25/11/2018
खूप महत्त्वाचे!!!!
इचलकरंजी नगरी वस्त्रनगरी म्हणून संपूर्ण देशात ओळखली जाते.इचलकरंजी आणि आजूबाजूच्या भागात आणि शहरात वस्त्रोद्योग इतका झपाट्याने वाढतोय कि हा भाग आता टेक्सटाईल हब म्हणून ओळखला जातो.मधल्या काळात हा व्यवसाय थोडा मंदावु लागला होता.याच महत्त्वाचं कारण म्हणजे तंत्रज्ञानातील मागासलेपणा.
पण अलीकडच्या काळात वस्त्रोद्योगाने कात टाकली आणि जगाला टक्कर देईल असं तंत्रज्ञानाचा उपयोग सुरु केला.सध्याच प्रगत तंत्रज्ञान म्हणजे एअर जेट आणि रॅपियर विविंग टेक्नॉलॉजी.अगोदरच्या पॉवरलूम म्हणजेच साध्या मागापेक्षा कितीतरी वेगाने उत्पादन देणारं हे तंत्रज्ञान च वस्त्रोद्योगचं वर्तमान आणि भविष्य आहे.
पण सध्या या क्षेत्रात टेकनीशीयन म्हणजे च लुममास्टर ची इतकी कमतरता आहे की यासाठी लागणारे मास्टर बाहेरून मागवावे लागतात.एअर जेट किंवा रॅपियर लुम चा मास्टर म्हणजे तो व्यक्ती जो या मशिन बद्दल सर्व जाणतो,त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवतो,आणि मशीन संदर्भातले निर्णय घेतो.सध्या कोणत्याही लुम च्या खात्यात एक गोष्ट बघायला मिळते कि लुम मास्टर च त्या खात्याचा मॅनेजर असतो.म्हणजे जर तंत्रज्ञान अवगत असेल सदर व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करू शकते,ते हि अगदी कोणत्याही डिग्री शिवाय!
हे तंत्रज्ञान आणि त्यामधील troubleshooting हे आपल्या कडच्या टेक्स्टाईल इंजिनियरिंग कॉलेज मध्ये हि शिकवलं जात नाही.
याचाच विचार करून आणि त्यामधल्या नोकरीच्या अफाट संधींचा विचार करून महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्युट इचलकरंजी मध्ये एयर जेट मास्टर हा कोर्स घेतला जातो.या मध्ये बेसिक विविंग,वार्पिंग,ऍडव्हान्स सायझिंगए,एअरजेट विविंग,एअर जेट विविंग मेंटनंस,एअर जेट विविंग ट्रबलशूटिंग,फॅब्रिक अनालीसीस हा सगळा भाग एकाच कोर्स मध्ये शिकवला जातो.तसेच वेळोवेळी या क्षेत्रातल्या एक्स्पर्ट्स मान्यवरांची मार्गदर्शक सेशन्स सुद्धा आयोजित केली जातात.त्यामधून विद्यार्थी या क्षेत्रात अगदी परिपूर्ण बनतो.
यासाठी कोण ऍडमिशन घेऊ शकतात?
1.फक्त मास्टर वर न अवलंबून राहू इच्छिणारे लुम मालक.
2.सध्या या लुम बरोबर काम करणारे दिवानजी,बीम गेटर्स व ऑपरेटर्स.
3.आकर्षक करियर बनवू इच्छिणारे 12 वी पास तरुण.
या क्षेत्रातलं करियर म्हणजे यशाची हमखास गॅरंटी .फक्त गरज आहे ती तुमची करियर वाट चोखंदळ पणे निवडण्याची! महाराष्ट्र टेक्निकल इन्स्टिट्युट आणि टेक्स्टविक अकॅडेमीस संचलित
"एअर जेट एक्सपर्ट कोर्स"
पत्ता:महाराष्ट्र टेकनिकल इन्स्टिट्युट ,जनता बँके जवळ,मराठा मंडळ बिल्डिंग,इचलकरंजी.
ऍडमिशन सुरु ..
पात्रता:१२ वी पास
Contact
9730235864
Office 02302426287