Citu Aadivasi Shikshak Sanghatan

Citu Aadivasi Shikshak Sanghatan This page helping for giving information to all members.

11/12/2020
*आज गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी सीटू संघटनेची आयुक्त महोदयांसोबत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत दुपारी 2 ते 4...
11/12/2020

*आज गुरुवार दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी सीटू संघटनेची आयुक्त महोदयांसोबत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत दुपारी 2 ते 45 पर्यंत सविस्तर चर्चा झाली* ,त्यात खाली विषयावर अत्यंत आश्वासक सविस्तर चर्चा झाली.
*1. 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत* शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय प्रलंबित,शासनास प्रस्ताव पाठवणार.
*2. 50 लाखाचे विमा संरक्षण मिळणेबाबत व करोना उपचार कालावधी बाबत* 50 लाखाचे विमा बाबत शासन स्तरावर असून लवकरच त्याबाबत निर्णय येईल. तसेच करोना उपचार कालावधी हा कर्तव्य कालावधी असल्याचेच त्यांनी सांगितलं.
*3. शिक्षकांचे रजा रोखीकरण व पेन्शन व इतर लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच देणेबाबत*
सर्व अपर आयुक्त व po यांना त्याबाबत लेखी अवगत करून व प्रकल्प निहाय कॅम्प लावून 6 महिने आधीच सेवापुस्तके व सेवानिवृत्तीची कागदपत्र आद्यवत केली जातील व निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ दिला जाईल.
*4.शिक्षण सेवकांचे मानधन वाढवणेबाबत*
हा धोरणात्मक निर्णय असून ,शासनास मानधन वाढीबद्दल प्रस्ताव पाठवला आहे.
*5.ग्रंथपालांना दीर्घ सुट्टी मिळणे व वेतनातील तफावत दूर करणे व पदोन्नतीची संधी देणेबाबत*
दीर्घ सुट्टी शासन निर्णयानुसार देय नाही,वेतनातील तफावत व पदोन्नतीबाबत समिती गठीत करून सोडवले जाईल.
*6.प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विस्तार अधिकारी,पदवीधर शिक्षक,माध्यमिक शिक्षक वप्राथमिक मुख्याध्यापक पदी पदोन्नती देणे*
आढावा घेऊन पात्र शिक्षकांना संधी दिली जाईल.
*7.उच्च माध्यमिक शिक्षकांना पदोन्नतीची संधी देणं व 4+4=8 व्या पदाला मान्यता देणं व प्राथमिक व माध्यमिक उच्च अहर्ता धारण करणाऱ्या शिक्षकांना उच्च माध्यमिकला पदोन्नती देणेबाबत*
पदोन्नती बाबत शासनास प्रस्ताव पाठवलेला आहे,29 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयानुसार 8 व्या पदाला मान्यता बाबत सर्व अपर आयुक्त व po यांना पत्राद्वारे कार्यवाही करणेबाबत कळवलं जाईल. तसेच प्राथमिक व माध्यमिक उच्च अहर्ता धारण करणाऱ्या शिक्षकांना उच्च माध्यमिक ला पदोन्नती देता येणेबाबत नियमात बसत नाही. शासन निर्णयांचा अभ्यास करून त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल
*8.प्रलंबित महागाई भत्ता मिळणेबाबत*
शासन स्तरावर प्रलंबित आहे.शासनाकडून मंजूर झाल्यास दिला जाईल.
*9.आश्रमशाळा व वसतिगृह विभाग स्वतंत्र करणेबाबत*
धोरणात्मक बाब ,शासनास प्रस्ताव सादर केला जाईल.
*20.आश्रमशाळा कर्मचार्यांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत.*
खावटीचे काम पूर्ण झाल्यावर व शाळा सुरू झाल्यावर अशैक्षणिक कामं दिली जाणार नाहीत.
*12.आयुक्त,अपर आयुक्त ,po स्तरावर एकसमान नियमावली राज्यभर असावी*
आढावा घेऊन त्रुटींची पूर्तता केली जाईल.
*13.कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑनलाईन व विकल्प भरून कर्मचाऱ्यांचे इच्छेप्रमाणे करणेबाबत*
याबाबत आदर्श सॉफ्टवेअर तयार करून अंमलबजावणी केली जाईल.
*14. शिक्षकांना 10,20,30 या तीन लाभाचे अश्वाशीत प्रगती योजनांचा लाभ देणेबाबत.*
याबाबत सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयांना स्वतंत्र आदेश निर्गमित करून सर्वांना लाभ दिलाच जाईल
**15. इयत्ता7 वी पर्यंत प्राथमिक आश्रमशाळांना 8 वी चा वर्ग सुरू करण्यास परवानगी देणेबाबत*
विभाग निहाय व प्रकल्प निहाय अशा आश्रमशाळा निहाय माहीत घेऊन शासनास परवानगी बाबत अवगत केलं जाईल.
*16.एकलव्य स्कुलच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत*
स्वतंत्र बैठक घेऊन लवकरच सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढले जातील.
*17.क्रीडा,संगणक व कला शिक्षकांना 30 एप्रिल 20 पर्यंतचे वेतन मिळणे व पुनर्नियुक्तीचे आदेश देणेबाबत.*
राज्यभरातून आढावा घेऊन वेतनाबाबत निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू झाल्यावर सर्वांना नियुक्ती आदेश देण्याबाबत प्रकल्प अधिकारी यांना आदेश दिले जातील.

