15/03/2025
जालन्याच्या इतिहासात प्रथमच हृदयाच्या छिद्रावरील बिनाटाक्याची शस्त्रक्रिया यशस्वी!
!! हृदयरोग तज्ञ डॉ.कृष्णा कोरडे व कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल ची किमया !!
_परतुर तालुक्यातील खांडवीवाडी येथिल दहा वर्षाचा मुलगा ज्याला मागील भरपूर दिवसांपासून दम लागत होता. टू डी इको व तपासण्यांमध्ये असं निदर्शनास आलं की त्यास हृदयामध्ये एक छिद्र (होल) असून त्यामुळेच रुग्णाला प्रचंड त्रास होत होता. डॉ.कृष्णा कोरडे, डॉ.अर्जुन सातपुते व टीमने त्यांना बिना टाक्याच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया डॉ.कृष्णा कोरडे व कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या टीम द्वारे यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. परतुर तालुक्याचे माननीय आमदार बबनराव लोणीकर यांनी आज रुग्णाची भेट घेऊन झालेल्या उपचाराबद्दल माहिती घेतली व हॉस्पिटलला सुद्धा झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या
लहान मुलांवरील हृदयाच्या बिना टाक्याच्या शस्त्रक्रिया या नक्कीच थोड्या किचकट स्वरूपाच्या असतात परंतु रुग्णांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन आजपर्यंतच्या अनुभवावर व संपूर्ण कलावती हॉस्पिटलच्या टीमवर मला विश्वास होता की ही शस्त्रक्रिया आपण यशस्वीरित्या पार करू शकतो. बिना टाक्याच्या शस्त्रक्रियामुळे रुग्णाला आपण 24 तासातच सुट्टी दिली. अँजिओग्राफी एन्जोप्लास्टी, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया , बायपास, वाल रिप्लेसमेंट , गुडघा व खुबा बदल्याच्या शस्त्रक्रिया अशा अनेक किचकट आजारांवरील उपचार कलावती हॉस्पिटलमध्ये सुरू आहे जेणेकरून रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये किंवा दूर जाऊन उपचार करण्याची गरज पडणार नाही.
_ डॉ.कृष्णा मदनराव कोरडे(हृदयरोग तज्ञ) कलावती हॉस्पिटल जालना
येणाऱ्या काळात जालन्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान व नवनवीन उपचार पद्धती कलावती सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये आणण्याचे आमचे प्रयत्न राहील जेणेकरून त्याचा फायदा आपल्या भागातील रुग्णांना नक्कीच होईल
_डॉ.अर्जुन सातपुते(हृदयरोग तज्ञ)
कलावती हॉस्पिटल जालना.
डॉ.कोरडे व कलावती हॉस्पिटल मार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे व अत्याधुनिक उपचार आपल्या भागातील रुग्णांवर यशस्वीरित्या होत आहेत. रुग्णसेवेच्या या कार्यात त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.
_ आमदार बबनराव लोणीकर