Late Baburao Patil College ,Hingoli

Late Baburao Patil College ,Hingoli Late Baburao Patil College ,Hingoli

06/12/2025

महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन 06/12/2025
06/12/2025

महापरिनिर्वाण दिन 06/12/2025

26/11/2025

संविधान दिन

कै.बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान  दिन साजरा.
26/11/2025

कै.बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा.

18/11/2025

नशा मुक्त भारतबाबतची शपथ

“मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही.

मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू.”

नशा मुक्त भारत अभियान शपथ घेताना विद्यार्थीनशा मुक्त भारतबाबतची शपथ“मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किं...
18/11/2025

नशा मुक्त भारत अभियान शपथ घेताना विद्यार्थी
नशा मुक्त भारतबाबतची शपथ

“मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही.

मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन. व्यसनमुक्त, निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू.”

06/10/2025

मैदानी स्पर्धेत सतिश चव्हाण याने प्रथम क्रमांक प्राप्त केला

हिंगोली : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व के. के. एम. महाविद्यालय मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत कै. बाबुराव पाटील महाविद्यालयाचा खेळाडू सतिश वामन चव्हाण याने आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत 400 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक तर 5 की.मी. धावणे तिसरा क्रमांक पटकावला
या यशाबद्दल मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, संस्थेचे अध्यक्ष रणजित भाऊराव पाटील गोरेगावकर ,प्राचार्य डॉ. जयवंत भोयर, डॉ. गोमचाळे, डॉ. सातपुते डॉ. लोकरे, रणजित काकडे , डॉ. दिनकर हंबर्डे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

मैदानी स्पर्धेत सतिश  चव्हाण याने प्रथम क्रमांक प्राप्त केलाहिंगोली : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व क...
06/10/2025

मैदानी स्पर्धेत सतिश चव्हाण याने प्रथम क्रमांक प्राप्त केला

हिंगोली : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व के. के. एम. महाविद्यालय मानवत यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत कै. बाबुराव पाटील महाविद्यालयाचा खेळाडू सतिश वामन चव्हाण याने आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत 400 मीटर मध्ये द्वितीय क्रमांक तर 5 की.मी. धावणे तिसरा क्रमांक पटकावला
या यशाबद्दल मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, संस्थेचे अध्यक्ष रणजित भाऊराव पाटील गोरेगावकर ,प्राचार्य डॉ. जयवंत भोयर, डॉ. गोमचाळे, डॉ. सातपुते डॉ. लोकरे, रणजित काकडे , डॉ. दिनकर हंबर्डे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

कै. बाबुरावजी पाटील महाविद्यालयात “विकसित भारत @ 2047” व्याख्यानाचे आयोजन…          केंद्र शासनाच्या विकसित भारत @ 2047 ...
21/09/2025

