Citu Jawhar

Citu Jawhar Official Page Of Citu Affiliated Teachers Union Jawhar ITDP Project

31/08/2022

| |

31/08/2022

लाईफ इन्शुरन्स - का? किती? कुठला? कसा?

युरोपातल्या व्यापाऱ्यांनी कुणा एका व्यापाऱ्याच्या जहाजाचे प्रवासात नुकसान झाले, लूट झाली तर ते नुकसान सर्वांत मिळून वाटून घेता यावे व त्याचा व्यापार बुडू नये यासाठी जोखमीची गणना करून ती रक्कम सर्वांमध्ये समान वाटली. यालाच पुढे इन्शुरन्स हे नाव पडलं आणि त्या रकमेला प्रीमियम म्हणण्यात आले. जहाजांपासून सुरू झालेला इन्शुरन्स पुढे वाहने, आयुष्य, आरोग्य, शरीराचा एखादा अवयव, शेती, व्यवसाय अशा वेगवेगळ्या ठिकाणी वापरात यायला लागला. यावरून इन्शुरन्सचे दोन प्रकार पडले, एक लाईफ इन्शुरन्स आणि दुसरा जनरल इन्शुरन्स.

कशासाठी?
आपल्या आजूबाजूला आपण असंख्य उदाहरणे पाहतो जिथे घरातली एकमेव कमावती व्यक्ती अचानक मरण पावते आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर आर्थिक दारिद्र्याची कुऱ्हाड कोसळते. मरण हे शाश्वत आहे आणि त्याची वेळ सांगून येत नाही, म्हणून जगातला प्रत्येक कमावता माणूस त्याच्या अकाली मरणामुळे कुटुंबाची होणारी वाताहत थांबवण्यासाठी स्वतःच्या आयुष्याचा विमा (लाईफ इन्शुरन्स) करून घेतो.

किती?
कमावत्या व्यक्तीच्या अकाली मरणानंतर मिळणारी विम्याची रक्कम ही कुटुंबाला उर्वरीत आयुष्यासाठी पुरेशी असायला हवी हा ठोकताळा खूप महत्वाचा आहे. उदाहरणार्थ समजा आज माझ्या म्हणजे डॉ. विनय काटेच्या घरातला राहणीमान, शिक्षण व इतर खर्च हे सगळे मिळून महिना 50 हजार रुपये जात असतील तर, तर माझ्या मृत्यूनंतर विम्याची मिळणारी रक्कम ही इतकी असावी की तिचे फक्त व्याज महिन्याला 60-70 हजारपेक्षा जास्त असावे जेणेकरून 50 हजारांत माझे घर चालेल आणि उरलेले 10-20 हजार परत गुंतवून त्याच्या व्याजातून महागाईच्या दरावर तोडगा निघू शकेल. थोडक्यात माझ्या माघारी माझ्या कुटुंबाची 50 हजारांची दरमहा सोय करण्यासाठी मला किमान 1 कोटी रुपयांचा इन्शुरन्स काढावा लागेल. माझ्यावर जर समजा काही घरकर्ज असेल तर त्या 1 कोटीच्या रकमेत ती रक्कमही जोडून घ्यावे लागेल.

कुठला?
बाजारात आज लाईफ इन्शुरन्समध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत जसे की टर्म इन्शुरन्स, युनिट लिंक, एनडाउमेंट, मनी बॅक वगैरे वगैरे. यापैकी टर्म इन्शुरन्स हा एकमेव असा इन्शुरन्स आहे ज्यात कमावता व्यक्ती मरेपर्यंत एकही पैसा आधी मिळत नाही, हा शुद्ध जोखीम निवारण करणारा इन्शुरन्स आहे. कमावता व्यक्ती मृत पावला तर मात्र त्याने ठरवलेली विम्याची रक्कम एकरकमी वारसांना मिळते. बाकी सगळे इन्शुरन्स हे थोडी जोखीम आणि थोडी गुंतवणूक या प्रकारातील आहेत.