बैठकीस *उपायुक्त मा विकास पानसरे,प्रदीप पोळ, अविनाश चव्हाण,सलामे साहेब हे अधिकारी व डॉ डी एल कराड,एस जे शेवाळे,बीके कावळे,गणेश गावडे,वैजनाथ पडवळ,वळवी सर,शरद बिरादार अनिल सूर्यवंशी,जे के सोनवणे,सुदाम धात्रक, महेश अफ्रे,जितेंद्र हटकर सुनील खैरनार,अभिजित शिंदे,पी डी पगार,प्रवीण जोशीं,सुलभा अहिरे,शीतल खंडे,अर्चना जगताप,जानकी गुडीली,नंदुरबार,यावल,धुळे,तळोदा,जव्हार,कळवण,नासिक,शहापुर घोडेगाव,राजूर प्रकल्पातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
धन्यवाद👏
प्रा बीटी भामरे

Nashik meeting 10 Dec 2020
08/12/2020

Nashik meeting 10 Dec 2020

26.11.2020 संप सहभाग
25/11/2020

26.11.2020 संप सहभाग

संघटनेची मागणी
11/11/2020

संघटनेची मागणी

21/10/2020
18/10/2020

प्रति, 1.मा.आयुक्त साो, आदिवासी विकास विभाग, नाशिक
2.मा.अपर आयुक्त साो, आदिवासी विकास विभाग, नागपूर/अमरावती/नाशिक/ठाणे
3.मा.प्रकल्प अधिकारी साो, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)....

विषय : अनलॉक लर्निग, खावटी कर्ज, डीबीटी, अनुसुचित आदिम जमाती सर्वेक्षण व इतर शाळाबाह्य कामांवर 50 लाखांचे विमासंरक्षण मिळणे व कर्मचाऱ्यास वा त्यांच्या कुटुंबियास (पती/पत्नी, दोन मुले, आई-वडील) यांना कोरोना संसर्ग झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनाने उचलणे बाबत लेखी कार्यवाही होई पर्यंत दिनांक - 10 ऑक्टोबर 2020 पासून बेमुदत असहकार बहिष्कार आंदोलनाबाबत…

संदर्भ : 1. मा आयुक्त साो, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांना दिलेले पत्र सीटू संघटना, टीसी / जा.क्र. 80 दि. 24 सप्टेंबर 2020 2. जा.क्र./ डॉ. रराअयो /140/2020 आरोग्य विभाग, जिल्हा परीषद पुणे दि. 07/07/2020

महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपल्या माहितीस्तव सविनय सादर करतो की, कोरोना समुह संसर्गाच्या कालावधीत आदिवासी विभागातील सर्व कर्मचारी सध्या खावटी अनुदान सर्वेक्षण, अनुसुचित आदिम जमाती सर्वेक्षण, डीबीटी सर्वेक्षण, अनलॉक लर्निग प्रक्रिया, दुध वाटप, धान्यवाटप, पुस्तके वाटप अशा शाळाबाह्या कामास सक्तीने जुंपले जात आहे. या कामामध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणतेही संरक्षण साहित्य तसेच कोरोना योध्दा म्हणून 50 लाखांचे विमासंरक्षण देण्यात आलेले नाही. दरम्यानच्या काळात बरेच शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी तरूण वयात मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांच्या मृत्युनंतर प्रशासनाची त्यांच्याप्रती असलेली असंवेदनशीलता कर्मचाऱ्यांच्या मुळावर उठलेली दिसत आहे. त्यामुळे सर्व कर्मचारी वर्गात प्रचंड असुरक्षिततेची व संतापाची भावना तयार झालेली आहे, त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. जिल्हा परीषद व इतर खाजगी आस्थापनेच्या शाळांमधील कोणतेही शिक्षक शाळाबाह्य कामात गुंतलेले नसून सुरक्षितपणे घरी आहेत. इथे आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना मात्र रोज 11.00 ते 05.00 या वेळेत 100 % सक्तीची उपस्थिती, एकत्रित फोटोची सक्ती, अपंग / दिव्यांग, स्त्री कर्मचारी, 55 वर्ष वयावरील व गंभिर आजारी असलेले कर्मचारी या सर्वाना सक्ती केली जात आहे. अधिच कोरोनाच्या भितीमुळे कमकुवत झालेली रोग प्रतिकारशक्ती
अशा निर्णयांमुळे अधिकच कमकुवत बनत चाललेली आहे. त्याचा परीणाम कर्मचाऱ्यांचे अकस्मित मृत्युच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
कर्मचारी, अधिकारी हे या देशाचे नागरीक असून नागरीक म्हणून प्रत्येकाला भारतीय घटनेने काही मुलभूत हक्क दिलेले आहेत. त्याचबरोबर स्वत:चे व इतरांचे जीवितांस संरक्षण करण्याचे कर्तव्य सांगितलेले आहे. परंतू काही ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणून त्यांच्या जीवितांस धोका निर्माण करण्याचे काम बऱ्याच ठिकाणी प्रशासनाकडून सर्रासपणे सुरू आहे. उदा. नागपूर शहराच्या कोरोना रेडझोन भागात सक्तीने खवटी अनुदान सर्वेक्षण करण्यासाठी सांगण्यात आलेले आहे, त्यानुसार संबंधीत कर्मचारी प्रकल्प अधिकारी याबाबतचा त्यांच्या जीवितास असलेला कोरोनाचा धोका प्रकल्प अधिकारी नागपूर यांना सांगण्यासाठी गेले असता प्रकल्प अधिकारी महोदयांनी त्यांची समस्या समजून न घेता त्यांना निलंबनाच्या कार्यवाहीची धमकी दिली तसेच असे प्रकार बऱ्याच प्रकल्पामध्ये सुरू आहेत. सबब असे प्रकार थांबवण्यात येऊन त्यांना दिलासा द्यावा.

सबब हे सर्व प्रकार त्वरीत थांबविण्यात येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांना कोरोना योध्दाचा 50 लाख रूपये विमा संरक्षण देणे व कर्तव्य कालावधीत कर्मचाऱ्यास वा त्यांच्या कुटुंबियास (पती/पत्नी, दोन मुले, आई-वडील) यांना कोरोना संसर्ग झाल्यास त्याचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनाने करावा व कोरोना अथवा इतर कारणाने मृत्यु झाल्यास कर्मचाऱ्याच्या वारसदारास अनुकंप तत्वावर नोकरी मिळावी. तसेच शसकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा 10 तारखेपूर्वी अदा करावे यासाठी सर्व शाळांना पुरेसे वेतन अनुदान उपलब्ध करून द्यावे. अन्यथा राज्यभरातील आदिवासी विकास विभागातील सर्व कर्मचारी येत्या 10 ऑक्टोबर 2020 पासून बेमुदत संपावर उतरणार आहेत. सदर कालावधीत काहीही अप्रिय घटना घडल्यास प्रशासन त्यास जबाबदार राहील.
संघटनेस आशा आहे की, 10 ऑक्टोबर 2020 पूर्वी आपण याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर कराल व संघटनेस बेमुदत संप करण्याची अप्रिय वेळ येऊ देणार नाही.

17/10/2020
Nivedan
17/10/2020

Nivedan

17/10/2020

प्रति, 1.मा.आयुक्त साो, आदिवासी विकास विभाग, नाशिक
2.मा.अपर आयुक्त साो, आदिवासी विकास विभाग, नागपूर/अमरावती/नाशिक/ठाणे
3.मा.प्रकल्प अधिकारी साो, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)....

विषय : अनलॉक लर्निग, खावटी कर्ज, डीबीटी, अनुसुचित आदिम जमाती सर्वेक्षण व इतर शाळाबाह्य कामांवर 50 लाखांचे विमासंरक्षण मिळणे व कर्मचाऱ्यास वा त्यांच्याकुटुंबियास (पती/पत्नी, दोन मुले, आई-वडील) यांना कोरोना संसर्ग झाल्यास संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनाने उचलणे बाबत लेखी कार्यवाही होई पर्यंत दिनांक - 10 ऑक्टोबर 2020 पासून बेमुदत असहकार बहिष्कार आंदोलन

Address

Adivasi Bhavan ,gaytri Nagar ,bhavnath Road ,girnarget Near,junagadh
Junagadh

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Citu Aadivasi Shikshak Sanghatan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Citu Aadivasi Shikshak Sanghatan:

Shortcuts

Share