Pushpavati Vidyalaya, Dingore

Pushpavati Vidyalaya, Dingore Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pushpavati Vidyalaya, Dingore, School, dingore, Junnar.

आपल्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या काही क्षणचित्रे  ( सन २०२५-२६)
14/12/2025

आपल्या विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या काही क्षणचित्रे ( सन २०२५-२६)

आज पुष्पावती विद्यालयात  श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
27/08/2025

आज पुष्पावती विद्यालयात श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

🎯 *शिवजन्मभूमीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व....*        🪴 *उद्योजक डॉ. श्री मंगेशजी आमले.* 🪴[ *वेलॉक्स - या जागतिक दर्ज...
22/08/2025

🎯 *शिवजन्मभूमीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व....*

🪴 *उद्योजक डॉ. श्री मंगेशजी आमले.* 🪴
[ *वेलॉक्स - या जागतिक दर्जाचा सायबर सिक्युरिटी कंपनीचे चेअरमन.*]

शिवजन्मभूमीतील डिंगोरे गावात एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेला,खेडेगावात शिकलेला मुलगा ऑफिस बॉय ते एका जागतिक दर्जाचा कंपनीचा मालक असा थक्क करणारा जीवनप्रवास.!!! *श्री मंगेशजी आमले हे आज अनेक तरुणांसाठी आयडॉल बनले आहेत.* परिस्थितीशी दोन हात करत,जिद्द,मेहनत ,चिकाटी आणी प्रामाणिकपणाचा जोरावर,शिक्षण हेच आयुष्याच अंतिम ध्येय समजून,आयुष्याचा प्रत्येक टप्यावर शिक्षणाचा नवनवीन वाटा शोधत, स्वतःची वेगळी वाट निर्माण जागतिक पटलावर त्यांनी स्वतःला सिद्ध केल आहे.*आज इस्त्रो सारख्या जागतिक संस्थेला सुविधा पुरविण्याच काम शिवजन्मभूमीतील एक मराठमोळा उद्योजक करत आहे, हि नक्कीच अभिमानाची बाब आहे.* वेलॉक्स या भारतीय ब्रँड ने आज अनेक परदेशी कंपन्यांचा नाकात दम आणला आहे.ज्या सायबर सिक्युरिटीसाठी आपण भारतीय पश्चिमात्य देशाकडे जात होतो,तेच एका मराठी उद्योजकाने आपल्या कल्पक बुद्धीने भारतात बनवून दिले.....🇮🇳

अल्पभुधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणी साधं घरही नसलेल्या मंगेशजी यांचा वडिलांनी उदरनिर्वहासाठी शहाड याठिकाणी माथाडी कामगार म्हणून काम करून आपल्या मुलाचे शिक्षण सुरु केल,शहाड येथील काम गेल्यावर पुन्हा एकदा डिंगोरे येथे आपल्या जन्मगावी आल्यावर त्यांचे आई वडील रोज दुसऱ्याचा बांधावर कामाला जाऊ लागले.सुट्टीचा दिवशी मंगेशजी व त्यांचे भाऊ देखील रोजंदारीने दुसऱ्याचा शेतात कामाला जाऊ लागले.आई वडिलांचा कष्टाची जाण ठेवत मंगेशजी देखील शिक्षण हाच आपला तारणहार अस समजून,अभ्यासात प्रगती करत होते.अत्यंत हुशार असलेले मंगेशजी यांनी सुट्टीचा दिवशी दुसऱ्याचा शेतावर कामाला जात दहावीत फस्ट क्लास श्रेणित पास झाले.

मंगेशजी यांची कुशाग्र बुद्धी,आणी त्यांची अभ्यासातील प्रगती पाहून श्री डिंगोरकर यांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.मंगेशजी यांचासाठी ही खूप मोठी संधी होती.आणी त्याचं वेळी त्यांनी मनात ठरवलं की आपण या संधीच सोन करायचं.उच्च शिक्षण घेत असतानाच उदरनिर्वाहासाठी ते छोटी मोठी काम करू लागले,अगदी ऑफिस बॉय पासून जे मिळेल ते काम करत त्यांनी अर्थशास्त्र या विषयात पदवी संपादन केली.त्यानंतर त्यांना बीड जिल्ह्यातील एका साखर कारखान्यात नोकरी लागली, आणी पुढील तीन वर्ष त्यांनी त्याठिकाणी नोकरी केली,नोकरी करत असताना त्यांचं शिक्षण देखील सुरूच होत.मुळात नोकरी हे त्यांचं ध्येयचं नसल्याने त्यांच मन व्यवसायाकडे लागले होते,पण त्यासाठी पुरेसं भांडवल मिळावं म्हणून त्यांनी पुढील दहा वर्ष बँकिंग आणी इतर क्षेत्रात नोकरी करून भांडवलाची जुळवा जुळव केली,नोकरीतून आलेल्या थोड्या पैशातून धाडसाने त्यांनी व्यवसायात पदार्पण केल.*लोक ज्या वाटेने जातात,त्या वाटेने न जाता,आपली स्वतःची अशी वेगळी वाट निर्माण करायची.* या उद्देशाने त्यांनी *सायबर सिक्युरिटी* या अत्यंत वेगळ्या व्यवसायात धाडसी उडी घेतली.

