23/05/2020
दीपस्तंभ मनोबल च्या प्रज्ञाचक्षु विद्यार्थांचे बँकिंग परीक्षेत यश....!
IBPS PO व clerk या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत दीपस्तंभ मनोबल च्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले आहे.मनोबल पुणे प्रकल्पातील विद्यार्थी अक्षय बोरीकर नागपूर (प्रज्ञाचक्षू) प्रोबेशनरी ऑफिसर बँक ऑफ इंडिया ,मनोबल जळगाव येथील जीवन ओंकार यवतमाळ (अल्प दृष्टी) प्रोबेशनरी ऑफिसर युनियन बँक ऑफ इंडिया तर दीपक बांगर बीड (अल्प दृष्टी) , विक्रम सावज राहुरी (अल्प दृष्टी) यांची क्लर्क या पदासाठी बँक ऑफ इंडिया मध्ये निवड झाली आहे. तसेच मृणाल पांडे नागपूर (अल्प दृष्टी) हीची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लर्क पदासाठी निवड झाली आहे .आशिष बोरीकर याची LIC असिस्टंट म्हणून मागील वर्षी निवड झाली होती व तो सध्या भंडारा येथे कार्यरत आहे.
मनोबल प्रकल्पातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक यजूर्वेद्र महाजन ,संस्थेचे संचालक ,सहकारी व शिक्षकांनी फोनवर शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
दीपस्तंभ मनोबल मधील अभ्यास पूरक वातावरण ,येथील शिक्षकांचे मिळालेले योग्य मार्गदर्शन व घरच्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो अश्या भावना निर्माण विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
*दीपस्तंभ मनोबलचे संस्थापक यजूर्वेंद्र महाजन यांची प्रतिक्रिया*-
संस्थेचे पूर्ण वेळ काम करणारे सहकारी, मार्गदर्शक यांची मेहनत व मनोबलच्या कार्यावर विश्वास ठेवून वंचित विद्यार्थांचे आयुष्य घडावे म्हणून योगदान देणारे सर्व देणगीदार यांच्या शुभेच्छा व आशीर्वादामुळे संस्था वाटचाल करीत आहे .त्या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करितो.या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे सर्वस्वी त्यांनी केलेल्या कष्टाचे फळ आहे.त्यांचे व त्यांच्या परिवाराचे मनस्वी अभिनंदन!