Madhav Dnyanpeeth, Hinganghat.

Madhav Dnyanpeeth, Hinganghat. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhav Dnyanpeeth, Hinganghat., Education, Chaudhari Ward, Near Shivaji Park, Hinganghat.

19/01/2026
*माधव ज्ञानपीठ येथे संविधान दिन उत्साहात साजरा*           प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट द्वारा संचालित माधव ...
26/11/2025

*माधव ज्ञानपीठ येथे संविधान दिन उत्साहात साजरा*

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, हिंगणघाट द्वारा संचालित माधव ज्ञानपीठ, हिंगणघाट येथे आज दि. 26 नोव्हेंबर 2025 बुधवार ला संविधान दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रधानाचार्या सौ. स्मिताताई कुशे तर उपप्रधानाचार्य श्री कुणाल झोडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, ॐ, भारत माता व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानावर आधारित भाषण, गीते, पोवाडा, पथनाट्य, समूहगीते, संविधानाची मानवी साखळी, नृत्य इत्यादी सादर केले. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यासाठी गीतांचे गायन केले. आचार्या सौ. बाकडे यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती सांगितली. श्री झोडे सर यांनी संविधानाविषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन व आभार आचार्या पिसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

*माधव ज्ञानपीठ हिंगणघाट च्या विद्यार्थांची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड* दिनांक 19 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी क्रीडा ...
19/11/2025

*माधव ज्ञानपीठ हिंगणघाट च्या विद्यार्थांची विभागीय कुराश स्पर्धेसाठी निवड*

दिनांक 19 नोव्हेंबर 2025, बुधवार रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने क्रीडा संकुल वर्धा येथे जिल्हास्तरीय कुराश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात माधव ज्ञानपीठ हिंगणघाट येथील *14 वर्ष वयोगट व ३० किलो वजन गटात मुलांमध्ये सक्षम कुळझडकर वर्ग 8 वा* आणि *१९ वर्ष वयोगट व ४० किलो वजन गटात मुली मध्ये काव्या कुडमथे* या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजय संपादन केला आणि होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरीता आपले स्थान निश्चित केले.
खेळाडूच्या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. गोकुलदासजी राठी, उपाध्यक्ष मा. श्री. श्यामभाऊ भिमनवार, सचिव मा. श्री. रमेशजी धारकर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्रधानाचार्या सौ. स्मिताताई कुशे, उपप्रधानाचार्य श्री. कुणाल झोडे, क्रीडाशिक्षक गौरव खिराळे आणि सर्व शिक्षकवृंदांनी विजयी खेळाडूंचे मन:पूर्वक अभिनंदन केले व होणाऱ्या विभागस्तरीय कुराश स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Address

Chaudhari Ward, Near Shivaji Park
Hinganghat
442301

Telephone

+919503643080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhav Dnyanpeeth, Hinganghat. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category