Godavari Institute of Management & Research

Godavari Institute of Management & Research Godavari Foundation’s GIMR is established in 2001 to import high quality education in the field of Management and Research. GIMR is approved by AICTE.

New Delhi & affiliated to KBC North Maharashtra University, Jalgaon.

गोदावरी आय.एम.आर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !जळगाव - राजमाता जिजाऊ  यांची पुण्यतिथी १७ जून रोज...
17/06/2026

गोदावरी आय.एम.आर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

जळगाव - राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी १७ जून रोजी साजरी केली जाते, आज राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जिजाऊंना आदरांजली वाहिली.

डॉ. चेतन सरोदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार, शौर्य आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा. जिजाऊंचे कार्य आणि साम्राज्य उभारणीतले योगदान आजही प्रेरणादायी आहे. शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री. जिजाऊंनी शिवबांना केवळ एक योद्धा म्हणून नाही, तर रयतेचे राज्य (स्वराज्य) चालवणारे दूरदर्शी राजे म्हणून घडवले.

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन प्रा. स्मिता चौधरी यांनी केले.

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची NPTEL-SWAYAM मध्ये उल्लेखनीय कामगिरी !जळगाव -  Godavari...
11/06/2026

गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांची NPTEL-SWAYAM मध्ये उल्लेखनीय कामगिरी !

जळगाव - Godavari Institute of Management & Research (GIMR), जळगाव येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील SWAYAM-NPTEL ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढविला आहे. संस्था व्यवस्थापन शिक्षण व संशोधन क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी ओळखली जाते.

‘Cloud Computing’ या NPTEL अभ्यासक्रमात एमसीए द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत Elite + Silver Medal हा मान मिळविला. यामध्ये निकिता किरण तयाडे यांनी तर चौधरी सर्वेश विलास यांनी यश संपादन केले.

तसेच ‘Joy of Computing Using Python’ या अभ्यासक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश नोंदविले. स्वाती संजय बाविस्कर यांनी Elite + Gold Medal मिळविला. याशिवाय विनोद सुखलाल महाजन , भूमिका बालू नाळे , मनोज विश्वास पाटील आणि नयना संजय बारी यांनी Elite + Silver Medal प्राप्त करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके यांनी, व प्राध्यापकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, तांत्रिक कौशल्य आणि स्व-अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळविल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळणार असून, संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळकटी मिळाली आहे.

गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात नॅशनल कॉन्फरन्स संपन्न !जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एकदिवसीय ऑनलाईन "Nation...
09/06/2026

गोदावरी आय.एम.आर. महाविद्यालयात नॅशनल कॉन्फरन्स संपन्न !

जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात एकदिवसीय ऑनलाईन "National Conference on Artificial Intelligence and Sustainable Digital Transformation in Commerce and Management" (NC-AISDTCM 2026) या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन आज 9 जून 2026 रोजी करण्यात आले. या परिषदेत देशभरातील प्राध्यापक, संशोधक, आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने 50 हून अधिक सहभागी संशोधकांनी सहभाग नोंदविला.

यावेळी SSVPS धुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उपस्थित अंशी संवाद साधताना त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर प्रकाश टाकला. त्यांनी वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील आधुनिक आव्हाने, संधी आणि शाश्वत विकासासाठी डिजिटल परिवर्तनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री. वीरेंद्र सोनटक्के (Lead Product Manager, Mastercard, Pune) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी "The Intelligence That Scales: What AI is Doing to Commerce & What It Demands of You" या विषयावर सविस्तर व्याख्यान दिले. आपल्या भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वाणिज्य आणि व्यवस्थापन क्षेत्रात घडवून आणत असलेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला. ग्राहकांच्या गरजा ओळखणे, व्यवहारांचे विश्लेषण करणे, निर्णय प्रक्रिया अधिक अचूक करणे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढविणे यामध्ये AI ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी डॉ. पराग नारखेडे, प्राचार्य, डी.एन.सी. महाविद्यालय, जळगाव यांनी "कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाणिज्य क्षेत्रातील बदलते स्वरूप" या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) ही आधुनिक वाणिज्य क्षेत्रातील क्रांतिकारी तंत्रज्ञान असल्याचे सांगितले. व्यवसायातील निर्णय प्रक्रिया अधिक परिणामकारक बनविण्यात AI ची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. नारखेडे यांनी ई-कॉमर्स, डिजिटल पेमेंट प्रणाली, ग्राहक सेवा, विपणन (Marketing) आणि डेटा विश्लेषण (Data Analytics) या क्षेत्रांमध्ये AI मुळे मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असल्याचे नमूद केले.

