सम्यक विद्यार्थी आंदोलन - हिंगोली जिल्हा

  • Home
  • India
  • Hingoli
  • सम्यक विद्यार्थी आंदोलन - हिंगोली जिल्हा

सम्यक विद्यार्थी आंदोलन - हिंगोली जिल्हा SVA is an organization which fights for students rights.

सम्यक विद्यार्थी आंदोलन, हिंगोली जिल्हा आयोजितNEET पेपर फुटीच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांचा न्याय हक्काच्या विविध मागण्...
28/05/2026

सम्यक विद्यार्थी आंदोलन, हिंगोली जिल्हा आयोजित

NEET पेपर फुटीच्या विरोधात आणि विद्यार्थ्यांचा न्याय हक्काच्या विविध मागण्यांकरिता

"धरणे आंदोलन"

दिनांक :🗓 29 मे 2026
वेळ : 🕰सकाळी 11 वाजता
स्थळ. : 📍जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली.

28/05/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी माता रमाई आंबेडकर यांचा आज स्मृतीदिन. मुक्तीसंग्रामचा अत्यंत खडतर प्रवास करताना बाबासाहेबांना सर्व पातळीवर खंबीरपणे साथ देणाऱ्या माता रमाईंचा संघर्ष आपण कधीही विसरू शकणार नाहीत. माता रमाई आंबेडकरांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन !

03/04/2026
03/04/2026

राहुल गांधी आणि काँग्रेसने हे ओळखणे गरजेचे आहे की, ही लढाई रस्त्यावर लढली जाऊ शकत नाही; रस्त्यांवरील निदर्शने केवळ प्रतिकात्मक आहेत. निवडणूक प्रक्रियेतील फसवणूक आणि विसंगतींवर केवळ कायदेशीर लढाईद्वारेच प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आणि त्यांचा पर्दाफाश केला जाऊ शकतो.

- ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

03/04/2026

आंध्र प्रदेश निवडणुकीतील विसंगती महाराष्ट्रातील निवडणुकीतील विसंगतींशी सुसंगत; राहुल गांधी यांना कायदेशीर लढ्याची गरज कधी उमजणार?

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा समन्वय समिति (वसमत व औंढा नागनाथ तालुका) पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.अभिनंदन पुढ...
27/03/2026

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा समन्वय समिति (वसमत व औंढा नागनाथ तालुका) पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा कार्यकारिणी (हिंगोली, कळमनुरी, सेनगांव तालुके) पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.अभिनं...
27/03/2026

वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्हा कार्यकारिणी (हिंगोली, कळमनुरी, सेनगांव तालुके) पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा पुणे...
27/03/2026

बार्टीची रखडलेली पीएचडी फेलोशिप जाहिरात तत्काळ जाहीर करा; अन्यथा न्यायालयात जाणार: सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा इशारा

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत देण्यात येणारी सन २०२३, २०२४ आणि २०२५ ची पीएचडी फेलोशिप (BANRF) जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने बार्टीच्या महासंचालकांना निवेदन देण्यात आले असून, जाहिरात तत्काळ प्रसिद्ध न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाज्योती आणि सारथी यांसारख्या इतर शासकीय संस्थांकडून इतर मागासवर्गीय (OBC) आणि मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना २०२३ ची पीएचडी फेलोशिप आधीच प्रदान करण्यात आली आहे. मात्र, 'समान निकष धोरण' लागू करण्याच्या नावाखाली बार्टीची २०२३ ची जाहिरात अद्याप रोखून धरण्यात आली आहे. इतर संस्थांप्रमाणे जाहिरात न काढता केवळ बार्टीच्या विद्यार्थ्यांवरच हे धोरण लादणे, हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या धोरणात्मक दिरंगाईमुळे अनेक पात्र विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत, कारण त्यांच्या पीएचडी शिक्षणाचे तीन वर्षांचे कालावधी पूर्ण होत आले आहेत. तरीही शासनाकडून अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. या अन्यायाची दखल घेऊन सन २०२३, २०२४ आणि २०२५ ची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नाईलाजास्तव न्यायालयात किंवा अनुसूचित जाती/जमाती आयोगाकडे धाव घ्यावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका प्रशांत बोराडे (प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र), ऋषिकेश कांबळे, आकाश शेलार, नालंदा वाकोडे, आणि प्रवीण हिवराळे यांनी व्यक्त केली आहे.









27/03/2026
निवेदनहिंगोली येथील शासकीय रुग्णालयातील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कंत्राटी भरती प्रकियेत होत असलेल्या घोडेबाजार...
02/01/2026

निवेदन

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयातील व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कंत्राटी भरती प्रकियेत होत असलेल्या घोडेबाजार ची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी*l

*अन्यथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालया समोर हिंगोली येथे दिनांक:07.01.2026 रोजी थाली बजाव आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे निवेदन सम्यक विद्यार्थी आंदोलन हिंगोली जिल्ह्याच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांना देण्यात आले.*

हिगोली येथील शासकीय महाविदयालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक मनुष्यबळ पुणे येथील खाजगी संस्थे मार्फत पुरविण्यात येत आहे मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकियेत मोठया प्रमाणात घोडे बाजार सुरु असल्याचा गंभीर आरोप काही कर्मचाऱ्यांकडुन होत आहे अशी माहिती आमच्या संघटनेला मिळालेली आहे.
गत वर्षभरापासून एका खासगी कंपनीमार्फत रुग्णालयात सफाई कामगार, कक्ष सेवक, टेक्निशियन तसेच इतर सहाय्यक पदांवर भरती करण्यात आली आहे. एकीकडे या कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधनावर नियुक्त करण्यात येत असताना दुसरीकडे भरतीसाठी बेरोजगार तरुण- तरुणींची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे प्रकार सुरू आहेत. नोकरी देण्यासाठी मध्यस्थांकडून आर्थिक लुबाडणूक होत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कंपनीचे काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही अर्जदारांची अडवणूक केली जात असल्याने अनेक उमेदवार वैतागले आहेत. वेळेवर माहिती न देणे, कागदपत्रे जाणूनबुजून अडवणे तसेच 'ओळख' असल्याशिवाय काम होत नसल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. त्यामुळे पात्र उमेदवार असूनही अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे.

प्रतिलीपी,
1. मा.जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली.
2. मा.पोलीस अधिक्षक साहेब, पोलीस अधिक्षक कार्यालय हिंगोली.
3. मा.पोलीस निरीक्षक साहेब, हिंगोली ग्रामीण.
4. जिल्हा शल्यचिकीत्सक साहेब, जिल्हा रुग्णालय हिंगोली.

अभिनंदन 💐
28/12/2025

अभिनंदन 💐

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस युतीची संयुक्त परिषद घेऊन युतीची घोषणा करण्यात आली

वंचित बहुजन आघाडी बृहन्मुंबई महानगरपालिकेत
६२ जागा लढणार

एक संधी - वंचित बहुजन आघाडीला

ंधी_वंचितला

Address

Hingoli

Telephone

+918459717940

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सम्यक विद्यार्थी आंदोलन - हिंगोली जिल्हा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category