27/10/2021
जेईएस महाविद्यालयाच्या उपप्राचार्याकडुन एका विद्यार्थीनीस अश्लिल मॅसेज केल्याच्या घटनेविरोधात अभाविप जालना शाखेने सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक व जे इ एस महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देऊन गुन्हेगारास शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या वैश्विक महामारी मुळे मागील १९ महिन्यांपासून सर्व महाविद्यालय बंद होती,परंतू २० ऑक्टोबर पासून प्रत्यक्षात शिक्षणासाठी महाविद्यालय सुरू झाली आहेत,आणि आज महाविद्यालय सुरू होऊन ७ दिवसही पूर्ण झाली नाहीत अशातच जालना शहरातील जेईएस महाविद्यालयाच्या उपप्राचार्याकडुन एका विद्यार्थीनीस अश्लिल मॅसेज केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. ही घटना शिक्षणाला काळिमा फासणारी व मन सुन्न करणारी घटना आहे. महाराष्ट्रात मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे त्यातच महाविद्यालय सुद्धा विद्यार्थिनीसाठी सुरक्षित नाहीत ही मोठी चिंतेची बाब आहे. महाविद्यालयातील विद्यार्थीनीस अश्लील SMS करणाऱ्या प्राध्यापकाची सखोल चौकशी करून गुन्हेगारास कठोर शिक्षा देण्यात यावी अशी अभाविपने मागणी केली आहे. यावेळी शहर मंत्री समाधान कुबेर, शहर सहमंत्री दर्शना पाटील,ऋषीकेश राऊत,रुपाली जाधव,सागर मांडे, पुष्कर जोशी,दिव्यप्रिया देशमुख, जान्हवी जाधव,अनुराग संगमुळी,ऋतिक इंगळे,चंद्रकांत हांडे,वेदांत खैरे, अविष्कार इंगळे इ कार्यकर्ते उपस्थित होते.