S.B.P.Vidyalaya, Junnar

S.B.P.Vidyalaya, Junnar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S.B.P.Vidyalaya, Junnar, Education, junnar, Junnar.

29/09/2024
22/05/2024

शिक्षणाची पवित्र ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविणाऱ्या जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेला आज बुधवार दिनांक २२ मे २०२४ रोजी ८९ वर्षे पूर्ण होऊन आपली शिक्षणसंस्था आज ९०व्या वर्षात पदार्पण करीत आहे.महान शिक्षण तपस्वी गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस (नानासाहेब)यांनी दिनांक २२/०५/१९३५ रोजी जुन्नर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.१९३५ ते २०२४ या ९० वर्षांच्या कालावधीत शेकडो,हजारो विद्यार्थ्यांच्या पिढ्या व त्यांचे आयुष्य घडवणाऱ्या या परमपवित्र ज्ञानसंस्थेला सन्मान पूर्वक मानाचा त्रिवार मुजरा🙏🏻🙏🏻🙏🏻..

Let's join our Facebook group...
27/11/2023

Let's join our Facebook group...

18/08/2023

स्वच्छता दूत ही संकल्पना सध्या शाळेत राबविली जात आहे. त्यात आलेला अनुभव कथन करताना माझ्या वर्गातील विद्यार्थी

शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यशजुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील त...
18/07/2023

शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे अशी माहिती मुख्याध्यापक श्री विकास बेल्हेकर यांनी दिली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रज्योत दीपक साळवे व कार्तिकी शरद मनसुख यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अवनी निलेश काशिद हिने जिल्हा गुणवत्ता स्थान यादीत स्थान मिळवले.
या विद्यार्थ्यांना विनायक रावळ, विवेक गुंड, स्मिताली चव्हाण संपदा डुंबरे, श्वेता चौगुले, हेमंत वर्पे, अविनाश कडाळे, जयश्री गोपाळे व वर्षा बनकर यांनी मार्गदर्शन केले.

-: अविस्मरणीय स्मृतीदिन:-सर्वांना नमस्कार! गेले काही दिवस दोन महिन्यापासून शेटे कुटुंबीय आमच्या संपर्कात होते, मीनाशेटे ...
13/11/2022

