जि प मा शाळा धोंडराई

जि प मा शाळा धोंडराई Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जि प मा शाळा धोंडराई, High School, Dhondrai, Gevrai.

🚌🌄 *शैक्षणिक सहल* 🌄🚌जिल्हा परिषद माध्यमिक शाळा - धोंडराई, तालुका गेवराई , जि बीड येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आज  ...
22/12/2025

🚌🌄 *शैक्षणिक सहल* 🌄🚌

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा - धोंडराई, तालुका गेवराई , जि बीड येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल आज सकाळी 6 वाजता अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने रवाना झाली आहे.

*या सहलीसाठी एकूण 3 बस, 111 विद्यार्थी आणि 12 शिक्षक सहभागी झाले आहेत .*

🗺️ पहिल्या दिवसाचा मार्गक्रमण कार्यक्रम :
ओझर गणपती
📍 ओझर ते लेण्याद्री
📍 लेण्याद्री ते शिवनेरी
📍 शिवनेरी किल्ला
📍 माळशेज घाट
📍 कल्याण येथे रात्रीचा मुक्काम
🎯 शैक्षणिक सहलीचा उद्देश व उपयोग :

1)इतिहास, भूगोल व संस्कृतीचे प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन
ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती व जाणीव वाढवणे .
2)विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती, कुतूहल व अभ्यासाची आवड निर्माण करणे .
3) संघभावना, शिस्त, वेळेचे नियोजन व सामाजिक जाणीव विकसित करणे .
4) वर्गातील पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणे .
5 )विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवाधारित शिक्षण देणारी ही सहल निश्चितच ज्ञानवर्धक, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरणार आहे.
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबईच्या वतीने जि.प.मा.शाळा धोंडराई येथे 498 विर्थ्यांना  साहित्याचे ...
30/06/2025

*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबईच्या वतीने जि.प.मा.शाळा धोंडराई येथे 498 विर्थ्यांना साहित्याचे वितरण !*

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराई येथे 498 मुलांना साहित्य वितरित करण्यात आले ! त्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी प्रति विद्यार्थी चार वह्या व दोन पेन्सिल वाटप करण्यात आल्या ! इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी पाच रजिस्टर व दोन पेन वाटप करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गुरु आनंद प्रतिष्ठान बीडच्या अध्यक्षा श्रीमती सीमा ओस्तवाल मॅडम , सन्मानीय जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण काळम पाटील साहेब , सन्मानीय नांदुरकर साहेब (शि वि अ पं स गेवराई ) , सम्मानीय इलियास शेख (उपाध्यक्ष शा व्य स धोंडराई ) , केंद्रमुख विशाल कुलकर्णी सर , केंद्रीय मु अ सुलाखे सर , अध्यक्ष म्हणुन प्रशालेचे मु .अ शहाणे सर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जे एन जाधव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देशपांडे सर यांनी मांडले .याप्रसंगी ओस्तवाल मॅडम , सुलाखे सर ,काळम पाटील साहेब व नांदूरकर साहेबांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले . *समाजात आज दातृत्वाचा संस्कार असणारी माणसे उपस्थित आहेत त्यामुळेच माणुसकी जिवंत आहे . असे उद्‌गार काळम पाटील यांनी मांडले !* साहित्य वितरणामुळे आम्हा विद्यार्थ्यांना भविष्यात याचा खूप मोठा फायदा होईल असे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया स्वरूपात मांडले .शेवटी वंदे मातरम् घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

25/01/2025
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆 *जि प मा शा धोंडराई येथे गुणवत्तांचा गौरव सोहळा संपन्न झाला .* 🥇🏆🥇याप्रसंगी..........1) काळम पाटील साहेब 2) भागव...
17/07/2024

🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
*जि प मा शा धोंडराई येथे गुणवत्तांचा गौरव सोहळा संपन्न झाला .* 🥇🏆🥇

याप्रसंगी..........
1) काळम पाटील साहेब

2) भागवतजी टेकाळे

3)सुग्रीव गायकवाड सर

4) विशाल कुलकर्णी सर

5)बापूसाहेब तारुकर सर

6) दिलीपजी नागरगोजे साहेब

7) मुख्याध्यापक शहाणे सर

प्रशालेतील शिक्षक वृंद , विद्यार्थी व पालक उपस्थित होते .
🥈🥈🥈🥈🥈🥈🥈

*इ 10 वी मधे प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला .*
*NMMS शिष्यवृत्ती धारक 7 विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला*
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

उपस्थितांच्या सहवासामुळे व प्रबोधनामुळे अनेक मुलांना प्रेरणा मिळाली .