विमा एजंट लोकांना तुम्ही भरलेल्या प्रिमियमवर टक्केवारीने कमिशन मिळते. जर वार्षिक प्रीमियम पाहिला तर टर्म इन्शुरन्स हा सगळ्यात स्वस्त असतो, त्यामुळे विमा एजंटला त्यात खूप कमी पैसे मिळतात. 1 कोटी रुपयांचा टर्म इन्शुरन्स अगदी 8-10 हजार वार्षिक प्रिमियमला मिळतो व त्यात कमिशन 500 रुपये वगैरे असते. म्हणूनच विमा एजंट कधीही तुम्हाला टर्म इन्शुरन्स घेण्यासाठी आग्रह करत नाहीत, जिथे सर्वात कमी रकमेत तुम्ही तुमच्या कुटुंबाचे व्यवस्थित आर्थिक संरक्षण करू शकता. याऊलट विमा एजंट तुम्हाला मनी बॅक, युनिट लिंक वगैरे योजना विकून तुम्हाला व्याजाचे, परताव्याचे गाजर दाखवतो, ज्यात एजंटला जास्त पैसा मिळतो. नेहमी लक्षात ठेवा की इन्शुरन्स हा सर्वात आधी जोखीम निवारण करण्याचा प्रकार आहे, त्यामुळे त्यातून व्याजाची अपेक्षा कधीही ठेवू नका. पहिला इन्शुरन्स हा टर्म इन्शुरन्सच हवा. नंतरही पैसे शिल्लक राहत असतील तर दुसऱ्या योजनांत लावा. जर तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स नसेल तर तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असून नसल्यासारखा आहे हे ध्यानात ठेवा.

कसा?
टर्म इन्शुरन्स काढण्याआधी IRDA (विमा नियामक आयोग) च्या वेबसाईटवर जाऊन वेगवेगळ्या विमा कंपन्यांचा Claim Settlement Ratio (विमा दाव्यांची पूर्तता) पाहून घ्या. ज्यांचा claim settlement ratio सगळ्यात जास्त, आणि त्यातल्या त्यात प्रीमियम कमी अशा कोणत्याही कंपनीचा टर्म इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता. अवघ्या 8-10 हजारांत तुम्ही स्वतःच्या कुटुंबाचे आयुष्य विनाजोखमीचे बनवू शकता. तुम्ही स्वतःसुद्धा विमा कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन टर्म इन्शुरन्स स्वस्तात विकत घेऊ शकता, त्यासाठी कुठल्याही एजंटची गरज पडत नाही.

ध्यानात राहू द्या की EMI वर iPhone घेण्यापेक्षा, तीर्थक्षेत्री जाऊन देवाच्या दारी संकटापासून वाचवण्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा एखादा चांगला टर्म इन्शुरन्स घेणे जास्त शहाणपणाचे आणि stylish आहे.

- डॉ. विनय काटे
(18 मार्च 2019 ची पोस्ट)
| |

19/09/2021
17/09/2021

17 सप्टेंबर
तीन दिग्गजांचे स्मरण करून स्वतःच्या ढोंगीपणा आणि थोतांड वृत्तीचं आत्मपरीक्षण करण्याचा दिवस...
पेरियार रामस्वामी
प्रबोधनकार ठाकरे
कॉम्रेड शरद पाटील

काळाच्या पुढे विचार करून काळावर आघात करणारी ...
परखड तितकंच सत्य मांडूनही आपल्या वैचारिक विचारसरणीची मांडणी अंत्यज हिताची म्हणजेच अंतिमतः मानवी हितासाठी प्राणपणाने साकारणारी...
बुद्धिप्रामाण्यवादी तितकेच कृतिशीलतेवर भर देणारी...
अंतिमतः मानवी मेंदूच्या उत्थाणातून भयग्रस्त मनाला सक्षम आणि मनगटाला कार्यक्षम बनवणारी ही पृथ्वीवर अवतरलेली तीन प्रचंड वैचारिक बैठक घडवणारी जिवंत विद्यापीठे ...
विनम्र अभिवादनच...
बाकी शब्दात ह्यांची महती सामावणारे शब्दच जन्माला यायचे आहेत अजुन...
जय हिंद

10/09/2021

🖊️🖊️🖊️🖊️🖊️
*कर्तव्य*
*आणि हक्क*

*एकाच नाण्याच्या दोन बाजू*

🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙

*गुलामाला गुलामीची जाणीव करुन दिल्याशिवाय तो गुलामीविरुद्ध बंड पुकारणार नाही...*
भारतरत्न Dr B R Ambedkar

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

ज्याच्या येण्याने अवघ्या धरतीसह जनमन उल्हासीत होऊन मोहरते अशा आपल्या लाडक्या *बाप्पाचे* आगमन झाले आहे.प्रथमतः त्याच्या चरणी नतमस्तकी वंदन...
👏👏👏👏👏👏👏👏
त्या सुखकर्ता - दुःखहर्त्याला एकच साकडं... सातत्याने आम्हाला *कर्तव्याची* जाणीव करुन देताना घटनेला बांधील असणाऱ्या *हक्कांचे* पण संवर्धन कर...कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...असं लोकशाही म्हणते मी नाही हा 🤓😎🤓
असो...