स्वप्न पाहणं वेगळं,पण ते स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने त्याचा पाठपुरावा करून अंतिम यश प्राप्त करे पर्यंत न थांबता त्याचा पाठपुरावा करण वेगळं. *गावाचा घरात बसून जग जिकण्याचं त्यांनी जे स्वप्न पाहिलं होत,ते त्यांचा जिद्दीने,मेहनतीने आणी चिकाटीने त्यांनी आज प्रत्यक्षात आणलं आहे.*

🎯 *आयआयटी बॉम्बे मधून MBA,*

🎯 *विद्यापीठातून ईएमबीए,युरोपीयन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी मधून प्रोफेशनल डॉक्टरेट,*

🎯 *युरोपीयन युनिव्हर्सीटी मधून सायबर सिक्युरिटी मध्ये डी. लिट.*
या सारख्या पदव्या त्यांनी नोकरी व व्यवसाय करता करता संपादन केल्या आहेत.

दहा वर्ष नोकरी त्यानंतर वेलॉक्स या कंपनीची स्थापना करुण अल्पावधीतच हि कंपनी जागतिक पातळीवर एक ब्रँड बनली आहे.*आज या कंपनीचा माध्यमातून भारतातील दररोज दोन लाख कोटी रुपये सायबर सुरुक्षित करण्याचे काम ते करत आहेत.!!!* वेलॉक्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे जी सायबर सिक्युरिटी प्रोडक्ट तयार करते.या भारतीय कंपनीने जगातील अनेक कंपन्यानचा घाम काढला आहे. *जो हात एकेकाळी नोकरीसाठी कुणाकडे विनंती करत होता,त्याचं हाताने आज शेकडो तरुणांना रोजगार उपलब्ध करुण दिला आहे.*

*संपूर्ण जगभरात या कंपनीचे जाळे पसरले आहे अमेरिका, दुबई, मॅक्सिको, श्रीलंका,झिंबांबे ,बांगलादेश याठिकाणी ही भारतीय कंपनी मोठ्या दिमाखात आपला भारतीय ब्रँड चालवत आहे.* त्यांनी केलेल्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय ,अंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
🎯 *2019 रोजी दुबई सरकारचा वतीने त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.*

🎯 *गोवा सरकारचा वतीने मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केल.*

🎯 *जगविख्यात IIT या शैक्षणिक संस्थेने "दि इन्स्पायरर" हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.*

🎯 *ऑल इंडिया बिझनेस असोशिएशन दिल्ली यांचा "आत्मनिर्भर भारत - रतन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.*

🎯 *जगविख्यात मॅगझीनचा कव्हर पेजवर येण्याचा सन्मान त्यांना मिळाला.*

व्यवसायातून फक्त पैसा कमावण हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता,ज्या समाजात आपण राहतो,त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो,या सामाजिक बांधिलकीचा नात्यातून त्यांनी *वेलॉक्स फाउंडेशनची* स्थापना करुण त्यामार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.*कर्करोग रुग्णांसाठी मोफत उपचार करण्याचं महत्वाचं काम त्यांचा मार्फत केल जात.* लहानपणापासून असलेली वाचनाची आवड, त्यामुळे त्यांनी त्यांचा आवडीचा एक सामाजिक ,साहित्यिक उपक्रम सुरु केला आहे,*बुके नको ,बुक द्या.* या माध्यमातून ते चांगले विचार लोकांचा मनात रुजविण्याचे काम करत आहेत.