APJ Abdul Kalam science and innovation lab!We always work for future!Today we are learning following concepts!Basic elec...
21/04/2024

APJ Abdul Kalam science and innovation lab!

We always work for future!

Today we are learning following concepts!

Basic electronics
3D printer
Robotic
Drone uses and operating
Reverse engineering
Mathematics formula
Animation
And many more things!

*!!School is a place of freedom, where you innovate something!!*                                                   हा वि...
03/03/2024

*!!School is a place of freedom, where you innovate something!!*

हा विचार सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सज्ज होत आहेत ! याकरिताच . . . . .

**A P J Abdul Kalam science and technology Lab प्रशालेत उभारण्यात आली आहे.*

* 24 hours वीजेकरीता solar energy पॅनल व inverter बसवण्यात आली आहे .

* शासनातर्फे स्वतंत्र interactive whiteboard , Over head projector व संगणक संच उपलब्ध करून देण्यात आला आहे .

*आज अत्याधुनिक लॅब विविध साधनासह उपलब्ध असल्यामुळे शिकण्यातील आनंद द्विगुणित होत आहे .*

आपल्या हक्काची शाळा जि प मा शा-धोंडराई .

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती चे औचित्य साधुन आज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले ! याप्रसंगी गावातील बस स्टँड , विवि...
29/02/2024

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंती चे औचित्य साधुन आज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले ! याप्रसंगी गावातील बस स्टँड , विविध चौक , सर्व धर्मिय प्रार्थना स्थळे व गावातील मुख्य रस्ते स्वच्छ करण्यात आले.

या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे नियोजन ग्रामपंचायत धोंडराई , अंगणवाडी ताई व गावातील तीनही प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले .

मुलांनी मनोभावे सेवा दिली .ग्रामस्वच्छता मोहिमेतून आम्ही काय साध्य केले याबद्दल आपल्या विचारांचे प्रगटीकरण केले ! सर्व धर्मीय प्रार्थना स्थळांच्या स्वच्छतेमुळे मुलांमधे एकात्मता मुल्यांची रूजवणुक झाली .

शेवटी सन्माननीय शितल ताई साखरे यांनी सर्वांच्या योगदानाबद्दल उपस्थितांचे आभार मानले . ' स्वच्छ गाव सुंदर गाव 'या विषयांवर विद्यार्थांशी संवाद साधला ! मु अ यांनी देखील उपस्थितांचे आभार मानले !

प्रशालेत शिवजयंती निमित्त रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा संपन्न !प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या स्पर्धका...
21/02/2024

प्रशालेत शिवजयंती निमित्त रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा संपन्न !

प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विजेत्या स्पर्धकांचा, मा शितल ताई साखरे यांच्या हस्ते रोख स्वरूपात बक्षीस देऊन गौरव करण्यात आला !

याप्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा भागवतजी टेकाळे देखील उपस्थित होते . मुलांनी प्रखड , आवेशपूर्ण व अभ्यासपूर्ण विषय मांडणी केली !
संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचलन मुलांनीच केले ! कार्यक्रम 2 तास 45 मिनिटे चालला ! कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथि पुर्ण वेळ उपस्थित राहीले त्यामुळे मुलांचा उत्साह टिकुण राहिला ! सर्वांचे प्रशालेच्या वतीने मनःपुर्वक आभार !

आज प्रशालेत भारतीय मानक ब्युरो या संस्थेमार्फत वस्तुंच्या गुणवत्ता व standard  या विषयी जनजागृती करिता  workshop सपन्न झ...
16/02/2024

आज प्रशालेत भारतीय मानक ब्युरो या संस्थेमार्फत वस्तुंच्या गुणवत्ता व standard या विषयी जनजागृती करिता workshop सपन्न झाला .

BIS या शासन मान्य ॲप बद्दल विस्तृत माहिती देण्यात आली !

Address

Dhondrai
Gevrai
431127

Telephone

+917972782794

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जि प मा शाळा धोंडराई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category