11/04/2025
*उमंग शिशुगृहाचे उद्घाटन*
महिला व बाल विकास विभाग अतंर्गत व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारीत २०२१ नुसार जिल्ह्यामध्ये हजरत टिपू सुलतान फाउंडेशन संचलीत उमंग शिशुगृहाचे (SAA) उद्घाटन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. आर. आर. मगर यांच्या हस्ते करण्यात आले, जिल्ह्यामध्ये ० ते ६ वर्ष वयोगटातील परित्याग केलेले बालक, सोडून दिलेले बालक समर्पन केलेल्या बालकांसाठी कोण्यात्याही प्रकारची व्यवस्था नव्हती मात्र उमंग शिशुगृहामुळे ही उनिव भरुन निघणार आहे. ० ते ०६ वर्ष वयोगटातील बालकांना काळजी व संरक्षणाची अत्यंत आवश्यकता असते.
आजच्या उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल कल्याण समितीचे सदस्य, श्री. परसराम हेंबाडे, संगीता दुबे व किरण करडेकर, तसेच बाल न्याय मंडळाच्या अॅड. सशिला तांगडे म्हणून उपस्थित होते.
हजरत टिपू सुलतान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख फैसल यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. आर. आर. मगर यांनी बालकांसाठी अत्यंत महत्वाचे असले विशेष दत्तक संस्था जिल्ह्यात सुरु होत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले. व बालकांच्या अधिकारींचे संरक्षण व पुनर्वसन करण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमला संस्थेचे कार्यकारी मंडळ शेख समिर, शेख अशफाक, रहिम खान पठाण, शेख मोहम्मद जफर, शेख अलताफ बार्टी हिंगोली जिल्ह्याच्या समता दुत सुनिता आवटे, उज्वल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाईकराव, चाईल्ड हेल्प लाईनचे समन्वयक संदीप कोल्हे, श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधिक्षक रमेश पवार, बाल संरक्षण अधिकारी श्री. जरीबखान पठाण व जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सर्व अधिकारी व कर्मचारी इरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अमिना पठाण, अॅड.बी.जी. खंदारे इ. उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहुल सिरसाट व अभार प्रदर्शन रेशमा पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती सोनल सुलभेवार व सविता उरेवार यांनी परिक्षम घेतले.