक सम्यस्या सोडवू शकतो .
आपल्या सामाजिक कार्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन करून त्यांचामार्फत सामाजिक समस्या सोडविल्या जाऊ शकतात.
"अर्पितम् सामाजिक सेवा संस्थेची सदस्य नोंदणी सुरु आहे.
संस्थेने समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरुवात केली. जसं की, गरिबांना अन्न पुरविणे, अशिक्षित गरीब लोकांना शिक्षण देणे, गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे, अनाथ मुलांना शैक्षणिक सामुग्री वाटप करणे, महिलांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न, जलसंधारणासाठी काम करणे, प्रदूषण रोखण्यासाठी उपयोजना करणे, आदिवासींच्या समस्यांसाठी कार्य करणे, आजारपण जगणार्या लोकांसाठी कार्य करणे, वृद्ध आणि अनाथ मुलांना आधार देणे, स्वछता अभियान राबविणे, महिलांची सुरक्षा व सबलीकरण, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान राबविणे, रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य शिबीर व औषध वाटप मोहिम राबविणे, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेणे, रोजगारविषयक मार्गदर्शन शिबीर, स्वरोजगार निर्मीती कार्यक्रम, शासकीय मोहीम, वृक्षरोपण कार्यक्रम,पर्यावरण संरक्षण व संवर्धन, जनजागृती मोहीम व इतर अनेक उपक्रम यासारखे कार्य करण्यासाठी. तुम्हा सर्वांसाठी खुला ज्ञानमंडप आहे. ज्यात तुमच्या विचारांना, अनुभवांना खुलं आभाळ मिळणार आहे.
......संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यास इच्छुक युवक किंवा युवती स्वेछेने समाजासाठी काम करू शकतात अश्या बंधु भगिनींनी या नव्या प्रवासाचे सोबती होण्यासाठी सदस्य नोंदणी करून घ्या.
चला तर मग आपण सर्व मिळून या कामात सहभागी होऊया आणि अनाथ,गरजवंताना मदत करूया..🏃♀
अधिक माहितीसाठी संपर्क :
9112862693
सभासद नोंदणी अर्ज Membership Registration Application
* ( अर्ज फक्त कल्याण शहरातील रहिवाश्यांनी करावा. ) ( Only residents of Kalyan City should apply. )
13/07/2022
पहिला नमस्कार परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनविली.🙏
दुसरा नामस्कार आई वडिलांना ज्यांनी जन्म दिला.🙏
तिसरा नमस्कार गुरुवर्यांना ज्यांनी विद्या दिली.🙏
चौथा नमस्कार आपणा सर्वांना ज्यांच्यामुळे या जगण्याला अर्थ मिळाला व आयुष्यात खूप काही शिकविले.🙏
||गुरुपौर्णिमा||
निमित्त सर्वांना वंदन व शुभेच्छा... 💐💐💐🙏🙏🙏
02/11/2021
ज्यांचा चेहरा उटण्यापेक्षा शिकवलेल्या मुलांना समजल्याने उजळतो,
अंगणातील दिव्यांपेक्षा मुलांचे भविष्यातील यश भावते,
नव्या कपड्यांपेक्षा नविन संकल्पना समजाऊन देणे आवडते.
फटाक्यांच्या आतिषबाजी पेक्षा उत्तराची आतिषबाजी ज्यांना आवडते,
ओवाळणी पेक्षा विद्यादानाची ज्यांना आवड असते.
आणि फराळापेक्षा सुद्धा ज्याला पिढी घडवण्याची भूक असते.
अश्या सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनींना दिवाळीच्या खूप सा-या शुभेच्छा.
शिक्षक कट्टा
माझी शाळा - माझी यशोगाथा !
05/09/2021
अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या,
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...