03/09/2022
दि.१५/०८/२०२२, अमृत महोत्सवी ,७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालय तथा वरिष्ठ महाविद्यालय गोगाव ता.गडचिरोली येथे विद्यालयाच्या प्राचार्य सौ.कविताताई पोरेडडीवार यांचे हस्ते ध्वजारोहण संपन झाले.
त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध महापुरुषांच्या वेशभूषा साकारून त्यांनी केलेल्या त्यागाची, बलिदानाची गाथा सांगितली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ.कविताताई पोरेड्डीवार होत्या.पाहुणे म्हणून विद्यालयातील, कनिष्ठ महाविद्यालयातील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेत्तर करमचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वानी सहकार्य केले.कार्यक्रमाची सांगता , 'वंदे मातरमने ' करण्यात आली.