Murlidhar Computer Typing Institute, Gargoti.

Murlidhar Computer Typing Institute, Gargoti. Basic Course in Computer Typing (GCC-TBC) and Special Skill in Computer Typing.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त मुरलीधर टायपिंग इन्स्टिटयूट ची नोंदणी ०९ फेब्रुवारी, १९८४ रोजी झाली.
गेली ३० हून अधिक वर्षात आमच्या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिल्याने विविध सरकारी, निम-सरकारी आणि खाजगी क्षेत्रात त्यांना शाश्वत नोकरी मिळाली. याचा संस्थेला खूप अभिमान आहे.
पण बदलत्या काळानुसार पारंपरिक टंकलेखन यंत्रे कार्यालयातून इतिहास जमा झाली आहे

त आणि त्याची जागा संगणकाने घेतली. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या आदेशाने २०१५ सालापासून पारंपरिक टंकलेखनाने कात टाकून संगणक टायपिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. आता हा कोर्स Basic Course in Computer Typing (GCC-TBC) आणि Special Skill in Computer Typing असा ओळखला जाईल.
यापुढेही आमची संस्था नवीन course सह विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास (Skill Development) करण्यास कटिबद्ध असेल.

आजच आपला प्रवेश निश्चित करा ...मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, पोस्ट ऑफिस बिल्डिंग ( दुसरा मजला ), पाटगांव रोड, गा...
23/02/2019

आजच आपला प्रवेश निश्चित करा ...

मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, पोस्ट ऑफिस बिल्डिंग ( दुसरा मजला ), पाटगांव रोड, गारगोटी. मो. - ७०३८४४०९०९, ७२७६६९३९७९.

आपला प्रवेश निश्चित करा ...मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, आझाद गल्ली, गारगोटी. मो. - ९४२३२७८४०६, ७२७६६९३९७९.
06/02/2018

आपला प्रवेश निश्चित करा ...

मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, आझाद गल्ली, गारगोटी. मो. - ९४२३२७८४०६, ७२७६६९३९७९.

11/08/2017

टाईपरायटिंगची शेवटची परीक्षा पार ...

टंकलेखन मशीन होणार कालबाह्य !!!
12/07/2017

टंकलेखन मशीन होणार कालबाह्य !!!

11/07/2017

सुचेल तसं....

मी टाईपरायटर बोलतोय

माझ्या प्रिय मित्र/मैत्रिणींनो,

मी टाईपरायटर बोलतोय.. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की ह्या निर्जीव टाईपरायटरला अचानक वाचा कशी फुटली? दिवा विझण्याआधी जसा अचानक मोठा होतो ना तसाच तुम्हां सगळ्यांचा शेवटचा निरोप घेण्याआधी परमेश्वराने मला वाचा बहाल केली असावी...

तसा मी दीर्घायुषी बरंका.. जेव्हा तुमचे आजोबाही जन्मले नसतील त्या काळात, साता समुद्रापलिकडे, अमेरिकेत माझा जन्म झाला.. सगळं जग पादाक्रांत करत करत भारतात यायला मला जरा उशीरच झाला..
पण तुम्ही लोकांनी मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तो आश्चर्यकारकच होता...
रेमिंगटन, गोदरेजसारख्या मोठमोठ्या कंपनीज मला तयार करायला पुढे सरसावल्या.. आधी फक्त इंग्लिश मग मराठी, हिंदी अशा तुमच्या स्थानिक भाषांकरीताही माझे कीबोर्ड बनू लागले...

न्यायालयात, शासकीय कार्यालयांत, सार्वजनिक, खाजगी क्षेत्रात अशा सगळीकडे माझा बोलबाला सुरू झाला आणि मग हळू हळू प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात, गावात टंकलेखन संस्थांचा उदय झाला.. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये, दहावी/बारावी झालं की टायपिंग शिकायला मुला/मुलींची झुंबड उडू लागली.. नोकरीच्या मुलाखतीसाठी टायपिंगचं सर्टिफिकेट अनिवार्य होऊन गेलं.. आणि काय सांगू, मला ह्या जगाचा अनभिषिक्त सम्राट असल्याची जाणीव व्हायला लागली...

खरं सांगू, माझी जन्मभूमी जरी अमेरिका असली ना तरीही मला तुम्हां भारतीयांकडूनच भरभरून प्रेम मिळालंय.. तुम्ही लोकं तुमची मुलं दमून भागून अस्ताव्यस्त झोपली की हळूच त्यांच्यावर मायेचं पांघरूण घालायचे ना तसंच तुमच्या इन्स्टिट्यूट्स मध्ये लोकांनी दिवसभर मला यथेच्छ वापरलं की शेवटी तुम्ही मला मायेने कव्हर घालायचे.. तुमच्या मुलांसारखंच मग मीही गाढ झोपी जायचो... आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवायचे ना तसंच मलाही कव्हर काढून, व्यवस्थित पुसून पहिल्या बॅचसाठी तयार करायचे...