या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डिजिटल व्यवसाय, डेटा अॅनालिटिक्स, ई-कॉमर्स, सायबर सुरक्षा आणि शाश्वत व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर संशोधन निबंध सादर करण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध तांत्रिक सत्रे, चर्चासत्रे आणि विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले. या चर्चांमधून सहभागी संशोधक व विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील नव्या संधी आणि आव्हानांची सखोल माहिती मिळाली.

या परिषदेमुळे विद्यार्थी व संशोधकांना नवीन तंत्रज्ञान, संशोधनाच्या संधी आणि उद्योगक्षेत्रातील नव्या प्रवाहांची माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, आयोजन समिती, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे विशेष योगदान लाभले. सहभागी संशोधकना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.

परिषदेचे मुख्य संरक्षक म्हणून डॉ. उल्हास पाटील, परिषदेसाठी संरक्षक म्हणून डॉ. प्रशांत एस. वारके, डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. अनिल पी. डोंगरे, डॉ. पी. आर. चौधरी, डॉ. ए. पी. सरोदे आणि डॉ. सुषमा एस. पाटील, डॉ. माधुलिका सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

परिषदेची डॉ. चेतन सरोदे यांनी जबाबदारी सांभाळली. संयोजक म्हणून डॉ. प्राजक्ता आर. पाटील यांनी परिषदेचे नियोजन व समन्वय यशस्वीपणे पार पाडले, तर परिषद सचिव म्हणून प्रा. आफरीन खान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आयोजन समितीमध्ये डॉ. नीलिमा पी. वारके, डॉ. चेतन बी. सरोदे, डॉ. प्राजक्ता आर. पाटील, प्रा. स्मिता एन. चौधरी, प्रा. वैजयंती पी. असोदेकर, प्रा. आफरीन वाय. खान, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दीपक दांडगे, प्रा. चारुशीला चौधरी, प्रा. हर्षिता तलरेजा, प्रा. प्रशांत बाहेकर, प्रा. लीना पाटील, प्रा. मानसी अहिरे आणि प्रा. साक्षी पोलाखरे यांचा समावेश होता.

गोदावरी आय. एम. आर. मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा !जळगाव - आज 5 जून रोजी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्स...
05/06/2026

गोदावरी आय. एम. आर. मध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा !

जळगाव - आज 5 जून रोजी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रा. स्मिता चौधरी यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जनजागृतीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त परिसर जलसंवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण याबाबत संदेश दिले व सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छ केला.

यंदाचा विश्व पर्यावरण दिन हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण याविषयी जनजागृती करण्यावर केंद्रित आहे जगभरात हा दिवस पर्यावरण संरक्षण ना साठी कृती करण्याचे आवाहन करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली, यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

19/05/2026
गोदावरी आय. एम. आर मधील पाच दिवसीय नॅशनल प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) उत्साहात संपन्न !       जळगाव - गोदावरी आय. एम...
15/05/2026

गोदावरी आय. एम. आर मधील पाच दिवसीय नॅशनल प्राध्यापक विकास कार्यक्रम (FDP) उत्साहात संपन्न !

जळगाव - गोदावरी आय. एम. आर महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेला पाच दिवसीय नॅशनल ऍडव्हान्स रिसर्च मेथोडोलॉजी इथिक्स अँड ए आय टू पब्लिकेशन अँड फंडिंग याविषयी कार्यशाळेचे 11 मे पासून सुरू असलेली ही कार्यशाळा आज 15 मे रोजी उत्साहात संपन्न, या कार्यशाळेत एकूण 1342 सभासदांनी संपूर्ण भारतातून सहभाग नोंदविला होता कार्यशाळेस उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला .

या कार्यशाळेस विविध महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांनी संशोधकांनी आपले मार्गदर्शन प्रदान केले उच्च शिक्षण क्षेत्रातील संशोधन कौशल्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्राध्यापक विकास कार्यक्रमास (FDP) शिक्षक, संशोधकचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात संशोधनातील आधुनिक तंत्रज्ञान, नैतिकता, शैक्षणिक लेखन आणि संशोधन निधीसाठी प्रस्ताव लेखन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

डॉ. ज्ञानेश्वर किरंगे यांच्या “Research Ethics and Integrity in the Digital Era” या सत्रामध्ये डिजिटल युगातील संशोधन करताना नैतिक मूल्यांचे पालन, डेटा गोपनीयता, साहित्यचौर्य (Plagiarism) टाळणे आणि संशोधनातील पारदर्शकता यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

डॉ. संदीप पाटील “Digital Research Instruments and Surveys” या विषयात ऑनलाइन सर्वेक्षण साधने, डिजिटल डेटा संकलन पद्धती आणि संशोधनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

तसेच डॉ. नीता पाटील “Literature Review Using AI Tools” या विषयाच्या सत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित साधनांच्या मदतीने साहित्य समीक्षा अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक कशी करता येते, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

डॉ. प्रियंका बऱ्हाटे यांनी “Academic Writing and Publishing in High-Impact Journals” या विषयावर तज्ज्ञांनी संशोधन लेखनाची प्रभावी शैली, संदर्भ पद्धती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जर्नल्समध्ये संशोधन प्रकाशित करण्याच्या प्रक्रिया आणि आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.

डॉ. हेमंत इंगळे “Writing Research Proposals for Funding” यांच्या सत्रात संशोधनासाठी निधी मिळविण्यासाठी प्रभावी संशोधन प्रस्ताव कसा तयार करावा, उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि अपेक्षित निष्कर्ष यांचे सुसंगत सादरीकरण कसे करावे याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील (प्रेसिडेंट गोदावरी फाउंडेशन जळगाव), कॉन्व्हेनर डॉ. प्रशांत वारके (डायरेक्टर जी आय एम आर), कॉर्डिनेटर प्रा. चारुशीला चौधरी , ऑर्गनायझिंग कमिटी डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.वैजयंती असोदेकर, ॲडव्हायझरी कमिटी डॉ. पराग नारखेडे (प्रिन्सिपल DNC व्हीपीएस एम पी व्ही पी जळगाव), डॉ. जी के पटनाईक( प्रिन्सिपल एस एस बी टी जळगाव) डॉ. मनोज बेहरे (असिस्टंट डायरेक्टर हेड ऑफ एमसीए शिरपूर), डॉ. प्राजक्ता पाटील (जीआयएमआर जळगाव), कॉर्डिनेटिंग कमिटी प्रा. पायल भंगाळे, प्रा. लीना पाटील यांनी केले आहे.

सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे, या प्राध्यापक विकास कार्यक्रम FDP मुळे सहभागी शिक्षक व संशोधकांना आधुनिक संशोधन पद्धतींबाबत नवे ज्ञान मिळाले असून, त्यांच्या संशोधन कार्याला निश्चितच चालना मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला,

12/05/2026

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या “ऍडव्हान...

गोदावरी आय. एम. आर मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन !जळगाव -  गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे ऍडव्हान्स रिसर्च...
11/05/2026

गोदावरी आय. एम. आर मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन !

जळगाव - गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे ऍडव्हान्स रिसर्च मेथोडोलॉजी इथिक्स अँड ए आय टू पब्लिकेशन अँड फंडिंग या याविषयी कार्यशाळेचे 11 मे आज पासून सुरुवात करण्यात आली , तरी या कार्यशाळेत एकूण 1342 सभासदांनी संपूर्ण भारतातून आपला सहभाग नोंदविला आहे. ही कार्यशाळा 11 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये पार पडणार आहे, तरी त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे.

