27/01/2015
दृष्टी-व्हिजन फॉर ब्लाइंड “ या संस्थेमार्फत प्रज्ञाचक्षु विद्यार्थांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबवीले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणून प्रज्ञाचाक्षु विद्यार्थ्यासाठी मदत करणा-या सामाजिक व शैक्षणिक संस्थाना “ प्रथम दृष्टी-पुरस्कार-२०१५ ” देऊन गौरविण्यात आले. यामध्ये Fergusson College, Prof. Ramkrushn More College Aakurdi Wadiya College , Modern College Shivajinagar , Social Science Center, Bharti Vidyapeeth या Educational संस्था व Aanandwan Mitra Mandal Pune , Mamta Andh Anath Kalyan Kendra , JCI Pune Knowledge City, MaitraYuva Foundation , Niwant Andh Mukt Vikasalay , या social संस्थांचा समावेश होता.
दृष्टी-व्हिजन फॉर ब्लाइंड या संस्थेचा २६ जानेवारी २०१५ रोजी दुसरा वर्धापन दिन व प्रथम दृष्टी पुरस्कार-२०१५ वितरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी जेष्ठ शिक्षणतज्ञ श्री. न.म.जोशी यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमासाठी Dr. SAnjay Kumar Dalavi NSS Programme Coordinator ), प्रा. वराडे NSS PO Modern College,संस्थेचे अध्यक्ष - सागर धुमाळ, सचिव - भुलेश्वर बोरुडे, खजिनदार - भावना कुतवळ, व इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रम प्रसंगी कोथरूड ब्लाइंड शाळेतील Visually Impaired मुलींनी नृत्य केले , विशेष म्हणजे गौरव महाराष्ट्राचा या ई टीव्ही वरील कार्यक्रमातील गायक प्रज्ञाचक्षु विशाल या विद्यार्थ्याने आपल्या गायनाने प्रमुख पाहुण्यांची व उपस्थितांची मने जिंकून घेतली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी Modern College व दृष्टी चे स्वयंसेवक अमर खारतोडे, मोहसीन शेख, दिप्ती हजारी, मीनानाथ लोहकरे,स्वप्नील वाळुंज,विनायक धुत,नितीन पाटील, प्रमोद पाटील,सोपियान शेख,अमर पाटील,भरत मोटे,अशोक, सचिन,शुभम,विजय,चित्रा,कोनिका, यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुषण कुतवळ व आरती घेमुड यांनी केले.प्रस्तावना-भावना कुतवळ,अहवाल वाचन-सागर धुमाळ व आभार प्रदर्शन भुलेश्वर बोरुडे यांनी केले.