10/07/2026
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष प्रॅक्टिकल परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण
भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा यशस्वीरित्या व सुरळीत पार पडली.
या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, तसेच सर्व निर्देशक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केलेले नियोजन, मार्गदर्शन आणि सहकार्य याबद्दल संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
तसेच प्रॅक्टिकल परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व शासकीय आयटीआयच्या प्राचार्य, सर्व स्टाफ आणि परीक्षक यांचेही संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना आगामी सीबीटी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!