आपल्याशी *शब्दसेतू* बांधण्यामागचा एकच उद्देश ...गेल्या अनेक दिवसांपासून येणारे नवनवीन अध्यादेश...त्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या आपणां सर्वांच्या मनाच्या अरुंद कक्षा...

मग प्रश्न निर्माण होतो *आदिवासी विकास विभागाचा* तळागाळात काम करणारा कर्मचारी विकासाभिमुख आहे की नाही ???
खरया अर्थाने सृष्टीचे रक्षक, नैसर्गिक साधनसंपत्तीचे असीम पूजक असणाऱ्या,दरयाखोरयात राहणाऱ्या गोरगरीबाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम १९७२ ला निर्मित आश्रमशाळांनी केलं.त्याचं खूप मोठं श्रेय खेड्यापाड्यात राहून स्वकुटुंबाची पर्वा न करता ज्ञानदानाचं पवित्र काम करणाऱ्या माझ्या शिक्षक बांधवांना तथा रानावनातून लाकूडमोळी जमा करुन,डोक्यावरून पाणी वाहून चिमुकल्यांच्या पोटाची खळगी भरणारया वर्ग ०४ बांधवांना तथा आमच्या इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जातं ही वस्तुस्थिती कोणीच नाकारु शकत नाही.
कुडांच्या भिंती,सारवलेले वर्ग कालबाह्य होऊन शानदार इमारती उभ्या राहिल्या असतील म्हणून काय मागील ५० वर्षांचं समर्पण विसरता येईल काय ???

डोंगरकपारीत राहणाऱ्या वर्गाची तिसरी पिढी शिक्षित होत असताना आश्रमशाळेत शिकणारे अनेक विद्यार्थी आज उच्च शिक्षित झाले.अधिकारी झाले. एवढच काय राज्यकर्ते घडवले आश्रमशाळांनी...आजच्या घडीला आमचे उद्याचे आधारस्तंभ इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊ लागले.
आज तंत्रज्ञानाच्या युगात अर्थात २१ व्या शतकात फक्त मुख्य प्रवाहातच न राहता इतर घटकांशी स्पर्धा करु लागले.ही केवढी मोठी क्रांती ?? हे काय अगदी सहज घडलं काय ?

