Cambridge English School

Call Directions

Cambridge English School सत्यमेव जयते

20/08/2026

🏆 गौरवास्पद यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! 💐

आमचा विद्यार्थी भावेश कैलाश यादव याने CUET परीक्षेत तब्बल ९२.५६% गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची आणि मेहनतीची प्रभावी छाप उमटवली आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याला National Forensic Sciences University (NFSU), Chennai Campus येथे खुल्या प्रवर्गातून B.Sc. (Criminology & Forensic Science) या प्रतिष्ठेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे.

NFSU ही संसदेच्या NFSU Act, 2020 अंतर्गत “राष्ट्रीय महत्त्वाची संस्था” (Institution of National Importance) म्हणून घोषित करण्यात आलेली देशातील अग्रगण्य संस्था आहे. फॉरेन्सिक सायन्स, क्रिमिनोलॉजी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण देणाऱ्या भारतातील अत्यंत प्रतिष्ठित संस्थांपैकी NFSU ही एक महत्त्वपूर्ण संस्था आहे.

भावेशने मिळवलेले हे यश त्याच्या चिकाटी, मेहनत, बुद्धिमत्ता आणि ध्येयवेड्या प्रयत्नांचे फलित आहे. एका सामान्य विद्यार्थ्यापासून देशातील प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळविण्यापर्यंतचा त्याचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे.

🌟 भावेश, तुझ्या या दैदिप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
तुझ्या ज्ञानाला, कर्तृत्वाला आणि स्वप्नांना नवी उंची लाभो. भविष्यात तू यशाची नवनवीन शिखरे सर करावीस, आपल्या कुटुंबाचे, गुरुजनांचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

तुझ्या उज्ज्वल, यशस्वी आणि गौरवशाली भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐💐

शुभेच्छुक

प्रा. गजानन सुभानराव लोमटे
केंब्रिज महाविद्यालय, कळमनुरी, जि. हिंगोली

मेडिकल प्रवेशासाठी मिळालेल्या प्रवेशाबद्दल खूप खूप केंब्रिज महाविद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!
09/08/2026

मेडिकल प्रवेशासाठी मिळालेल्या प्रवेशाबद्दल खूप खूप केंब्रिज महाविद्यालय परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!!

07/08/2024

शाळेतील एक प्रयोगशील उपक्रम

"If my ryot gets even a grain of salt, I get a lot of pain. Remember, the ryot does not do the king, the king does the r...
28/06/2024

"If my ryot gets even a grain of salt, I get a lot of pain. Remember, the ryot does not do the king, the king does the ryot."


"Rajarshi Shahu Maharaj"

Today's birth anniversary.... The Chhatrapati Sambhaji Maharaj Seva Samiti salutes the lifelong work of Shahu Chhapati, the king of Dini Raya.

Dr Gajanan Lomte

Director-Cambridge School Chuncha

Address

Chuncha, Kalamnoori
Hingoli
431712

Telephone

9421862307

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cambridge English School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share