Shri Swami Samarth Vidyamandir, Kagal

Shri Swami Samarth Vidyamandir, Kagal Primary school at Kagal run by Kagal Taluka Kala Krida Shaikshanik sanskrutik Mandal

श्री रामलिंग बाल विकास मंदिर मध्ये चिमुकल्या श्री कृष्ण व राधा सोबत दहिहंडी मोठया उत्साहात साजरी.
08/09/2023

श्री रामलिंग बाल विकास मंदिर मध्ये चिमुकल्या श्री कृष्ण व राधा सोबत दहिहंडी मोठया उत्साहात साजरी.

श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथे आज गोपाळकाला निमित्त बालगोपाळांची दहीहंडी स्पर्धा घेण्यात आ...
08/09/2023

श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथे आज गोपाळकाला निमित्त बालगोपाळांची दहीहंडी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता 1ली ते 4थी वर्गांमध्ये स्पर्धा लावण्यात आल्या. राधा कृष्ण वेशात सर्व वर्गातील मुले खूपच सुंदर तयार होऊन आली .त्याचबरोबर हंडी सजवणे उपक्रमाला देखील भरपूर प्रतिसाद मिळाला. संदेशात्मक हांड्या मुलांनी तयार केल्या व त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले प्रदर्शन पाहण्यासाठी मुलांचा व पालकांचा भरपूर सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पाटील मॅडम यांनी दहीहंडी या पारंपारिक सणाविषयी माहिती सांगितली. पालकांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करण्यात आले. मुलांची उत्कंठा वाढवणारा दहीहंडीचा खेळ सुरू झाला. मुलांच्या बरोबर मुलींनीही दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.शेवटी मुलांना, पालकांना सुंटवडा वाटप व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले .

श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथील मुलांनी कार्यानुभव विषयांतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्...
08/09/2023

श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथील मुलांनी कार्यानुभव विषयांतर्गत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू सुंदर सुंदर बासुरी बनवली.

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल येथे*दहीहंडी*सजविणे स्पर्धादहीहंडी च्या हंडीवर सामाजिक संदेश असणारी वाक्ये.
08/09/2023

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल येथे*दहीहंडी*सजविणे स्पर्धा
दहीहंडी च्या हंडीवर सामाजिक संदेश असणारी वाक्ये.

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त ,वसाहत कागल .                                 आज दिनांक 5/9/2023 रोजी डॉ. सर...
05/09/2023

श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर प्रकल्पग्रस्त ,वसाहत कागल .

आज दिनांक 5/9/2023 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस,शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यासाठी इ. ४ थी मधील विद्यार्थ्यांनी सकाळपासून ज्ञानदानाचे काम केले. परिपाठापासून सर्व नियोजन आजच्या शिक्षकांनी केले. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केसरकर मला यांनी केले. इयत्ता पहिली ते चौथी मधील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे भाषण केले. सौ आंबी मॅडम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग कथन केला. दळवी मॅडम यांनी राधाकृष्णन यांचा जीवन परिचय सांगितला. अध्यक्ष भाषणामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगिता पाटील मॅडम यांनी शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरावी . व शिक्षकांचे बदलते रूप विशद केले . विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर भेटकार्ड तयार करून व पुष्प देऊन गुरूंना वंदन केले.

02/09/2023
सूर्ययान आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण.          श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथील विद्यार्थ...
02/09/2023

सूर्ययान आदित्य L1 चे यशस्वी प्रक्षेपण.
श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल येथील विद्यार्थ्यांनी सूर्ययान आदित्य L 1 चे यशस्वी प्रक्षेपण लाईव्ह बघण्याचा आनंद घेतला. व एकच जल्लोष केला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील मॅडम यांनी मुलांना भारतीय शास्त्रज्ञांच्या या महत्वपूर्ण कामगिरीविषयी माहिती दिली.

02/09/2023
कागल तालुका कला, क्रीडा , शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल.    ...
02/09/2023

कागल तालुका कला, क्रीडा , शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ संचलित श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर प्रकल्पग्रस्त वसाहत कागल.
आज दिनांक 30/8/2023 रोजी श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कागल या शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला.यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशात उपस्थित राहिले. शाळेतील सर्व मुलींनी रक्षाबंधन कार्यशाळेत तयार केलेल्या राख्या मुलांना बांधल्या व हा आपला पारंपरिक सण साजरा केला . कार्यक्रमाचे फलक लेखन दळवी मॅडम यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पाटील मॅडम यांनी मुलांना रक्षाबंधन सणाची माहिती सांगितली . सौ आंबी मॅडम यांनी मुलांची बैठक व्यवस्था सांभाळली . केसरकर मॅडम यांनी मुलांना गोड खाऊचे वाटप केले. अतिशय भावनिक व संगीतमय वातावरणात कार्यक्रम पार पडला.

Address

Kalammawadi Vasahat
Kagal
416216

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7am - 12pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Swami Samarth Vidyamandir, Kagal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category