ज्यांना कोणाला हे समर्पण अमान्य असेल त्यांनी *मी व फक्त माझं कुटुंब* ह्या संकल्पनेतून बाहेर येऊन स्वतःच्या ०६ वर्षाच्या मुलाला शिक्षणासाठी दूर ठेऊन पहा तेव्हाच शाळेतील आमची भगिनी त्याची आई होऊन कशी काळजी घेते हे जवळून कळेल..त्याच्या नाकाची घाण काढतानाही ती कधी कचरत नाही की आजारपणात स्वतःच्या डब्यातील भाजी- पोळी काढून देताना मागे सरकली नाही कारण मुळात तिचं ह्दयच आईचं आहे...आमची संस्कृतीच जगाच्या पाठीवरील आदर्श संस्कृती मानली जाते आणि आम्ही तिचे रक्षणकर्ते आहोत...
ही भावना कोणी लक्षात घेणार आहे की नाही ???
कोरोना काळात unlock learning असेल...खावटी योजना असेल...शिक्षण सेतु असेल...स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या बांधवांनी केलं आणि आजही करताहेत...अनेकांनी आपले प्राणही गमावले.
ना कोणी आजतागायत कौतुकाची थाप पाठीवर दिली की ना कोणी प्रशंसा केली.
बरं आम्हाला मान्य ते आमचं कर्तव्यच आहे...पण चांगल्याला चांगलंही कधीतरी म्हणावं ना...
शालेय शिक्षण विभागाचे नियम,अटी,प्रशिक्षणे आम्हाला चालतात परंतु त्याच विभागाला आमच्या विभागातील शिक्षकांचे
*आदर्श शिक्षकासाठी* नामांकनं चालत नाहीत.
म्हणजे आमच्या विभागातील शिक्षकाचे काम आदर्शवत नाहीच का ??? की त्याच्याकडे गुणवत्ताच नाही ???
ही मोठी शोकांतिका आहे...यावर मात्र आमचा कोणताच *पाठीराखा वा पालक* बोलायला तयार नाही.
मुळात आमच्या विभागातील शिक्षक स्पर्धा परीक्षेतून निवडला गेलाय ही वस्तुस्थिती नाकारण्याची हिंमत कोणी करु शकत नाही.कारण ते वास्तव आहे.
आज जग चंद्रावर गेलं.वैश्वीकीकरण झालं. मग आजच्या बदलत्या जीवनशैलीत आम्हाला इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे की नाही ? हा आमचा मूलभूत प्रश्न आहे. १९७२ ला असणारे नियम - अटी आज २०२१ ला बदलू पाहतील की नाही??
आम्हाला ठाऊकच नाही तर मान्य आहे आपणां सर्वांचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे.त्याच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध होतो,आहोत आणि असू...त्यास कोणाचच दुमत नाही.
परंतु त्याच विद्यार्थ्याच्या नावाने करोडो रुपये खर्च होत असताना व जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करताना विकासाभिमुख काही क्रांतीकारक निर्णय होणार आहेत की नाहीत ?
की दिवसागणिक फक्त कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी करण्याचेच निर्णय पहायला मिळतील.रोज शाळेत गेल्यानंतर शैक्षणिक मुद्यांवर चर्चा होणेऐवजी भलत्याच आदेशांवर काथ्याकूट होऊन दिवसभराची काम करण्याची ऊर्जाच रोखली जाते. मुळात ज्याचं काम त्याच घटकाला करायला मिळालं तर त्याची काम करण्याची क्षमता वाढेल की नाही ?? हे तज्ज्ञांनी आज समजून घेणे काळाची गरज आहे.
आणि मित्रांनो हे घडणार नसेल तर आपला आत्मसन्मान आपणच जपण्याची वेळ येऊन ठाकली आहे अन्यथा येणारा काळ भयावह असेल.

*म्हातारी मेल्याचं दुःख नाही मात्र काळ सोकावतो.*

म्हणून संघटित होणं...संघर्ष करणं...आणि आपलं आत्मबळ वाढवणं हेच संयुक्तिक ठरेल.

*माणसाच्या आयुष्यात दोनच दिवस महत्वाचे आहेत...*
*१. आपण जन्माला आलो तो...*
*२. आपण का जन्माला आलो हे सिद्ध करतो तो दिवस...*

हाच दिवस सिद्ध करण्याचा क्षण येऊन ठेपलाय...

चला तर उठा...सज्ज व्हा...CITU ची ताकद वाढवुया...*आणि आत्मसन्मानाच्या लढाईचे साक्षीदार होऊया*

जगाच्या पाठीवरील सर्वात बळकट लोकशाहीप्रधान राष्ट्राच्या संविधानाचे आम्ही पाईक आहोत...नक्कीच आम्हाला *कर्तव्याची* जाणीव आहे परंतु आमच्या तुरळक *हक्कांसाठी* पायपीट करायला लागू नये हीच माफक अपेक्षा...

चला...तूर्त इथेच थांबतो.

*जय हिंद - जय जिजाऊ - जय शिवराय - जय संविधान*

पुन्हा लवकरच भेटू..शब्दांच्या माध्यमातून ...

आणि हो...सांगायचच राहिलं..
पटलं तर घ्या आणि चुकलं असेल तर अळवावरच्या पाण्याच्या थेंबागत नेहमीप्रमाणे अलगद सोडून द्या...

सर्वांना *ह्दयपूर्वक* धन्यवाद !

*आपला*
*CITU च्या प्रवासातील*
*एक वाटसरु*🏃🏿‍♂️

✒️ राजेश पुंडलिक पाटील
देवळी ( वाडा )
*कार्याध्यक्ष*
*CITU* प्रणित शिक्षक संघटना
जव्हार प्रकल्प, जि.पालघर.
📱 ९९७५६६२६४९📱

07/07/2021

Mind it...

28/06/2021
14/06/2021

......म्हणून राज ठाकरे वेगळे ठरतात.......... Get link Facebook Twitter Pinterest Email Other Apps June 13, 2021  राज ठाकरे हे नाव कोणत्याही मराठी माणसाला आणि मराठी द...

Address

Jawhar
401603

Telephone

+919270828002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Citu Jawhar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Citu Jawhar:

Shortcuts

Share