कष्टकरी पिता,संस्कारशील आई,लक्ष्मणासारखा पाठीशी उभा असलेला भाऊ,साहित्यिक मनाची,कर्तबगार जीवनसाथी आणी जगातील सर्वात सुंदर स्माईल देऊन थकवा दूर करणारी मूल या सर्वांचा पाठबळावर जग जिंकण्यासाठी निघालेल्या या माणसाचे पाय आजही जमिनीवरच आहेत.*आपली मातृभूमी,आपल्या मातीतील आपली माणसं यांच्याशी त्यांची नाळ आजही घट्ट विणली आहे.*

माझ्या तालुक्यात ,माझा शेजारी असा कुणी भूमिपुत्र आहे की,जो जागतिक पातळीवर आपल्या शिवजन्मभूमीच नावं रोशन करतोय आणी त्याचं कार्य आज पर्यंत आपल्याला माहित नसावं हे आमचं दुर्भाग्य आहे.*आपल्या तालुक्यातील भावी पिढीला हा प्रेरणादायी जीवनप्रवास माहिती करून दिला पाहिजे.* या कार्याची प्रेरणा घेऊन या भूमीतून भविष्यात अनेक मंगेश आमले तयार होतील.*जिथं पिकत, तिथ विकत नाही,* ही म्हण खरंच या जीवनप्रवासाने खरी वाटते.*श्री मंगेशजी आमले सर खऱ्या अर्थाने या शिवजन्मभूमीचे ब्रँड अबेसिटर आहेत.* जे जागतिक पातळीवर तालुक्याच नेतृत्व कारतात.*तालुक्यातील प्रत्येक शाळेने,महविद्यालयाने या व्यतिमत्वाचा जीवनप्रवास शालेय मुलांना माहिती करून देऊन त्यांचा व्याख्यनमाला आयोजित करून जागतिक पातळीवर असलेल्या शैक्षणिक व व्यवासायिक संधीची माहिती भावी पिढीला करून दिली पाहिजे.*

शिवजन्मभूमीतील या कोहिनुर हिऱ्याचा या संपूर्ण प्रेरणादायी जीवनप्रवासास माझा मानाचा सलाम....🙏

*संकलन*
*श्री पोपट नलावडे.ओतूर*
7977160815

एक पेड माॅं के नाम!!!
27/07/2025

एक पेड माॅं के नाम!!!

विद्यार्थींनींना मार्गदर्शन शिबीर
27/07/2025

विद्यार्थींनींना मार्गदर्शन शिबीर

पुष्पावती विद्यालय डिंगोरे येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माता-पितांचे पूजन करून त्यांच्याबद्दल आदर ,कृतज्ञता व्यक्त क...
11/07/2025

पुष्पावती विद्यालय डिंगोरे येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माता-पितांचे पूजन करून त्यांच्याबद्दल आदर ,कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

आज विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी होत असताना . इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांचं पद्य पूजन केले. आई वड...
10/07/2025

आज विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी होत असताना . इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांचं पद्य पूजन केले.
आई वडील हेच आपले पहिले गुरु असतात. या गुरूंबद्दल आदर व्यक्त करणे ,त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवणे हा या मागचा हेतू होता. आज अनेक माता पिता भावनिक झाले. माता पित्याच्या पूजनाने गुरुपौर्णिमा साजरी झाली!!

जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश जर्मनी असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारत...
09/07/2025

जगातल्या औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांपैकी एक देश जर्मनी असून तो युरोप खंडाच्या मध्यभागी आहे. जर्मनीमध्ये भारतासारखी संसदीय लोकशाही पद्धत असून त्याची प्रथम स्थापना १८७१ मध्ये झाली.या देशात आपल्याच मायभूमीतील तरुण पेट्रोलियम कंपनीत उच्चपदावर काम करीत आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत देशातील शिक्षण पद्धती
त्यांची जीवनशैली, सार्वजनिक मालमत्तेचा वापर ,याबाबत मार्गदर्शन!!!

आज दिनांक 3 जुलै 2025 रोजी पुष्पावती विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पालकांची शिक्षक पालक सहविचार सभा पार पडल...
03/07/2025

आज दिनांक 3 जुलै 2025 रोजी पुष्पावती विद्यालयात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या पालकांची शिक्षक पालक सहविचार सभा पार पडली.

पुष्पावती विद्यालय डिंगोरे....शाळेच्या आठवणी ..
28/06/2025

पुष्पावती विद्यालय डिंगोरे....शाळेच्या आठवणी ..

पुष्पावती विद्यालय डिंगोरे या ठिकाणी "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री योगाचार्य नारदीय कीर्तन...
22/06/2025

पुष्पावती विद्यालय डिंगोरे या ठिकाणी "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवयित्री योगाचार्य नारदीय कीर्तनकार डॉक्टर रश्मी घोलप यांनी मार्गदर्शन केले.

Address

Dingore
Junnar
412409

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pushpavati Vidyalaya, Dingore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category