मी वरकरणी जरी निर्जीव यंत्र वाटत असलो ना तरी माझ्याही अंगावर रोमांच उभे रहायचे, आनंदानी मीही बहरून जायचो..
तुमच्या कोणत्यातरी एका सणाला तुम्ही लोकं हळद, कुंकू, फुलं वाहून माझी पूजा करायचे... त्यावेळी माझा ऊर अभिमानाने भरून जायचा.. त्यावेळी कदाचित तुम्हाला माझ्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू दिसले नसतील.. पण खरंच सांगतो मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं..

आज मागे वळून पाहताना जाणवतंय की तुम्हां सगळ्यांच्या प्रत्येक सुख दुःखाचा मी साक्षीदार राहिलो आहे..
इन्स्टिट्यूट/जॉबवर्क सुरू केल्यानंतरचा तुमचा संघर्षाचा काळ, लग्नकार्य, नव्या घरात प्रवेश, मुलांची शिक्षणं अशा प्रत्येक प्रसंगी तुमच्या घरातलाच एक सदस्य असल्याची जाणीव होत राहिली... तुमच्या यशापशयात आपण दोघेही एकमेकांना घट्ट धरून वाटचाल करत राहिलो, अजून काय पाहिजे?

टायपिंगच्या परीक्षांच्या वेळी तुम्ही मला हातगाडी, रिक्षा, टेम्पो जे साधन मिळेल आणि मुख्य म्हणजे परवडेल त्यात घालून परीक्षा केंद्रात न्यायचे...तेव्हा मला हादरे बसायचे, हाडं खिळखिळी व्हायची पण केवळ तुमच्या प्रेमाखातर मी सगळं सहन करत आलो आहे... नाही नाही तक्रार करत नाहीये पण आजची ही शेवटची संधी समजून माझं मन मोकळं करतोय..

asdf ;lkj पासून ते थेट लेटर, स्टेटमेंट, स्पीड पॅसेज पर्यंतची माझ्या मित्र मैत्रिणींची प्रगती पाहिली की सगळे कष्ट विसरायला व्हायचे...मला हात असते ना तर मी नक्कीच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली असती..

मी यशाच्या शिखरावर होतो आणि मग संगणक क्रांती झाली...
घराघरात, गावागावात संगणक पोहोचले आणि मला कळून चुकलं की ह्या झंझावतात माझा फार काळ निभाव लागणार नाही..
बदल हा सृष्टीचा नियमच आहे म्हणा...जिथे अवाढव्य, सर्वशक्तिशाली डायनासोर पृथ्वीच्या उदरात गडप झाले तिथे माझ्यासारख्या एका छोट्या यंत्राचं काय घेऊन बसलात..

आता ही येणारी परीक्षा संपली की माझाही खडखडाट थांबणार..आणि मग माझं काय करायचं हा प्रश्न तुमच्यापुढे उभा राहील.. तुमच्यातले काही जण मला कवडीमोल भावात विकून टाकाल...काहीजण ओळखीच्या लोकांत वाटून टाकाल...काही जणांना मला निरोप देणं जड जाईल, काही प्रॅक्टिकल (माझ्या अमेरिकेत आहेत तशी) लोकं म्हणतील एवढं काय मनाला लावून घ्यायचं? निर्जीव यंत्रच होतं ना ते.. ते ऐकून कदाचित मला वाईट वाटेल.. तुमच्या आठवणींत तरी मला जिवंत ठेवाल ना? असा विचारायचा मोहसुद्धा होईल..

बघा, तुम्ही भारतीयांसोबत राहून मीही इमोशनल बनलो आहे.. संगत का असर, दुसरं काय? :-) अलविदा!!!!

Hrushikesh Thite

खालील सरकारमान्य संस्थेतूनच आपला प्रवेश निश्चित करा ...मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, आझाद गल्ली, गारगोटी. मो. - ...
05/07/2017

खालील सरकारमान्य संस्थेतूनच आपला प्रवेश निश्चित करा ...

मुरलीधर कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिटयूट, आझाद गल्ली, गारगोटी. मो. - ९४२३२७८४०६, ७२७६६९३९७९.

05/07/2017

तुमचा १ शेअर अनेकांचे भवितव्य घडवू शकतो ...

June 23,the anniversary of the granting of a patent to American inventor Christopher Latham Sholes in 1868 is celebrated...
23/06/2017

June 23,
the anniversary of the granting of a patent to American inventor Christopher Latham Sholes in 1868 is celebrated around the world as Typewriter Day. So, take out your old typewriter from the attic, dust it and get started on your magnum opus!

20/06/2017

GCC - TBC

GCC - TBC [ Government Certificate in Computer Typing Basic Course ]
16/06/2017

GCC - TBC [ Government Certificate in Computer Typing Basic Course ]

24/05/2017

Address

Patgaon Road
Gargoti
416209

Telephone

+912324221151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Murlidhar Computer Typing Institute, Gargoti. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category