ZPCPS. Dhanora-Bu,Ta.Jintur

ZPCPS. Dhanora-Bu,Ta.Jintur CPS. धानोरा(बु), शाळा व शाळेसंबंधी पोस्ट

26/08/2025

Cps धानोरा (बु),ता.जिंतूर,जि. परभणी
रुपडं पालटल...

पंचप्राण शपथ... CPS धानोरा(बु)
09/08/2023

पंचप्राण शपथ... CPS धानोरा(बु)

*खाऊ चा बाजार*आज सकाळी प्रार्थनेच्या टायमाला सहज जाणवलं की दर बुधवारी मुलाची उपस्थिती नेहमी पेक्षा कमीच असते,वर्गात गेल्...
19/07/2023

*खाऊ चा बाजार*
आज सकाळी प्रार्थनेच्या टायमाला सहज जाणवलं की दर बुधवारी मुलाची उपस्थिती नेहमी पेक्षा कमीच असते,
वर्गात गेल्यावर विचार केला, बुधवारीच का....?
विद्यार्थ्यांशी चर्चा झाली....
पोऱ्ह म्हणाले सर आज वाघिला बजार असतो आन आपले सगळे लेकरं बजारला जातेत.. ...
कशाला?माझा प्रश्न...
मुलं एकमेकांकडे बघत आणि हसत म्हणले खाऊ खायला.....
"शाळा खाऊकडे जाण्यापेक्षा खाऊच शाळेकडं आला तर ...."
असा विचार केला अन कल्पना सहकारी श्री.मोटे सर यांच्या जवळ बोलून दाखवली...

मग काय.... ठरलं....भेळ ....जिलेबी👍

मुलांना सांगितलं... मुलं एकदम मूड मध्ये आली अन बघता बघता भेळ भत्याला लागणारं सामान आपापल्या घरून आणल्या गेलं...

मी आणि सहकारी वाघिच्या बाजारात जाऊन पाच-सातशे रुपयाचं शेव-फरसाण अन जिलबी घेऊन आलो...

मुलांचा उत्साह वाढला, कोणी कांदा काप कोणी टोम्याटो तर कुणी म्हणत होत सर.... मी कोथिंबीर कापू....?

आम्ही सगळ्यांनी मिळून भेळ-जिलेबी चा मनमुराद आनंद लुटला...

हेतू एव्हडाच की पुढच्या बुधवारी तरी वाघी चा बाजार आमच्या शाळेकडं वळेल....☺️😊

वाघ सचिन एकनाथ
(प्रा.शिक्षक)
CPS धानोरा(बु), ता:-जिंतूर, जि:-परभणी

शालेय समिती उपाध्यक्ष हस्ते गणवेश वाटप...कें.प्रा.शा.धानोरा बु...मु.अ.,शिक्षक, विद्यार्थी.....☺️🙏
18/07/2023

शालेय समिती उपाध्यक्ष हस्ते गणवेश वाटप...कें.प्रा.शा.धानोरा बु...मु.अ.,शिक्षक, विद्यार्थी.....☺️🙏

शैक्षणिक सहल....
14/02/2023

शैक्षणिक सहल....

शैक्षणिक सहल...
14/02/2023

शैक्षणिक सहल...

अज दिनांक 2/9/2022 वार शुक्रवार रोजी के.प्रा.शा. धानोरा(बु),येथे प्रयोगातून शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढ...
02/09/2022

अज दिनांक 2/9/2022 वार शुक्रवार रोजी के.प्रा.शा. धानोरा(बु),येथे प्रयोगातून शिक्षण या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील प्रमाणे प्रयोग करून दाखवण्यात आले,
1.ज्वलनाला ऑक्सिजनची आवश्यकता असते.
2.हवा जागा व्यापते.
हे दोन प्रयोग योग्य साहित्याचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून सादर करून दाखवले.

Address

Dhanora (bu)
Jintur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZPCPS. Dhanora-Bu,Ta.Jintur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category