Laxmibai Patil Highschool & Jr.College,Jaysingpur.

Laxmibai Patil Highschool & Jr.College,Jaysingpur. हि-यांना पैलू पाडण्याचं काम आम्ही करत?

रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनियर कॉलेज,जयसिंगपूर मध्ये बुधवार दिनांक 08 जानेवारी 2025 रोज...
08/01/2025

रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनियर कॉलेज,जयसिंगपूर मध्ये बुधवार दिनांक 08 जानेवारी 2025 रोजी स्काऊट व गर्ल गाईड विषयांतर्गत निसर्ग शिबिराचे आयोजन केले होते.त्यामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश होता.

या निसर्ग शिबिर अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे आयोजन करून आपल्यामध्ये असणाऱ्या कार्याची कार्य कुशलता दाखवली.शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांनी निसर्ग शिबिराचा आनंद घेतला.

तंबू बांधणी,भोजन बनविणे,सांस्कृतिक उपक्रम,शेकोटी,विविध गीते यांच्या सादरीकरणाने या शिबिराला आणखीनच शोभा आली.

या शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या प्राचार्या सौ.सी.सी.आलासे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विषयशिक्षिका श्रीमती एस.पी.चौधरी,सौ.एस.व्ही.चौगुले व श्री.एस.डी.देवकुळे सर यांनी सर्व स्टाफच्या सहकार्याने केले.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आज शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आपल्या विद्यालयाच्या शालेय गुणवत्ता मानके...
27/12/2024

रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आज शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी आपल्या विद्यालयाच्या शालेय गुणवत्ता मानके मुल्यांकनास अर्थात वार्षिक शाळा तपासणीस मोठ्या उत्साहात सुरवात झाली.

आज सकाळी नऊ वाजता एकूण सहा जणांचे तपासणी पथक आपल्या विद्यालयांमध्ये उपस्थित झाल्यानंतर या पथकाने अतिशय बारकाईने विद्यालयाच्या गुणवत्ता तपासणीस सुरवात केली.

आपल्या विद्यालयाचे व्हिडिओ प्रेझेंटेशन,परिपाठ,फेसबुक पेज,सर्व शिक्षकांचा अध्यापनाचा दर्जा याबाबत पथकाने समाधान व्यक्त केले.त्यासोबतच संस्था व शासन निर्णयानुसार काही अपुरे असलेले रेकाॅर्ड पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या पथकामध्ये चेअरमन म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल मेंबर आदरणीय श्री.अजित पाटील साहेब,पथकप्रमुख म्हणून वडेरायबाग शाखेचे श्री.आय.एम.वाघमोडे साहेब,विषयतज्ञ श्री.एस.एन.वाडेकर, श्री.पी.एस.पन्हाळकर,श्री.एन.एन.पाटील,श्री.पी.जी.कचरे यांचा समावेश होता.

रयत शिक्षण संस्थेचे 'लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज, जयसिंगपूर 'या विद्यालयात आज दिनांक 20 डिसेंबर 2024...
25/12/2024

रयत शिक्षण संस्थेचे 'लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज, जयसिंगपूर 'या विद्यालयात आज दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी माणसात देव शोधणारा संत अशी ओळख निर्माण करणारे , महाराष्ट्राचे समाज सुधारक , प्रसिद्ध कीर्तनकार संत गाडगेबाबा यांचा स्मृतीदिन आणि संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित पुस्तके , ग्रंथ यांचे पूजन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला .या कार्यक्रमासाठी उपस्थित विद्यार्थ्यांच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ .शिंदे व्ही यू .मॅडम यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथपूजन करण्यात आले .तसेच सर्व शिक्षक , शिक्षिका विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे नियोजन इ . 7 वी व इ . 8 वी या वर्गाकडे होते .त्यामुळे इ .7 वी तील दिनेश कांबळे ,प्रज्वल राऊत, पूर्वी उपाध्ये , व दिव्या पाटील , प्रतीक्षा माने या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .त्यामध्ये संत गाडगेबाबा यांचे जीवन कार्य व सामाजिक, शैक्षणिक कार्य याविषयी स्पष्ट केले .तसेच इ . 8 वी तील कु.माधुरी रत्नपारखे , कु . अनुराधा गावडे , कु . प्रतीक्षा इटकर यांनी ग्रंथाविषयी माहिती सांगितली .त्यानंतर शिक्षिका मनोगतामध्ये विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ .कुंभार एस .एस .मॅडम यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनातील आठवणी , गाडगेबाबांनी दिलेले स्वच्छतेचे संदेश ,जीवन जगताना माणसाने परोपकारी कसे असावे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कु .आराध्या पाटील या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले .
शेवटी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ .चौगुले एस .व्ही . मॅडम यांनी कार्यक्रमातील उपस्थित सर्वांचे आभार मानले .अशाप्रकारे अगदी उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .

