06/10/2024
महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मृत्युंजय पुस्तक वाचले होते. त्यावेळी मी खूप प्रभावित झालो होतो आणि शिवाजीराव सावंतांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी कधी मिळाली नाही.
मात्र, यंदाचा स्व. शिवाजीराव सावंत यांच्या स्मृतीतील ‘मृत्युंजय पुरस्कार’ मला म्हणजेच दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलला जाहीर झाला, याचा खूप आनंद वाटतो आहे.
हा पुरस्कार मी मनोबल प्रकल्पात निस्वार्थ भावनेने, सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना अर्पण करतो आहे. देशात व परदेशात असलेल्या असंख्य व्यक्ती आपला वेळ, कल्पकता, कौशल्य, आणि निधी या कामासाठी देतात. ते इतर लोकांनाही या कार्याशी जोडतात. काही व्यक्ती तर महिन्याचे अनेक दिवस पुणे व जळगाव येथे संस्थेत येऊन मुलांसोबत राहतात आणि त्यांच्यासाठी काम करतात. आपली मुलं ज्या ठिकाणी शिकत आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती त्यांच्या राहण्याची, आरोग्याची आणि शिक्षणाची काळजी घेतात.
अशा स्वयंप्रेरणेने, निस्वार्थ आणि सातत्यपूर्ण योगदान देणाऱ्या संस्थेच्या आजीवन सदस्यांना मी हा पुरस्कार अर्पण करतो आहे.
आपण पुण्यात असाल तर कृपया या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा.
७.ऑक्टोबर, संध्याकाळी ६ वाजता, पत्रकार भवन ,नवी पेठ, पुणे.
उपस्थिती बाबतची निश्चिती कृपया कळवावी.
धन्यवाद.