26/06/2025
नवजीवन हायस्कूल जूनियर कॉलेजमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
जयसिंगपूर (ता. २६) : नवजीवन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जयसिंगपूर येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व श्रध्देपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यवेक्षिका हंकारे मॅडम यांच्या स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाहू महाराजांच्या समाजसुधारणेतील कार्यावर प्रकाश टाकला.
शाहू महाराजांच्या वेशातील विद्यार्थी जुनेद मुजावर तसेच मुख्याध्यापक संभाजी बोरचाटे , प्राध्यापक अदुरे व प्राध्यापक वाईंगडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी आणि आर. एस.आडसुळे यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित प्रभावी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा गौरव करत प्रेरणादायी विचार मांडले. खास करून भावेश देशमुख या विद्यार्थ्यांने शाहू महाराजांच्या जीवनातील कर्तृत्वावर विश्वास ठेवा या आशयाची एक कथा सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले . यावेळी शाहू महाराज जयंती निमित्त शाळेत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे
लहान गट :-
प्रथम क्रमांक :- भावेश धनजी देशमुख
द्वितीय क्रमांक :- प्रणाली परमेश्वर शिंदे
तृतीय क्रमांक :- आराध्या विनोद साळुंखे
मोठा गट :-
प्रथम क्रमांक :- अक्सा यासीन बागवान
द्वितीय क्रमांक:- अक्षरा विनायक भांबुरे
तृतीय क्रमांक :- आर्या संदीप पाटील
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. पी. बन्ने यांनी केले .तर सौ. प्राजक्ता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.