N D Gole High School - एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णै

  • Home
  • India
  • Harnai
  • N D Gole High School - एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णै

N D Gole High School - एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णै Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from N D Gole High School - एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णै, School, At. post. Harnai. Tal. Dapoli, Harnai.

प्रत्येका जवळ शाळेच्या काहीना काही तरी आठवणी असतात..

अश्या आठवणी आपण आपल्या मित्रांसोबत SHERE करायला सगळ्यांनाच आवडेल..

चला मग आपल्या शाळेच्या आठवणी आपण सगळे मिळून SHERE करूया ..

आपल्या एन् डी गोळे हायस्कूल हर्णै चा दहावी परिक्षेचा निकाल ९१.३९ % लागला. ९३ पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.सर्व विद्य...
08/05/2026

आपल्या एन् डी गोळे हायस्कूल हर्णै चा दहावी परिक्षेचा निकाल ९१.३९ % लागला.

९३ पैकी ८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सर्व विद्यार्थी/ पालक/ शिक्षक/कर्मचारी वृंद तसेच मार्गदर्शक आणि हितचिंतक सर्वांचे
हर्णै विद्या मंदिर हर्णै संस्थेचे वतीने विशेष कौतुक आहे.🌷🌷💐💐

हार्दिक अभिनंदन
26/04/2026

हार्दिक अभिनंदन

13/05/2025
27/05/2024

एन्, डी, गोळे हायस्कूल इयत्ता १०वी,चा निकाल १००/टक्के.
सर्व विद्यार्थी,पालक , शिक्षक, कर्मचारी, संचालक यांचे अभिनंदन.

30/11/2023

आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .
पुढे ६ /७ वर्षांनंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भिती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
☺️😊☺️😊☺️
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
% चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.
😆🥹😆🥹😆
शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हिणवलं जायचं...
🤣🤣🤣🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास होता...
😏🥳😏🥳😏
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
😳😳😳😳😳
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि
वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा...
🤗🤗🤗🤗🤗
वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
😝😜😝😜😝
आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.
🙂🙃🙂🙃🙂
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो
हे आता आठवतही नाही...🤭🫢🤭🫢🤭
सरांचा शाळेत मार खाताना
आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
'ईगो' कधीही आडवा येत नव्हता,
खरं तर आम्हाला 'ईगो' काय
असतो हेच माहीत नव्हतं...
😀😄😀☺️😄😀😄
मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती.
मारणारा आणि मार खाणारा
दोघेही खुष असायचे.
मार खाणारा यासाठी की,
'चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो
म्हणून आणि मारणारा
आज पुन्हा हात धुवून
घ्यायला मिळाले म्हणून......
🙂😉🙂😉🙂
बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.
☺️😊☺️😊☺️☺️😊
आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.
(मुळात पाकेटमणी म्हणजे काय? हेच माहित नसायचे)
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत टिकल्या, लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात आम्हाला काहीअपमानास्पद वाटायचं नाही.कोणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे धावायचो.
😉😉😉😁😉😉😉
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला
आय लव यू' म्हणणं माहीतच नव्हतं...
😘😘❤️😘😘
आज आम्ही असंख्य
टक्के टोमणे खात, संघर्ष
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे हवं
होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि शाळे बाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!
😂😂👍😂😂
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात वाढलो........
😉🙄😉🙄😉
कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच
नाही.भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.
😘😘❤️😘😘
आपल्या नशिबाला
चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.
जे जीवन आम्ही
जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार
नाही.,,,,,,,,,,,,,,,,,,
😃😃😃🌹
आम्ही चांगले असू
किंवा वाईट, पण आमचाही
एक 'जमाना' होता.....
अनुभवले व खूप आवडले, म्हणून आपणांस पाठवले..

हे आताचे 45--60 वयोमान असणाऱ्यांचे (काहींचे) हुबेहूब कथा व वर्णन आहे..🙏

दिनांक 15-12-2022 व 16-12-2022रोजी खरवते,चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत...
17/12/2022

दिनांक 15-12-2022 व 16-12-2022रोजी खरवते,चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत N.D.Gole हायस्कूल च्या 9 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
4×100 m relay - 2nd
आर्या मोहिते, पूजा राजभर,भावना नार्वेकर, साक्षी पवार

200 m - 2nd
आविष्कार येलकर

1500m- 2nd
कृष्णा राजभर

800m- 3rd
कृष्णा राजभर

4×100m relay- 3rd
आविष्कार येलकर ,सक्षम मोहिते,वेद चौधरी, कुणाल बोबले

4×400m relay- 1st
कुणाल बोबले,आविष्कार येलकर,कृष्णा राजभर, सक्षम मोहिते, वेद चौधरी

शाळेतील 5 विद्यार्थ्यांची सातारा येथे होणार्‍या कोल्हापूर विभागास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

अभिनंदन...
16/12/2022

अभिनंदन...

आज दिनांक 10-12-2022 रोजी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे मुलींच्या शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत N.D.Go...
10/12/2022

आज दिनांक 10-12-2022 रोजी कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे मुलींच्या शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत N.D.Gole हायस्कूल च्या 4 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थिनींनी आजच्या स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

पूजा राजेश राजभर - 200m,400m,600m -1st, 4×100m relay -1st

आर्या महेश मोहिते- 100m -1st ,4×100m -1st

भावना जगन्नाथ नार्वेकर- 4×100m relay- 1st

साक्षी शांताराम पवार- 4×100m relay -1st

चारही विद्यार्थिनींची खरवते ,चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आज दिनांक 09-12-2022 रोजी कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या मैदानावर शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. आपल्या N.D.Gole हायस...
09/12/2022

आज दिनांक 09-12-2022 रोजी कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीच्या मैदानावर शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या. आपल्या N.D.Gole हायस्कूल चे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत

अविष्कार येलकर - 100m,200m,400m ,4×100m relay ,4×400m relay -1st.

कृष्णा राजभर - 800m,1500m-2nd, 4×400m relay -1st

कुणाल बोबले- 3000 m-3rd, 4×100m relay,4×400m relay -1st

वेद चौधरी- 4×100m relay ,4×400 m relay -1st,

सक्षम मोहिते- 4×100m relay,4×400m relay-1st,

अथर्व रघुवीर- 200m-3rd.

याप्रमाणे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची खरवते ,चिपळूण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Address

At. Post. Harnai. Tal. Dapoli
Harnai
415713

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when N D Gole High School - एन. डी. गोळे हायस्कूल, हर्णै posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category