कै. बाबुरावजी पाटील महाविद्यालयात “विकसित भारत @ 2047” व्याख्यानाचे आयोजन…

केंद्र शासनाच्या विकसित भारत @ 2047 या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या माध्यमातून दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 दरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कै. बाबुरावजी पाटील महाविद्यालय, हिंगोली यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने “विकसित भारत @ 2047 मध्ये युवकांचा सहभाग” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत एस. भोयर होते. प्रमुख पाहुणे व प्रमुख व्याख्याते म्हणून ब्रह्माकुमारी अरुणा दिदी (केंद्र संचालिका, ब्रह्माकुमारी युवा शाखा, महिला शाखा, व्यवसाय शाखा सदस्य, हिंगोली जिल्हा) तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीता संजय चौधरी (अग्रवाल बहुमंडळ अध्यक्ष व अखिल भारतीय मारवाडी महिला सम्मेलन महाराष्ट्र प्रदेश सचिव) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन स्वागत करून करण्यात आले.
ब्रह्माकुमारी अरुणा दिदी यांनी नशामुक्त भारत अभियानाबाबत अत्यंत सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना समजावले की व्यसन हा केवळ वैयक्तिक प्रश्न नसून तो कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीवर परिणाम करणारा मोठा सामाजिक प्रश्न आहे. व्यसनमुक्त जीवनासाठी मानसिक शिस्त, सकारात्मक विचारसरणी आणि योग्य संगतीचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच ब्रह्माकुमारी संस्था युवकांसाठी चालवत असलेल्या विविध जागरुकता उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी होण्याचे आवाहन केले.
सौ. संगीता चौधरी यांनी युवक हे भारताचे खरे शिल्पकार असल्याचे सांगून त्यांना शारीरिक, मानसिक आणि चारित्र्यदृष्ट्या सक्षम राहण्याचे आवाहन केले. त्यांनी आरोग्य, खेळ, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांवर भर देत तरुणांनी आजपासूनच स्वतःला तयार करून भारताला 2047 मध्ये जागतिक महासत्ता बनविण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री. मांडगेमामा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शेती आणि जोडधंद्याचे महत्त्व स्पष्ट केले. आधुनिक शेतीतंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, जलसंधारण तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन यांसारख्या कृषीपूरक उद्योगांद्वारे ग्रामीण युवकांनी आत्मनिर्भर बनावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संभाजी पाटील यांनी केली, तर आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.डॉ. माणिक डोखळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कुमारी पूनम कांबळे यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली.
या व्याख्यानास महाविद्यालयातील माजी प्राचार्य डॉ. भागवत सावके, डॉ. कृष्णा इंगळे, डॉ. दिनकर हंबर्डे, तसेच प्राध्यापिका डॉ. मंगला खुपसे, प्राध्यापिका डॉ. सरदार मॅडम, प्रा. डॉ. वामन, प्रा. डॉ. ढवळे व इतर प्राध्यापक मंडळी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी विशेष परिश्रम घेतले.

16/09/2025

हिंदी भाषा दिवस निमित्ताने हिंदी साहित्यमंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

दि. 16/09/2025 रोजी कै. बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय हिंगोली, येथे हिंदी भाषा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ जे एस भोयर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ एन.एम.फड व डॉ.एस.बी. दुधाटे मैडम होते. प्रथम अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ एम .एस.खुपसे मैडम यांनी केले. यावेळी हिंदी साहित्यमंडळाचे उद्घाटन करण्यात आले. चेतना इंगोले (अध्यक्ष), अर्जुन कुरील (सचिव), आयेशा फहीन (सहसचिव), नर्गिस गवळी (उपाध्यक्ष), भाग्यश्री भंडगे (कोषाध्यक्ष), तनुजा पडघन (सदस्य), सुरेश अंभोरे (सदस्य) या पदावर नियुक्ती करण्यात आली. प्रमुख पाहुण्यानी आपले मनोगत व्यक्त केले. 14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदी भाषा ला राजभाषा चा दर्जा देण्यात आला. जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी हिंदी भाषा एक आहे. हिंदी भाषा चा प्रचार प्रसार साठी आपण प्रयत्नशील असायला हवे. अशा प्रकारे कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यात आला. बी ए तृतीय वर्ष ची विद्यार्थिनी चेतना इंगोले हीने आपले हिंदी भाषा दिवस निमित्त आपले मत व्यक्त केले. प्रा. डॉ इंगळे के . एस यांनी सुत्रसंचालन केले, डॉ सावके बी. एस, प्रा. डॉ जी.डी.घोडे,डॉ बलखंडे एस.पी, डॉ गोरे पी.ए , प्रा डॉ. पाटील एस. डी, प्रा. डॉ डी. यू.हंबर्डे, प्रा. डॉ. बी.बी राजुरकर, श्री. वाघमारे एस. एस, प्रा. सरकटे पी.टी, प्रा.वामन ए.पी,प्रा बोबडे बी.आर, प्रा. डॉ. आळसे बी.बी, प्रा. शिंदे. ए एस, प्रा बोकारे एस के,प्रा डॉ.वाडकर जे. आर, प्रा खंदारे के. आर प्रा डॉ.पवार आर.आर प्रा. डॉ.ढवळे भूषण,प्रा. डॉ. बैसठाकूर पी.ओ , श्री. घोडगे एस. आर, श्री खिल्लारी व्ही.एम, सौ.असोले सुरेखा तसेच सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

हिंदी भाषा दिवस निमित्ताने हिंदी साहित्यमंडळाचे उद्घाटन  करण्यात आले.          दि. 16/09/2025 रोजी कै. बाबुराव पाटील कला...

मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी
29/08/2025

मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी

Address

Hingoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late Baburao Patil College ,Hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category