New English School Nimgiri

New English School Nimgiri Our school is in tribal area and we are waiting for the better support which fulfill our students needs.

आज शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर हा दिवस विद्यालयामध्ये भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालद...
14/11/2025

आज शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर हा दिवस विद्यालयामध्ये भारत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजयकुमार लांडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील लिपिक ढोबळे सर व मुख्याध्यापक संजयकुमार लांडे सर यांनी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगितली. बाल दिनाचे औचित्य साधून इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा विद्यालयास सप्रेम भेट दिली त्या प्रसंगाचे काही क्षणचित्रे...

 #एक  #हात  #मदतीचामहाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील काही गावे ही महापूर आल्याने पाण्याखाली गे...
08/10/2025

#एक #हात #मदतीचा
महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील काही गावे ही महापूर आल्याने पाण्याखाली गेली होती. परिणामी शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावी म्हणून पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष श्री. तबाजी वाघदरे सर, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. अशोक काकडे सर Ashok Ashok Sukhadev Kakade सर सचिव श्री. संतोष हांडे यांनी जुन्नर तालुक्यातील मुख्याध्यापकांना मदतीसाठी आवाहन केले होते. एक हात मदतीचा म्हणून आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी न्यु स्कूल निमगिरी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करावे असे आवाहन विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री. संजयकुमार लांडे सर यांनी केले होते. सदरचे शैक्षणिक साहित्य प्रत्येक वर्गातील वर्ग प्रतिनिधीनी यांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापक श्री. संजयकुमार लांडे सर यांच्याकडे सुपूर्द केले. त्याप्रसंगी.....

आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची माहि...
08/09/2025

आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी विद्यालयामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजयकुमार लांडे सर यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रदीप साळू लांडे यांनी भूषविले. याप्रसंगी प्रदीप साळू लांडे यांनी 10 हजार रुपये किमतीचे विद्यार्थी उपयोगी साहित्य प्रत्येकी एक लिटरची स्टेनलेस स्टील वॉटर बॉटल व रायटिंग पॅड वाटप केले. माजी विद्यार्थी यांचा परिचय विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री केंद्र सर यांनी करून दिला या कार्यक्रमाच्या निमित्ताने निमगिरी गावचे लोकनियुक्त सरपंच विठ्ठल निंबा रढे व उपसरपंच श्री शंकर ज्ञानेश्वर साबळे उपस्थित राहून विद्यार्थांना मार्गदर्शन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार लांडे यांनी त्यांच्या मनोगतातून शिक्षक दिनाचे औचित्य सांगितले व विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्यांचे वाटप केल्याबद्दल प्रदीप लांडे यांना विद्यार्थ्यांच्या, विद्यालयाच्या व सह्याद्री विद्या विकास मंडळ नारोडी या संस्थेचे सचिवसन्माननीय श्री. चंद्रशेखर हुले यांच्यावतीने आभार व्यक्त केले.या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. या शिक्षक दिनाच्या निमित्ताने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले. तृप्ती गुलाब साबळे या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकाची भूमिका बजावली तर प्रणव साबळे,प्रशांत भांगले,प्रथमेश रढे,निखिल रढे,ऋतुजा लांडे,प्राची साबळे,अन्यना भालेराव, श्रुती साबळे या विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडली. शिपाई म्हणून तेजस रावते व शुभम उभे यांनी काम पाहीले.अध्यक्ष भाषणामध्ये प्रदीप लांडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देताना जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास यांचे महत्त्व व्यक्त केले. शिक्षण हे ध्येय निश्चित करून घेतले पाहिजे याकडे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका साबळे तर आभार प्रदर्शन सिद्धी साबळे हिने केले.

चाईल्ड फंड ऑफ इंडिया या संस्थेचे समन्वयक श्री. योगेश म्हसकरे ,श्री. बोऱ्हाडे, श्वेता वाघ व सुवर्णा साबळे  यांच्या प्रयत्...
26/08/2025

चाईल्ड फंड ऑफ इंडिया या संस्थेचे समन्वयक श्री. योगेश म्हसकरे ,श्री. बोऱ्हाडे, श्वेता वाघ व सुवर्णा साबळे यांच्या प्रयत्नाने संस्थेकडून विद्यालयातील इयत्ता 8 वी, 9वी व 10 वीतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी समृध्दी आय केअरच्या वैशाली शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष आढळून आला त्यांना उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार लांडे यांनी चाईल्ड फंड च्या सर्वांचेच शाल व पुष्प देऊन स्वागत केले.जेष्ठ शिक्षक श्री. केंद्रे सरांनी उपस्थितांचा परिचय करुन दिला.
आमच्या विद्यालयात येऊन विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केल्याबद्दल विद्यालयाच्या व सह्याद्री विद्या विकास मंडळ नारोडी या संस्थेचे सचिव सन्माननीय श्री. चंद्रशेखर हुले साहेब यांच्यावतीने चाईल्ड फंड ऑफ इंडिया या संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद!!!

