Late S.R.Tambe Library

Late S.R.Tambe Library The library like all vibrant and productive organizations, strives to keep pace with a global, dynam

17/08/2026
14/08/2026
वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम बी खंदारे हे शासकीय नियमानुसार नियत वयोमानानुसार ...
03/08/2026

वाणिज्य विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक आणि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ एम बी खंदारे हे शासकीय नियमानुसार नियत वयोमानानुसार 31 जुलै 2026 रोजी आपल्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले . त्यांच्या पुढील वाटचालीस महाविद्यालयाच्या d ग्रंथालय विभागाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा .

डॉ. मुकिंदा खंदारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्नhttps://dhunt.in/15876LBy महाराष्ट्र जनभूमी via Daily...
01/08/2026

डॉ. मुकिंदा खंदारे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
https://dhunt.in/15876L

By महाराष्ट्र जनभूमी via Dailyhunt

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतू...

Lecture on व्यसनमुक्ती, Posco and traffic rules by PSI Shri Yuvraj Jadhav AND PSI Shri Sandeep aamne from OTUR police st...
25/07/2026

Lecture on व्यसनमुक्ती, Posco and traffic rules by PSI Shri Yuvraj Jadhav AND PSI Shri Sandeep aamne from OTUR police station

'Introduction to AI' lecture given by Shri Amol Ande Deputy GM SKF India private limited on 18th of July 2026
25/07/2026

'Introduction to AI' lecture given by Shri Amol Ande Deputy GM SKF India private limited on 18th of July 2026

स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त युनिकेअर हेल्थ सेंटर, पुणे यांच्या वतीने *आरोग्य जनजागृती* या विषयावर ...
24/07/2026

स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त युनिकेअर हेल्थ सेंटर, पुणे यांच्या वतीने *आरोग्य जनजागृती* या विषयावर शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी 'मार्गदर्शन व निदान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

22 & 23 July 2026
24/07/2026

22 & 23 July 2026

*स्वर्गीय अजित दादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय, ओतूर येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न* ...
24/07/2026

*स्वर्गीय अजित दादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय, ओतूर येथे उत्साहात कार्यक्रम संपन्न*

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय अजित दादा पवार साहेब यांच्या जयंती निमित्ताने अण्णासाहेब वाधीरे महाविद्यालय, ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे 22 व 23 जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसीय कार्यक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य मा . प्रा डॉ छायाताई तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांतजी डुंबरे, पंचायत समिती जुन्नर चे माजी सभापती विशालजी तांबे, सामाजिक कार्यकर्ते श्री जयप्रकाशजी डुंबरे, आणि सोनलजी डुंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एन शिरसाठ, उपप्राचार्य डॉ के डी सोनावणे प्रा ए एल बनसोडे, शिक्षक शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माननीय प्राचार्य डॉ आर एन शिरसाठ यांनी प्रास्ताविकात मा . अजितदादा पवार यांच्या कार्याचा व समाजसेवेचा आढावा घेतला . त्यांनी सांगितले की, माननीय अजितदादांनी महाराष्ट्राच्या विकासात अत्यंत मोलाचे योगदान दिलेले असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प राज्यात यशस्वीरित्या राबविण्यात आले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ एन एच हांडे, प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ के डी सोनावणे तर आभार प्रदर्शन प्रा ए एल बनसोडे यांनी केले .

सदर कार्यक्रमाची सुरुवात 22 जुलै 2026 रोजी करण्यात आली . सदर दिवशी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व प्लॅस्टिक संकलन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . सदर सर्व स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत हरित भारत, पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन संवर्धन, निसर्ग वाचवा जीवन वाचवा, आणि मुलगी वाचवा मुलगी शिकवा या विषयावर अत्यंत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. विद्यार्थ्यांच्या कलाकृती मधून सामाजिक संदेश प्रभावीपणे व्यक्त झाला. सदर स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली होती. तसेच सदर रांगोळी स्पर्धेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयातून संचिता हरिभाऊ खंडागळे, शर्वरी भगत व तनिष्का प्रवीण पाटील या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक, गायकवाड अनुष्का संपत आणि बांगर दिव्या शांताराम या विद्यार्थिनींनी दुसरा क्रमांक आणि श्रावणी योगेश हाडवळे, पायल अशोक मुंडे, श्रुती अर्जुन डुंबरे या विद्यार्थिनींचा तिसरा क्रमांक आला.
कनिष्ठ महाविद्यालयातून हांडे अक्षरा विकास व सहकारी ह्यांचा प्रथम क्रमांक,पोर्णिमा गौतम धोत्रे आणि सहकारी यांचा द्वितीय क्रमांक आणि वैष्णवी प्रवीण काळे आणि सहकारी यांचा तृतीय क्रमांक आला.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण शिक्षण, विज्ञान, राष्ट्रप्रेम, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता या विषयाचे आवड निर्माण करण्याकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन हे सामाजिक कार्यकर्ते मा . जय प्रकाशजी डुंबरे यांच्या शुभहस्त करण्यात आले व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या सर्व चित्रांचे पाहणी करून विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्राबद्दल त्यांचे कौतुक केले .

वकृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या कार्याचा आढावा घेताना शिक्षण, ग्रामीण विकास, पर्यावरण संरक्षण आणि युवकांच्या जबाबदाऱ्यावर प्रभावी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली . सदर वकृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पवार जयेश आणि मोरे मधुरा यांनी मिळवला त्याचबरोबर मुठे अपूर्वा, आमले कृती का ह्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक व ढमाले वेदांत आणि बेनके अर्णव यांनी तृतीय क्रमांक मिळवला . सदर परीक्षेमध्ये परीक्षक म्हणून डॉ अंबावणे डॉ रसाळ यांनी काम पाहिले .

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक यांनी महाविद्यालय परिसरामध्ये असणाऱ्या सर्व प्लास्टिकचे संकलन करून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमातून प्लास्टिक मुक्त परिसर घडविण्याचा संकल्प सर्वांनुमते करण्यात आला. सदर प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित होते .

23 जुलै 2026 रोजी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . त्याचबरोबर एक विद्यार्थी एक वृक्ष हरित भविष्यासाठी एक संकल्प मांडण्यात आला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करणे, जैवविविधतेचे संवर्धन करणे इ . संकल्पना अधिक बळकट करणे हा होता. कार्यक्रमाच्या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रा डॉ छायाताई तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, माजी पंचायत समिती सभापती विशालजी तांबे आणि सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश डु बंरे आणि सोनल डुंबरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

पर्यावरण जनजागृती करिता चालण्याच्या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते . सदर स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक वाहतुकीचा प्रसार, इंधन बचत आणि प्रदूषण मुक्त समाजाचा संदेश देण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर स्पर्धेमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेमध्ये मुलांमध्ये तुषार फुलमाळी प्रथम, साहिल चौधरी द्वितीय, आयोग गाडेकर तृतीय तर मुलींमधून दूर्वा लंबे प्रथम, दिव्या पराड द्वितीय, नम्रता दुर्गुडे तृतीय आणि शिक्षिका न मधून प्रा स्वप्नाली दांगट प्रथम, प्रा पोखरकर मॅडम द्वितीय आणि प्रा कुलकर्णी मॅडम तृतीय क्रमांक पटकावला .

स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 व 23 जुलै रोजी महाविद्यालयात पार पडलेले सर्व उपक्रम हे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व पटवून देणे, प्लास्टिक मुक्त परिसर आणि स्वच्छ भारत अभियानास चालना देणे यासाठी करण्यात आले होते .

Address

Junnar
412409

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late S.R.Tambe Library posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Late S.R.Tambe Library:

Shortcuts

Share