15/10/2024
*विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, सावखेडे, वाघनगर जळगाव.*
*गुणवत्ता विकास विभाग*
मार्गदर्शक :- *प्राचार्य डॉ संदीप माधवराव पाटील* ( प्राचार्य - श्री गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज , जळगाव)
विषय: *अभ्यास कसा करावा या संबंधी मार्गदर्शन*
दिनांक 15 ऑक्टोबर 24 मंगळवार रोजी गुणवत्ता विकास विभाग अंतर्गत प्राचार्य डॉ संदीप माधवराव पाटील यांचं मार्गदर्शन वर्ग नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी,अभ्यास कसा करावा विषयावर घेण्यात आले.या प्रसंगी मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील,समन्वयिका सौ वैशाली पाटील, श्री सचिन गायकवाड उपस्थित होते.
आजच्या मार्गदर्शन सत्रात अभ्यास कसा करावा या विषयाला अनुसरून प्राचार्य डॉ संदीप माधवराव पाटील यांनी खालील मुद्दे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
अभ्यास म्हणजे काय ? मनाला वारंवार स्वतःमध्ये प्रस्थापित होण्याच्या उद्दिष्टाकडे निर्देशित करण्याच्या प्रक्रियेला अभ्यास म्हटले जाते असे त्यांनी विविध उदाहरणे सांगून समजावले.
अभ्यास करणे अनेकदा कठीण काम वाटू शकते, परंतु योग्य दृष्टिकोनाने, ते प्रभावी आणि आनंददायक दोन्ही कसे करायचे या बाबत माहिती दिली. अभ्यासाच्या सवयी वाढवण्याची आणि शैक्षणिक उत्कृष्टता प्राप्त करण्याच्या आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी चांगला अभ्यास कसा करायचा याबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शन त्यांनी दररोजच्या उदाहरणातून सांगितले.
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे वेळापत्रक विकसित करणे, आवश्यक आहे कारण ते वेळेचे व्यवस्थापन वाढवते आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या सवयी सुनिश्चित करते. अभ्यासासाठी विशिष्ट वेळेचे वाटप करून नियोजन करावे,अभ्यास गटांमध्ये सामील होणे, विद्यार्थ्यांमधील संवाद सखोल समज वाढवतो, शंका दूर करतो आणि संवाद कौशल्य वाढवतो. अभ्यास गट प्रेरणा आणि समर्थन देखील प्रदान करतात, ज्यामुळे शिकण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक बनते तसेच
दिनचर्या तयार करा,झोपेची पद्धत, खाण्याच्या सवयी, व्यायाम यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. मेंदूला आराम देण्यासाठी ,उत्साही राहण्यासाठी थोडा ब्रेक घ्या आणि पुन्हा सुरुवात करा. दररोज थोडा वेळ अभ्यास करा. अभ्यासासाठी एक शांत, आरामदायक जागा शोधा. तुमची अभ्यासाची जागा दूरदर्शन, सोशल मीडिया आणि मोठा आवाज यासारख्या विचलितांपासून दूर ठेवा.पौष्टिक आहार घ्या , चांगली फळे, भाज्या, कडधान्ये शरीराचं पोषण करतात आणि मेंदूची कार्यशक्ती वाढवतात. तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी योगा, मेडीटेशन, ध्यान या सारख्या गोष्टींची सवय अंगी बाळगा . अभ्यासाचा विषय जसा कळू लागेल, आकलन वाढू लागेल तशी अभ्यासाची गोडी आपोआप वाढेल.असे मार्गदर्शनात सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सचिन गायकवाड यांनी केले. गुणवत्तापूर्ण विकास अंतर्गत कार्यक्रमाला मा मुख्याध्यापक श्री हेमराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयिका सौ वैशाली पाटील,श्री सचिन गायकवाड, श्री आकाश शिंगाने,श्री श्रीराम लोखंडे यांचे सहकार्य लाभले.