-: अविस्मरणीय स्मृतीदिन:-
सर्वांना नमस्कार! गेले काही दिवस दोन महिन्यापासून शेटे कुटुंबीय आमच्या संपर्कात होते, मीना
शेटे यांचा एक दिवस फोन आला की तुम्ही शाळेत या संचालक मंडळात आहात का ? आम्हाला शाळेत
यायचे आहे आम्ही साधारण नोव्हेंबर महिन्यात येऊ, मी त्यांना विनंती केली की, नोव्हेंबर महिन्याच्या
पहिल्या आठवडयात शाळेला सुट्टी असेल, जर शक्य असेल तर तुम्ही दुसऱ्या आठवडयात या, तर ते
म्हणाले की आम्हाला पहिल्या आठवडयात यायचे नियोजन आहे, मी ठीक आहे म्हणालो, शाळा
दाखवण्याची व्यवस्था करतो एवढे बोलण झाले साधारण एक तारखेला मीनाताईंचा फोन आला की आम्ही
सर्वजण पाच तारखेला येत आहोत मी त्यांना म्हटले जरुर या शाळा दाखवण्याची व्यवस्था होईल.
०५ नोव्हेंबर २०२२ रोजी मी सकाळी विद्यमान आमचे संचालक, नितीन मेहता यांना फोन केला
की शेटे कुटुंबीय शाळेवर येत आहेत. आपण जाऊया, शाळेचे चेअरमन, श्री. धनेश शेठ संचेती यांच्याशी
सुध्दा बोलणे झाले. विद्यमान संचालक, श्री. आनंद सासवडे असे, आम्ही सर्व साडेदहा वाजता शाळेत
पोहोचलो. बरोबर साडेदहा वाजता माधुरीताई (उषा) शेटे यांची गाडी मुंबईवरुन आली त्यांच्या गाडीतील
सर्वांशी ओळख झाली. पुण्यावरुन दोन गाडया येणार होत्या नेहमीप्रमाणे चाकण मध्ये ट्रॅफिक मध्ये त्यांना
यायला उशीर झाला सर्वजण जवळजवळ बारा वाजता सर्वजण आले. सर्व शेटे कुटुंबांची ओळख होत
होती. आदरणीय आप्पा शेटे यांचे ही मुले पाच बहिणी आणि एक भाऊ, सर्वात मोठया, माधवी ताई त्या
१९६३ च्या बॅचच्या, नंतर कै. अरुण शेटे १९६४ ची बॅच, शैला ताई १९६५ ची बॅच, माधुरी ताई १९७१ बॅच,
नयन ताई १९७३ बॅच, मीना ताई १९७५ ची बॅच, माधवी ताई व शैला ताई यांनी आपल्या शाळेत शिक्षक
म्हणून सेवा केली आहे तसेच त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. खर तर शेटे कुटुंबीयांची ओळख होत
असताना असे जाणवले की आप्पांनी म्हणजे शेटे सरांनी जे संस्काराचे शिक्षण आपल्या मुलींना दिले आहे
ते त्यांनी पुढील पिढीस वारसांना दिले आहे. कै. अरुण शेटे यांच्या पत्नी, डॉ. मेधा ताई- एम. डी. पॅथॉलॉजी,
त्याची मुलगी ऋचा शेटे ती सुध्दा एम. डी. आणि मुलगा अमेय शेटे तो सुध्दा इंजिनिअर सुनबाई सुध्दा
एम. डी. तसेच सर्व आलेले जावई मुले, नातू हे सुध्दा अतिशय उच्चशिक्षित व सुसंस्कृत असे सर्व शेटे
कुटुंबीय पाच तारखेला शाळेत आले. सर्व शाळा फिरुन बघायला आम्ही सुरुवात केली. शंकरराव बुट्टे
पाटील शाळा, स्व. बन्सीलाल मोहनलाल मूकबधिर विद्यालय, मूकबधिर मुलांचे वसतिगृह, शंकरराव बुट्टे
पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय असे सर्व आम्ही पाहिले.
आम्ही सर्वजण शिक्षक खोलीमध्ये एकत्र आलो. सर्वजण स्थानापन्न झालो आणि कै. अरुण शेटे
यांच्या पत्नी डॉ. मेधा ताई यांनी पिशवीतून एक फोटो बाहेर काढला तो होता त्यांच्या पतीचा म्हणजे
कै. अरुण शेटे यांचा आणि त्यांनी सांगितले आज अरुण चा पहिला स्मृती दिन खरंतर आम्ही एकदम स्तब्ध
झालो आज ही मंडळी आपल्या पतीचा, आपल्या बाबांचा, आपल्या भावाचा पहिला स्मृती दिन बांबाच्या
आवडत्या शाळेत स्मृतींना उजाळा देण्यासाठी आली होती. खरंतर असा स्मृतीदिन या शाळेने पहिल्यांदाच
पाहिला असेल एका माजी विद्यार्थ्यांचे आपल्या शाळेवर एवढे प्रेम आहे की त्या कुटुंबाला असे वाटले की
त्यांना खरी श्रध्दांजली ही असेल की आपण सर्वजण आपल्या शाळेत भेटू. अतिशय वेगळया वातावरणात
सर्वजण आले होते. अरुण शेटे यांच्या मोठ्या भगिनी त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण वाटचाल सांगितली.
कै. अरुण शेटे शाळेत खूप हुशार होते त्यांना बऱ्याच स्कॉलरशिप पण मिळाल्या होत्या नंतर ते शिक्षणासाठी
पुण्यात गेले नंतर ते बीएआरसी मध्ये नोकरीला लागले हे करत असताना त्यांनी अनेक छंदही जोपासले जसे नाणी गोळा करणे, तिकीट गोळा करणे आणि माणस जोडणे हे सर्व आम्ही स्तब्ध होऊन ऐकत होतो,
केवढा मोठा माणूस! काय काय त्यांनी करुन ठेवले! आपल्या कुटुंबावर किती प्रेम केले सर्व जन
कुटुंबातील उच्चशिक्षित आहेत. त्याच्या पत्नीही अरुण बद्दल खूप छान माहिती सांगतात. त्यांनी अरुण
सरांनी शाळेवर केलेली कविता दाखवली, खरतर त्या दोघांनी समाजासाठी बरच काही केलय. अनेक
सामाजिक उपक्रमात या दोघांनी भाग घेतला आहे त्यांची कन्या ही आता संवाद नावाच्या एका सामाजिक
संस्थेशी जोडली गेलेली आहे. तर असे हे शेटे कुटुंबीय आपल्या लाडक्या भावाचा, बाबांचा व आपल्या
पतीचा पहिला स्मृतीदिन कै. अरुण शेटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आला होता. खरतर यानिमित्ताने हे
कुटुंब शाळेला काहीतरी जे शाळेला आवश्यक आहे ते देण्याची त्यांची इच्छा होती.
आम्ही त्यांना विनंती केली की आपण नवीन शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मिडीयम ची इमारत
व शंकरराव बुट्टे पाटील बी.एस्सी. आय.टी वरीष्ठ महाविद्यालय चा विभाग बघूया हे सर्वजण शंकरराव बुट्टे
पाटील इंग्लिश मिडीयम व शंकरराव बुट्टे पाटील बी.एस्सी. आय.टी वरीष्ठ महाविद्यालय विभाग
बघण्यासाठी आले. सर्वांनी परिसर बघितल्याबरोबर खूप आनंदीत झाले व खूप छान करताय तुम्ही
काळाप्रमाणे बदलताय तसेच आपण मुलांना उच्च शिक्षणाची पण सोय केलेली आहे.
आम्ही गेली चार तास एकत्र होतो पण कोणाचा पाय लवकर निघत नव्हता. सर्व आपल्या
आठवणीत रमत होते. सर्व शेटे कुंटुंबीय शाळेची शाळेतील जीवनातील प्रसंग आपल्या नातवांना मुलांना
सांगत होते. कै. अरुण शेटे यांच्या पत्नी डॉ. मेधा शेटे यांनी आम्हाला रु. २,००,०००/- (रुपये दोन लाख)
चा चेक दिला खरतर त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास दाखवला की मी हा चेक तुम्हाला जिथे योग्य गरज
वाटेल तिथे ही देणगी तुम्ही स्वीकारावी व अजून काही मदत लागल्यास सांगावे. तसेच ग्रंथालयासाठी जी
लागणारी पुस्तके आहेत ती आम्ही तुम्हाला देऊ करणार आहेत.
असा हा स्मृतीदिन आमच्या आयुष्यातला पहिलाच बघण्यातला की एका घरातल्या कुटुंबाकडून
प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या आवडत्या शाळेत सर्व कुटुंब आणि एकत्र येऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण करावी
असा अविस्मरणीय. जाताजाता त्यांनी आम्हाला एक सरस्वतीची फ्रेम त्यांच्या नातवाच्या म्हणजे कु.
अभिमन्यु च्या हस्ते भेट दिली. काय हा योगायोग आहे की ज्या घरात सरस्वती नांदत आहे त्यांच्या प्रत्येक
कुटुंबामध्ये सरस्वतीचे रुप दिसत आहे. अशा कुटुंबाकडून आम्हाला सरस्वतीचे फ्रेम मिळाली. खरतर
संस्थेमध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात. आपण काम उभ केल्यावर खरच ते बरोबर आहे
की नाही हे आपले विद्यार्थी किंवा आपल्या सारखे वरिष्ठ मार्गदर्शक आपली पाठ थोपटतात तेव्हा फार बरं
वाटत.
सर्व शेटे कुटुंबियांचे आम्ही सर्व संस्था चालक सदैव ऋणी आहोत.
-: भावरुपी शब्दांकन :-
राहुल रमण जोशी (गाजरे)
(माजी विद्यार्थी, विद्यमान कार्यकारिणी सदस्य )
सर्व कार्यकारिणी मंडळ सदस्य,
जुन्नर एज्युकेशन सोसायटी, जुन्नर

शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष  शरद मांड...
28/08/2022

शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ञ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शरद मांडे साहेब यांचे 21 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले.त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी दिनांक 27 ऑगस्ट 2022 रोजी शोकसभा घेण्यात आली.सदर प्रसंगी शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील,इयत्ता आठवी ,तुकडी/ ब .मधील विद्यार्थी,साई सचिन गिरी या विद्यार्थ्याने शरद मांडे साहेब यांची स्केच प्रतिमा तयार करून शोकसभेत त्यांच्या कुटुंबीयांना संस्थेचे अध्यक्ष ॲड.सुधीर ढोबळे उपाध्यक्ष, संजयशेठ बुट्टये पाटील ,कार्याध्यक्ष धनेश संचेती साहेब,सचिव ॲड.अविनाशजी थोरवे,यांच्या मार्फत व सर्वांच्या उपस्थितीत सुपूर्द केली,त्या प्रीत्यर्थ मांडे कुटुंबीयांनी साई चा यथोचित गौरव केला व त्याला बक्षीस म्हणून $ 51 अमेरिकन डॉलर्स इतकी रक्कम प्रदान केली.भारतीय चलन मूल्य ₹ 4080/- इतके आहे तसेच भारतीय चलन ₹.2000/- असे एकूण ₹ 6080/- रक्कम प्राप्त झाली आहे.मांडे कुटुंबीयांचे संस्था,शाळा, माजी विद्यार्थी संघाचे वतीने तसेच सर्वांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻

आज शाळेत हरितसेने अंतर्गत झाडांना राखी बांधण्यात आली. मुलीबरोबर मुलांनी पण यात उस्फुर्त सहभाग घेऊन राख्या बनवल्या आणि झा...
08/08/2022

आज शाळेत हरितसेने अंतर्गत झाडांना राखी बांधण्यात आली.
मुलीबरोबर मुलांनी पण यात उस्फुर्त सहभाग घेऊन राख्या बनवल्या आणि झाडांना बांधल्या

वृक्ष लागवड आणि संगोपन करून जनजागरण आम्ही करू
23/02/2022

वृक्ष लागवड आणि संगोपन करून जनजागरण आम्ही करू

Scouting  memories...
16/02/2022

Scouting memories...

Address

Junnar
Junnar
410502

Opening Hours

Monday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when S.B.P.Vidyalaya, Junnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category