Vivek Vardhini Kanya Shala

Vivek Vardhini Kanya Shala Vivek Vardhini Kanya, Rangmahal Road, Gowliguda Hyderabad. This is the Official Page page of the School. This year the School is celebrating its centenary. V.V.

Recognizing the importance of Women’s education V.V. Kanyashala was established in 1916 as a Primary School. It was upgraded to full fledged High School in 1936 and the students appeared for matriculation examination of Nagpur University. However from 1947 onwards girl’s students started appearing for S.S.C. Exam conducted by the Board. Kanyashala has its own spaceous building with well furnished class rooms, a sprawling campus and easily accessible location. The school offers instructions in English and Marathi media with Telugu and Hindi as second languages. Classes in English medium are from 6th to 10th, where as in Marathi Medium they are from 1st to 10th.

29/07/2016

*ATTENTION - IMPORTANT ANNOUNCEMENT FROM VVES*
Dear alumni.....
As mentioned earlier there is already a Vivek Vardhini alumni association under Vivek Vardhini education society, which is doing yeomen services silently to the cause of education in vves The bank account and funds of the same are under the direct and proper supervision of the President, Secretary and Treasurer of vves. Also there is a separate committee for its alumni association..... The new alumni association is formed without the approval of the vves management* ....It is observed that they are going to media with wrong information....Now, it is also observed that the newly formed association is asking for funds for vves students and upkeep of the premises. *plz be informed that the vves management is not asking for any funds from anyone* Hence, it is suggested that any past student or well wisher interested in supporting any noble cause for vves should contact the VVES management directly.
The above message is issued in the interest of VVES in consent with president and majority of office bearers along with some G.C members.
_On behalf of VVES_
Anil Rajeshwarkar
Joint Secretary, VVES

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर...
19/07/2016

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र,मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथमवंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.

महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते. भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्रएकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.

भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरुहोते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवसहोय.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?’ हेच खरे आहे.गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ll
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः ll

आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' पण म्हणता. या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरा...
15/07/2016

आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी' पण म्हणता. या दिवशी श्रीविष्णूची `श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.

28/05/2016
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।
08/03/2016

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।

२३ दिवस अंन्न व पाण्याचा त्याग करून, २६ फेब्रुअरी १९६६ रोजी, "आम्ही जातो आमुच्या गावा! आमुचा राम राम घ्यावा" असे म्हणत व...
26/02/2016

२३ दिवस अंन्न व पाण्याचा त्याग करून, २६ फेब्रुअरी १९६६ रोजी, "आम्ही जातो आमुच्या गावा! आमुचा राम राम घ्यावा" असे म्हणत वीर सावरकरांनी आखेरचा श्वास घेतला।
भारतमातेच्या ह्या वीर पुत्र "विनायक दामोदर सावरकर" यांना पुण्यतिथी निमित्त शत् शत् नमन॥
विनम्र श्रध्दांजली

तनी-मनी बहरुदे नव-जोम,होऊदे पुलकित रोम-रोम...घे तिरंगा हाती,नभी लहरु दे उंच-उंच...जयघोष मुखी,जय भारत, जय हिंद, गर्जुदे आ...
25/01/2016

तनी-मनी बहरुदे नव-जोम,
होऊदे पुलकित रोम-रोम...
घे तिरंगा हाती,
नभी लहरु दे उंच-उंच...
जयघोष मुखी,
जय भारत, जय हिंद, गर्जुदे आसमंत...

21/01/2016

Address

Gowliguda
Hyderabad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek Vardhini Kanya Shala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Vivek Vardhini Kanya Shala:

Shortcuts

Share

Category