Lakhon mein Ek Kokan

Lakhon mein Ek Kokan A Societial Mission Of Government . Pratham is Inspiring People Around the World to Work Towards Providing Quality Education For Children And Youth

16/10/2020

मळगाव येथे 'शाळा बाहेरील शाळा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम....

मळगाव येथील शिक्षणमित्रांनी राबविला उपक्रम_*

उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक_*

सावंतवाडी दि.१५-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भूमीवर शासनाकडून सुरू असलेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमात काही ठिकाणी बाधा येत असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहता 'शाळा बाहेरील शाळा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम मळगाव येथील शिक्षणमित्रांनी राबविला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संपूर्ण जगात कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा संसंर्ग टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन कालावधीत सर्व नोकरी धंद्याबरोबर शाळा बंद पडल्या. कालांतराने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यावर इतर व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाचा धोका ओळखता शाळांबद्दल कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. आॅनलाईन आणि आॅफलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण सुरू झाले.

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेतील मुले तसेच इतर शाळेतील मुले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, स्वाध्यायकार्ड, पालकभेटी, शिक्षणमित्र अशा वेगवेगळ्या माध्यमांद्वारे शिक्षण घेत आहेत. मात्र काही ठिकाणी या ऑनलाईन शिक्षणात नेटवर्क अभावी बाधा येत आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणात येणारी ही बाधा लक्षात घेता 'शाळा बाहेरील शाळा' हा उपक्रम मळगाव येथील शिक्षणमित्रांनी हाती घेतला आहे. या उपक्रमात शिक्षणमित्र म्हणून आपल्या परिसरातील मुलांना जून महिन्यापासून शाळेप्रमाणेच शिक्षण देणारे तुषार सावंत, स्रेहा सावंत, तेजस्विनी सावंत, शुभम राऊळ, रामनाथ राऊळ या सर्वांची मोलाची मदत मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून हे शिक्षणमित्र मुलांना शिक्षण देत आहेत. त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाजी सावंत, शारदा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनुराधा सुर्वे, सीमा सावंत, अस्मिता गोवेकर इतर शिक्षकांनी व पालकांनी त्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

13/12/2015
Learning Camp Raigad
05/11/2015

Learning Camp Raigad

Learning Camp Parents Meeting
05/11/2015

Learning Camp Parents Meeting

Read India Kokan
05/11/2015

Read India Kokan

Address

Vishnu Talao
Goregaon
402103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lakhon mein Ek Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Lakhon mein Ek Kokan:

Shortcuts

Share

Category