न्यु इंग्लिश स्कूल निमगिरी विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात  आला.यावेळी निमगिरी ग्रामपंचाय...
15/08/2025

न्यु इंग्लिश स्कूल निमगिरी विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी निमगिरी ग्रामपंचायतचे सरपंच सन्मानिय श्री.विठ्ठल रढे,उपसरपंच सन्मानिय शंकर साबळे ,ग्रामपंचायत तरुण तडफदार सदस्य सन्मानिय Jalindar Sabale, प्रिति साबळे, ग्रामसेवक सन्मानिय Shravan Dighe, पोलिस पाटील सन्मानिय ताई साबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सन्मानिय राजाराम साबळे,आरोग्य उपकेंद्र निमगिरी सर्व कर्मचारी,जि.प.प्राथमिक शाळा निमगिरी मुख्याध्यापक सन्मानिय सतिश बुळे सर,गुणवंत केदारी सर व समस्त निमगिरी ग्रामस्थ उपस्थित राहीले. ग्रामस्थांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयकुमार लांडे यांनी केले. ध्वजकट्याचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजकट्याला सन्मानिय केरु रढे यांनी नारळ वाढला तर ध्वजारोहण सरपंच सन्मानिय श्री.विठ्ठल रढे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत, राज्य गीत व ध्वजगीत गाऊन ध्वजाला सलामी देण्यात आली.आभारप्रदर्शन सन्मानिय जेष्ठ शिक्षक Dnyaneshwar Kendre यांनी केले.

शुक्रवार दिनांक 8/8/2025 रोजी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी निमगिरी गावचे लोकनि...
09/08/2025

शुक्रवार दिनांक 8/8/2025 रोजी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी निमगिरी गावचे लोकनियुक्त सरपंच सन्मानिय श्री.विठ्ठल रढे व उपसरपंच श्री.शंकर साबळे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी ,शिक्षक व सरपंच यांनी मनोगत केले. प्रतिमा पुजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार लांडे सर ,सरपंच व उपसरपंच तसेच शिक्षक यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून प्रत्येकी एक बिस्किट पुडा देण्यात आला. इयत्ता 10 वीच्या वर्गाकडून बिरसा मुंडा याचा फोटो भेट देण्यात आला.सूत्रसंचालन श्री.केंद्रे सरांनी केले तर आभारप्रदर्शन ढोबळे सरांनी केले.कार्यक्रमाची व्यवस्था शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.राजू वाकचौरे व पटेल यांनी केली.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त  इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांकडून बिरसा मुंडा यांचा फोटो विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय...
08/08/2025

जागतिक आदिवासी दिनानिमित्त इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांकडून बिरसा मुंडा यांचा फोटो विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार लांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आज सोमवार दिनांक 04/08/2025 रोजी निमगिरी गावचे ग्रामस्थ व विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन्मानिय श्री. दत्तू बबन कोकणे यां...
04/08/2025

आज सोमवार दिनांक 04/08/2025 रोजी निमगिरी गावचे ग्रामस्थ व विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन्मानिय श्री. दत्तू बबन कोकणे यांच्या माध्यमातून MOUNTAIN MATES या संस्थेकडून विद्यालयास खेळाचे साहित्य (दोन बॅट व बॉल,दोन बॅडमिंटन संच, एक फुटबॉल व दोन भौमितिक साहित्य) वरील सर्व साहित्य सन्मानिय श्री. दत्तू बबन कोकणे यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार लांडे यांच्याकडे सुपूर्द केले.त्याप्रसंगी विद्यालयाच्या वतीने MOUNTAIN MATES चे समन्वयक म्हणून श्री.दत्तू कोकणे यांचा शाल देऊन गौरविण्यात आले. संस्थेने विद्यालयास केलेल्या सहकार्याबद्दल सह्याद्री विद्या विकास मंडळ संस्थेचे सचिव सन्मानिय श्री.चंद्रशेखर हुले साहेब व विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार व धन्यवाद!!!🙏🙏

आज शुक्रवार दिनांक 1ऑगस्ट रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती  साजरी  करण्यात आ...
01/08/2025

आज शुक्रवार दिनांक 1ऑगस्ट रोजी विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजयकुमार लांडे व जेष्ठ शिक्षक श्री.केंद्रे सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी प्रतिमा पुजन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा परिचय आपापल्या मनोगतातून व्यक्त केला व शिक्षकांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.केंद्रे सरांनी केले तर आभारप्रदर्शन ढोबळे सरांनी केले.त्याप्रसंगी....

Address

Junnar
410502

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School Nimgiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category