Rajarambapu Patil Military School & Sport's Academy

Rajarambapu Patil Military School & Sport's Academy "Knowledge is a key of successful life" A person flourished with knowledge is always following by each and every kind of happiness.

So it's rightly said that "Knowledge is a key of successful life" Inspiring by thought of yogi Vash*tha a great reformer Mr. Vinayakrao Jaykar Patil establishred "Krishna Education Society" and one of the root is "Rajarambapu Patil Military School and Sports Academy, Islampur" has been started in 2003.

सस्नेह निमंत्रण...🙏🙏आमच्या कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू पाटील स्कूल अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक...
11/12/2025

सस्नेह निमंत्रण...🙏🙏
आमच्या कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू पाटील स्कूल अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या संकुलामध्ये "कृष्णा कार्निवल 2025" चे दिनांक 14 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आयोजित केलेले आहे. आपण सहकुटुंब शाळेमध्ये उपस्थित राहून आपल्या पाल्याचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे व संकुलामध्ये आयोजित विविध मैदानी स्पर्धा, सायन्स एक्जीबिशन, आर्ट अँड क्राफ्ट एक्जीबिशन, मिलिटरी बँड सादरीकरण, नृत्याविष्कार आणि फूड फेस्टिवल अशा सर्व कलागुणांचा आणि उपक्रमांचा आनंद घेण्यासाठी आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
धन्यवाद,
प्राचार्य,

09/12/2025

Amazing & incredible practice by the students of RBP Military School.

01/11/2025

राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूरसाठी आजचा ऐतिहासिक क्षण.
कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचालित राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर या संकुलाची स्थापना या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायकराव पाटील सर आणि सचिव सौ मनिषाताई पाटील यांनी सन 2003 साली अतिशय कष्टामधून आणि कोणत्याही आर्थिक, सामाजिक मदतीशिवाय या संकुलाची पायाभरणी केली. सातत्याने या संकुलामध्ये वाढणारी विद्यार्थी संख्या आणि या संकुलामधून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन आज 1800 हून अधिक विद्यार्थी या संकुलामध्ये ज्ञानार्जन करत आहेत. आपल्या परिसरामधील सर्व काबाडकष्ट करणाऱ्या लोकांच्या हाताला यश यावं आणि त्यांच्या मुलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तमरीत्या यशस्वी व्हावे, एक आदर्श नागरिक होऊन आपल्या देशाची सेवा करावी ही मनोमन इच्छा कायम ठेवून आपल्या परिसरामध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरू करून समाजसेवेचे कार्य कायम ठेवले. आज या सर्वांसाठीच एक ऐतिहासिक क्षण आणि तो म्हणजे या संकुलाला सीबीएससी नवी दिल्ली यांची मान्यता मिळाल्यामुळे या संकुलाच्या यशामध्ये आणि श्री विनायकराव पाटील सर आणि सौ मनीषाताई पाटील यांनी घेतलेली कठोर मेहनत, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवत हे यश संपादन केले याबाबत या दांपत्याचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, असंख्य विद्यार्थी, पालक आणि या संस्थेचे सर्व संचालक आणि हितचिंतक यांच्याकडून आपल्याला मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरिता आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. आपण घेतलेले हे शैक्षणिक आणि समाजसेवेचे व्रत असेच वृद्धिंगत व्हावे आणि आपल्या संकुलामधून असंख्य विद्यार्थी अधिकारी आणि मोठ्या मुद्द्यावर जाऊन आपल्या संकुलाचे नाव लौकिक करून संपूर्ण देशामध्ये आणि परदेशामध्ये आपल्या शाळेचा दबदबा कायम राहावा ही श्री स्वामी चरणी प्रार्थना.
💐💐🌹💐💐

राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर च्या विद्यार्थ्यांनी कागद आणि इतर साहित्या पासून सुंदर अस...
19/10/2025

राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर च्या विद्यार्थ्यांनी कागद आणि इतर साहित्या पासून सुंदर असे आकाश कंदील बनवले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विनायकराव पाटील, संस्थेच्या सचिव सौ. मनिषाताई पाटील यांच्या प्रेरनेने हा उपक्रम पार पडला. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

ll श्री स्वामी समर्थ ll' सेवा परमो: धर्म ' असे मानून मृत्यू समोर असतानाही त्याच्या  जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान द...
28/07/2025

ll श्री स्वामी समर्थ ll

' सेवा परमो: धर्म ' असे मानून मृत्यू समोर असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणाऱ्या 22 - 23 वर्षाच्या तेजोमय स्पुलिंगाना श्रद्धांजली वाहण्याचा आजचा दिवस, म्हणजेच 'कारगिल विजय दिवस'. राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर मध्ये कारगिल विजय दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या विजय दिवसासाठी प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन विजय कदम, सुभेदार मेजर संजय शिंदे, हवलदार भरत सुतार, हवालदार रमेश भोरे, हवलदार संजय एटम ,हवलदार धनाजी सूर्यवंशी, हवलदार संदीप पाटील, PSI राजेंद्र पाटील, अथर्व जाधव यांची उपस्थिती मोलाची होती. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक आदरणीय विनायक पाटील सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य मन ,मनगट आणि मस्तिष्क यांच्या जोरावर सिद्धीस न्यायचे आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या सचिव आदरणीय सौ. मनीषा ताई पाटील मॅडम, इंग्रजी माध्यमाचे प्रिन्सिपल श्री.अशोक करे सर, ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल सौ. अलका करे मॅडम, सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका आशाराणी खोत मॅडम, सेमी इंग्रजी माध्यमाचे HOD श्री. संजय चव्हाण सर, सुप्रिया पाटील मॅडम, मनीषा जंगम मॅडम ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.

