24/08/2026
दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचालित, महाराणा प्रताप विद्यालयात आरोग्य विषयक चर्चासत्र संपन्न
दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचालित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव येथे आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी विद्यार्थिनींसाठी विशेष आरोग्य विषयक मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी वरद हॉस्पिटलच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना संजीव चौधरी यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
डॉ. चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात -
• किशोरवयीन अवस्था व त्यातील शारीरिक व मानसिक बदल
• गुड टच आणि बॅड टच याबाबतची जनजागृती व स्वसंरक्षण
• समतोल आहाराचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनात आरोग्याची काळजी कशी घ्यावी
• मासिक पाळी
या विषयांवर अत्यंत सोप्या व समजेल अशा भाषेत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
या कार्यक्रमास दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ.श्री.प्रमोद खिवसरा ,पर्यवेक्षकश्री.प्रवीण महाले, शिक्षिकावृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.समिधा सोवनी व आभार प्रदर्शन सौ.मायाश्री पाटील यांनी केले.फार्मा कंपनीत कार्यरत असलेले श्री.विलास राजहंस यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
या चर्चासत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.