या कार्यशाळेस विविध महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक संशोधक पुढील प्रमाणे 11 मे डॉ. ज्ञानेश्वर किरंगे , 12 मे डॉ. संदीप पाटील , 13 मे डॉ. नीता पाटील (मुंबई), 14 मे डॉ. प्रियंका बऱ्हाटे , 15 मे डॉ. हेमंत इंगळे या मान्यवरांचे मार्गदर्शन या पाच दिवसीय कार्यशाळेस लाभणार आहे.

AI आधारित संशोधन साधनांचा प्रभावी वापर, प्लॅजिअरिझम टाळण्याचे मार्ग, Scopus/UGC Care जर्नल्समधील प्रकाशन प्रक्रिया, संशोधन प्रस्ताव लेखन आणि राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय संशोधन निधी योजनांविषयी माहिती दिली जाणार आहे.

कार्यशाळेत Zotero, SciSpace, Paperpal, Claude AI यांसारख्या आधुनिक AI संशोधन साधनांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असून. संशोधनामध्ये AI चा नैतिक वापर आणि शैक्षणिक प्रामाणिकतेचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात येईल.

तसेच संशोधन प्रकाशनातील गुणवत्ता, जर्नल निवड, संशोधन लेखनातील तांत्रिक बाबी आणि संशोधन निधी मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया यावर मार्गदर्शन मिळणार आहे. अलीकडेच भारतातील संशोधन निधी संस्थांनी AI वापर आणि संशोधन नैतिकतेबाबत कठोर नियम लागू केले असल्याची माहितीही तज्ज्ञांनी दिली जाणार आहे.

या पाच दिवसीय कार्यशाळेमुळे सहभागी प्राध्यापक व संशोधकांना आधुनिक संशोधन कौशल्य ए आय चा जबाबदारीने वापर आणि गुणवत्ता पूर्ण संशोधन प्रकाशनासाठी आवश्यक दिशा मिळणार आहे,कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील (प्रेसिडेंट गोदावरी फाउंडेशन जळगाव), कॉन्व्हेनर डॉ. प्रशांत वारके (डायरेक्टर जी आय एम आर), कॉर्डिनेटर प्रा. चारुशीला चौधरी , ऑर्गनायझिंग कमिटी डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा.स्मिता चौधरी, प्रा.वैजयंती असोदेकर, ॲडव्हायझरी कमिटी डॉ. पराग नारखेडे (प्रिन्सिपल DNC व्हीपीएस एम पी व्ही पी जळगाव), डॉ. जी के पटनाईक( प्रिन्सिपल एस एस बी टी जळगाव) डॉ. मनोज बेहरे (असिस्टंट डायरेक्टर हेड ऑफ एमसीए शिरपूर), डॉ. प्राजक्ता पाटील (जीआयएमआर जळगाव), कॉर्डिनेटिंग कमिटी प्रा. पायल भंगाळे, प्रा. लीना पाटील यांनी केले आहे.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !जळगाव - 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाह...
13/04/2026

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !

जळगाव - 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते ही त्यांची 135 वी जयंती असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
महाविद्यालयात यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले.
डॉ. प्रशांत वारके यांनी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर भाषण दिले, तसेच त्यांच्या विचारांवर, सामान्य माणसासाठी अस्पृश्यता कमी करण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे संविधान, अर्थव्यवस्था यामध्ये बाबासाहेबांचे समाजासाठी योगदान खूप मोठे आहे.
कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रज्ञा बाविस्कर यांनी केले.

Address

P-54, Additional MIDC, Near Bharat Petroleum
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9:30am - 5pm
Tuesday 9:30am - 5pm
Wednesday 9:30am - 5pm
Thursday 9:30am - 5pm
Friday 9:30am - 5pm
Saturday 9:30am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Godavari Institute of Management & Research posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Godavari Institute of Management & Research:

Shortcuts

Share

Category