-vq5gs #2025 ...

"शाळा आमची लहान शिक्षणाने आहे महान , नंबरात येतात पोरे, आदर्श घेतात सारे." याच प्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीतील विद्यार्थ्या...
17/06/2025

"शाळा आमची लहान शिक्षणाने आहे महान , नंबरात येतात पोरे, आदर्श घेतात सारे." याच प्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी आपल्या शाळेला प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवलेली आहे. त्यामुळेच आपल्या या संकुलात विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली दिसून येते. आज १६ जून शाळेचा पहिलाच दिवस असलेने मुलांच्या स्वागतासाठी शाळेने खूप छान उपक्रम राबवलेला होता. पावसाने हजेरी लावली असली तरी देखील विद्यार्थ्यांना कपाळी गंध लावून,औक्षण करून विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. विद्यार्थी जेव्हा आत आले त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कोल्ड फायर व बलून डेकोरेशन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी भीम, चुटकी, डोरेमोन, बालगणेश यासारखे अनेक मेस्कॉट मागवण्यात आले होते. शैक्षणिक गुढी उभारून विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक वर्षात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सर्वाचा मनमुरात आनंद घेतला.यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक आदरणीय विनायक पाटील सर, सचिव सौ.मनीषाताई पाटील मॅडम,प्रिन्सिपल आदरणीय अशोक करे,ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल अलका करे मॅडम,संजय चव्हाण सर, सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका आशाराणी खोत, सुप्रिया पाटील, मनीषा जंगम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सर्वांनीच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

-vq5gs #2025 #2026 ...

24/05/2025
विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक आणि सुसंस्कृत विकासासाठी श्री विनायकराव पाटील व सौ मनीषाताई पाटी...
24/05/2025

विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक आणि सुसंस्कृत विकासासाठी श्री विनायकराव पाटील व सौ मनीषाताई पाटील या दांपत्यानी सन 2003 साली सुरू केलेले कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी इस्लामपूर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व सोयीनीं युक्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे एकमेव संकुल आहे. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश या संकुलामध्ये करून निश्चित रहा. आपल्या पाल्यास एक आदर्श आणि यशस्वी नागरिक बनविण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी पुढील YouTube Link ला अवश्य भेट द्या. https://youtu.be/gNJaT4gUJN0?si=pVqUS2rD_VCTJHvs

कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज इस्लामपूर या संकुल...
14/05/2025

कृष्णा एज्युकेशन सोसायटी संचलित राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल अँड स्पोर्ट्स अकॅडमी व ज्युनिअर कॉलेज इस्लामपूर या संकुलातील फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या 10 वी सेमी, 12 वी विज्ञान आणि 10th CBSE या सर्व विभागाचा 100 टक्के निकाल लागला. सर्वच विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व संकुलातील सर्व सदस्य यांचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायकराव पाटील सर व सचिव सौ मनीषाताई पाटील आणि कृष्णा परिवाराकडून अभिनंदन केले व येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी आणि या यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपण सर्वांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न, विद्यार्थ्यांनी घेतलेले कठोर परिश्रम आणि आई वडील यांचे आशीर्वाद याचे उत्कृष्ट फलित म्हणजेच आपले हे यश आहे. आपणास मिळालेल्या या यशामुळे हुरळून न जाता भविष्यामध्ये येणाऱ्या कठोर समस्यांना अति उत्कृष्टपणे सामोरे जात आपल्या जीवनातील अंतिम ध्येय निश्चित करण्यासाठी सर्वांनी कठोर परिश्रम आणि मेहनत घेतली पाहिजे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विनायकराव पाटील सर यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करताना व्यक्त केले.

🚩🚩 *स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा हो...
19/02/2025

🚩🚩 *स्वराज्याचा ज्याला लागतो ध्यास रयतेचे सुख ही एकच मनी होती आस मुघलांनाही कधी न कळला त्याचा गनिमी कावा असा वाघिणीचा होता तो छावा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. रणांगण दणाणलं, सिंह गर्जला, मावळ्यांच्या रक्तात तेज उसळलं! पराक्रमाची गाथा लिहून गेला जो, तो एकच – छत्रपती शिवराय! छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा.* 🚩🚩

Address

Krishna Education Society In Front Of Walwa Bazar, 2nd Floor, Acharya Jawdekar Complex
Islampur
415409

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918788523708

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarambapu Patil Military School & Sport's Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rajarambapu Patil Military School & Sport's Academy:

Shortcuts

Share

Category