रयत शिक्षण संस्थेच्या, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज, जयसिंगपूर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समृद्ध...
15/12/2024

रयत शिक्षण संस्थेच्या, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेज, जयसिंगपूर या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी समृद्धी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ,दानोळी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मराठी निबंध लेखन स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले .
विद्यालयातील एकूण 30 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.विद्यालयाची अभिनंदनीय बाब म्हणजे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत लहान गटातून कु . अक्षता राजू लोहार (इ . 6 वी ) आणि मोठ्या गटातून कु.समीक्षा अनिल माने ( इ . 10 वी )यांना उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले .दोन्ही विद्यार्थिनींना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .तसेच उल्लेखनीय लेखन म्हणून इयत्ता सातवी मधून कु . पूर्वी प्रशांत उपाध्ये ( इ . 7 वी )या विद्यार्थिनीस पेन व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच इतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयामार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन!! व पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख सौ.एस.एस.कुंभार मॅडम व प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सी.सी.आलासे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी ग्रंथालयामार्फत शब्दकोष वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी...
14/12/2024

शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी ग्रंथालयामार्फत शब्दकोष वाचन स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी तसेच शब्दकोषाचा वापर सर्वांनी करावा,या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत गटशाखा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पद्माराजे विद्यालय शि...
14/12/2024

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत गटशाखा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पद्माराजे विद्यालय शिरोळ या ठिकाणी पार पडल्या.या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील उपशिक्षक श्री.एस.डी.देवकुळे सर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत गटशाखा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पद्माराजे विद्यालय शि...
14/12/2024

शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रयत विज्ञान प्रकल्पांतर्गत गटशाखा स्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा पद्माराजे विद्यालय शिरोळ या ठिकाणी पार पडल्या.या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला.या स्पर्धेत सक्षम कांबळे,शौर्या कांबळे व दिव्या पाटील हे विद्यार्थी सहभागी झाले होते.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या विभागप्रमुख सौ.एस.एस.पाटणकर मॅडम व प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सी.सी.आलासे मॅडम यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन!

💐💐💐💐💐💐💐💐💐

शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक आदरणीय श्री.प्रविण पोवार साहेब यांनी महावाचन उत्सव व अपार आयडीचा आढावा घेण्यासाठी गुरूवार...
14/12/2024

शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक आदरणीय श्री.प्रविण पोवार साहेब यांनी महावाचन उत्सव व अपार आयडीचा आढावा घेण्यासाठी गुरूवार दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयास सदिच्छा भेट दिली.

बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पंचायत समिती शिरोळ मधील विषयतज्ञ माननीय श्री.अनिल पवार साहेब यांनी विद्यालयास सदिच्छा...
14/12/2024

बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी पंचायत समिती शिरोळ मधील विषयतज्ञ माननीय श्री.अनिल पवार साहेब यांनी विद्यालयास सदिच्छा भेट देवून महावाचन उत्सव व अपार आयडी याबाबत मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश मिळावे,यासाठी शिक्षक पालक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी दिनांक 11 डिस...
14/12/2024

विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये उज्वल यश मिळावे,यासाठी शिक्षक पालक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी इ.10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा घेण्यात आली.यावेळी सर्व विषयशिक्षकांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सत्र 1 मध्ये प्रथम तीन क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित संच भेट देवून त्यांचा गौरव करण्यात आला.

भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 06 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या प्रतिमेचे पू...
08/12/2024

भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 06 डिसेंबर 2024 रोजी त्यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सी.सी.आलासे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कु.नेहा कांबळे या विद्यार्थीनीने आपले विचार व्यक्त करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.

शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील वार्षिक क्रीडा महोत्सव 5 डिसेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विद्यालयात आयोजित करण...
08/12/2024

शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील वार्षिक क्रीडा महोत्सव 5 डिसेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.

या क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक खेळात कबड्डी,खो-खो,क्रिकेट,रस्सीखेच व वैयक्तिक खेळांमध्ये 100 मीटर धावणे,लांब उडी,गोळा फेक,दोरी उड्या,लिंबू चमचा,तीन पायांची शर्यत,स्लो सायकल या खेळांचा समावेश करण्यात आला होता. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटला.

या क्रिडामहोत्सवाचे नियोजन विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.सी.सी.आलासे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा विभाग प्रमुख सौ.एस.व्ही.चौगुले मॅडम यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक सहका-यांच्या मदतीने केले.

Address

6 वी गल्ली, स्वामी समर्थ मंदिराशेजारी
Jaysingpur
416101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7am - 1pm

Telephone

02322225553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmibai Patil Highschool & Jr.College,Jaysingpur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category