28/05/2024
*ए.बी.एम. इंग्लिश स्कुलची 100 टक्के निकालाची परंपरा कायम.*
हिंगोली: येथील अशोक बांगर नगर स्थित ए.बी.एम. इंग्लिश स्कुल ची माध्यमिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) चा शंभर टक्के निकालाची पंरपरा कायम ठेवत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत यश प्राप्त केले आहे. या मध्ये शाळेतील ओमकार रामराव मुंढे यांनी 95.00 गुण मिळवुण प्रथम तर गितांजली शिवाजी बांगर हिने 92.80 गुण मिळवुण द्वितीय आणि कुणाल प्रभाकर तिडके यांनी 92.60 गुण मिळवुन तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या वेळी शाळेतील इतर विद्यार्थ्यांनी हि उत्कृष्ठ गुण मिळवुन यश प्राप्त केले आहे. शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुणापेंक्षा अधिक गुण तर 14 विद्यार्थ्यांनी 80 टक्के पेक्षा अधिक गुण व 5 विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी व पालंकानी शाळेतील शिक्षकवृदांचे आभार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष दिलीप बांगर, अंजिक्य बांगर, प्राचार्य रॉबीन वरगीस, उपप्राचार्य सचिन डोईफोडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिंनदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.