Kai. Nagojirao Satkar School

Kai. Nagojirao Satkar School Kai. Nagojirao Satkar Primary and High School, Jalna

उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायमकै. नागोजीराव सतकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्केविद्यार्थ्यांमध्ये प्रथम:अनुजा ...
27/05/2024

उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम

कै. नागोजीराव सतकर माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के

विद्यार्थ्यांमध्ये प्रथम:
अनुजा सुनील सांगळे (९३.४०%)

द्वितीय क्रमांक: रेखा अशोक भालमोडे (९१.४०%)

तृतीय क्रमांक: संयुक्तिकरित्या कृष्णा एकनाथ घोडके व सोमेश गोपीचंद चेडे (९१.००%)

चतुर्थ क्रमांक: वैष्णवी अनिल गाठोडे (८७.२०%) तसेच विशेष प्राविण्यश्रेणी ११ विद्यार्थी व प्रथम श्रेणीत १५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.
👆
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कै. नागोजीराव सतकर शिक्षण संस्था, जालना चे माननीय अध्यक्ष श्री बाबूराव (मामा) सतकर व इतर पदाधिकारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...
🌹🌹🌹🌹🌹

17/02/2024

जालना शहरातील कै. नागोजीराव सतकर शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी पायल जाधव हिने स्वच्छता मॉनिटर या विषयासंबंधी आपले विचार प्रकट केले.

17/02/2024

जालना शहरातील कै. नागोजीराव सतकर शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी भक्ती बल्लाळ हिने स्वच्छता मॉनिटर या विषयासंबंधी आपले विचार प्रकट केले.

17/02/2024

जालना शहरातील कै. नागोजीराव सतकर शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी सोमेश चेडे याने स्वच्छता मॉनिटर या विषयासंबंधी आपले विचार प्रकट केले.

जालना एज्युकेशन फाऊंडेशन, जालना तर्फे घेण्यात आलेल्या इंग्रजी शब्दवृध्दी परीक्षा(प्रायोजक : कलश सिड्स, प्रा. ली.) या जिल...
11/11/2023

जालना एज्युकेशन फाऊंडेशन, जालना तर्फे घेण्यात आलेल्या इंग्रजी शब्दवृध्दी परीक्षा
(प्रायोजक : कलश सिड्स, प्रा. ली.) या जिल्हास्तरीय स्पर्धेत कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले...................
डिक्शनरी परीक्षा 2022-23 निकाल
💐💐💐💐💐💐💐💐
💫 गट : चौथी ते सातवी
♦️ प्रथम पुरस्कार : (विभागून)
▪️1. पल्लवी गजानन भालेकर 119 गुण, इयत्ता सातवी, कै.नागोजीराव सतकर विद्यालय जालना.

♦️ विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार
▪️4. कल्पना छबू पवार, 106 गुण, इयत्ता सातवी, कै.नागोजीराव सतकर विद्यालय जालना.......................
💫 गट आठवी ते दहावी:
♦️ द्वितीय पुरस्कार (विभागून)
▪️1. कृष्णा एकनाथ घोडके, इयत्ता नववी, 112 गुण, कै.नागोजीराव सतकर विद्यालय जालना.

♦️ तृतीय पुरस्कार :
▪️जांबुवंत गजानन भालेकर, इयत्ता आठवी, 111 गुण, कै.नागोजीराव सतकर विद्यालय जालना.

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. Prakash Gadhe सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
06/11/2023

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. Prakash Gadhe सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमच्‍या कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विदयालयात आज शिक्षक दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी विदयार्थ्‍यांनी स्‍वयं...
05/09/2023

आमच्‍या कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विदयालयात आज शिक्षक दिन साजरा करण्‍यात आला. यावेळी विदयार्थ्‍यांनी स्‍वयं शासन दिन साजरा केला आज शाळेचे सर्व कामकाज विदयार्थ्‍यांनी पाहीले. यावेळी रेखा अशोक भालमोडे आणि कृष्णा एकनाथ घोडके या दोन विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले. तसेच इतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. शिक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तसेच शिक्षकांची संगीत खुर्ची स्पर्धा घेतली. या खेळात घोगरे मॅडम यांनी प्रथम तर निरफळे मॅडमनी द्वितीय क्रमांक पटकावला. सर्वोत्कृष्ट शिक्षक स्पर्धेत सोमेश चेडे याचा प्रथम व पूजा हारबक हिचा द्वितीय क्रमांक आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्‍याध्‍यापक, सर्व शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे शासन आदेशानुसार आज सद्भावना दिवस साजरा केला. यावेळी विद्यार्...
18/08/2023

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे शासन आदेशानुसार आज सद्भावना दिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सद्भावना प्रतिज्ञा घेतली.

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावे...
15/08/2023

कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षण संस्थेचे सदस्य श्री. लाड साहेब यांनी झेंडावंदन केले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव मामा सतकर, कोषाध्यक्ष श्री. लहानु वाघमारे सर, सदस्य श्री. मन्सारामभाऊ सतकर, श्री. यादव सर, श्री. आवटे सर उपस्थित होते. तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी भाषणं, देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच बालवाडीच्या चिमुकल्यांनी नृत्य सादर केले.

'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत आज कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार प...
13/08/2023

'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत आज कै. नागोजीराव सतकर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जालना येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. वाघमारे सर, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

काल कै. नागोजीराव सतकर ज्ञान मंदिर येथे बालवाडी विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.
05/08/2023

काल कै. नागोजीराव सतकर ज्ञान मंदिर येथे बालवाडी विद्यार्थ्यांची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.

15/07/2023

Address

Satkar Nagar, Near Ambad Chaufuli
Jalna

Opening Hours

Monday 8:30am - 3:30pm
Tuesday 8:30am - 3:30pm
Wednesday 8:30am - 3:30pm
Thursday 8:30am - 3:30pm
Friday 8:30am - 3:30pm
Saturday 8:30am - 12:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kai. Nagojirao Satkar School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category