01/03/2023
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मास्टर्स कंप्युटर अकॅडमी MKCL यांच्या वतीने आयोजित विभाग स्तरीय प्रशमंजुषा चे उद्घाटन सुधागड विद्या संकुल चे इंग्रजी माध्यम कळंबोली येथे पार पडले.या प्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापक सौ. छाया विजापूरे मॅडम अणि त्यांचे सहकारी शिक्षक वर्ग उपस्थित होते. इंग्रजी माध्यममधील सुमारे 7०० विद्यार्थ्यांनी यात सहभागी घेतला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा मुख्याध्यापक, सह शिक्षक, तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या प्रश्न मंजुषा स्पर्धेचा निकाल शाळा निहाय दिनांक 10 मार्च रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात येईल व शाळेतील प्रथम तीन क्रमांकाचे विशेष प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येईल.