महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज

  • Home
  • India
  • Gangapur
  • महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज

महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज One of the most known Educational Institution in Waluj for students In Science Arts and commerce Stream .

College Campus and Building Has All Amenities and Facilities for students. Highly Educated and well Experience Faculty for Teaching.

26/08/2026
17/08/2026

प्राचार्य श्री. सुनिल वाकेकर (संस्थापक अध्यक्ष)
श्रीमती जयश्रीताई बनकर (सचिव)

14/08/2026
*क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी*          मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था, औरंगाबाद संचलित महाराष्ट्र ...
03/08/2026

*क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी*
मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था, औरंगाबाद संचलित महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, गॅलेक्सी इंग्लिश स्कूल, पीपल्स व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, गॅलेक्सी डिफेन्स अकॅडमी,वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुनील वाकेकर साहेब तथा सचिव मा. श्रीमती जयश्री बनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली *क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती* साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्री किरण तांबट सर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कॉलेजचे प्राचार्य मा. श्री अनिल नेवगे सर, गॅलेक्सी स्कूल चे मुख्याध्यापक मा. श्री आर. के. सुरडकर सर, प्रा. वैशाली म्हस्के मॅडम,प्रमुख वक्ते प्रा .संकेत दराडे सर इत्यादी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रा संकेत दराडे सर यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, पत्री सरकारची स्थापना, त्यांचे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती व शिक्षण प्रसाराचे कार्य याबाबत माहिती दिली.
प्रा. प्रशांत मरकड सर यांनी नशा मुक्ती पर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नशा मुक्तीची शपथ घेतली.
अध्यक्षीय समारोप प्रा. किरण तांबट सर यांनी केला. याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तथा लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न*          मा...
01/08/2026

*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तथा लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न*
मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था, औरंगाबाद, संचलित महाराष्ट्र वि., क. व वा. कनिष्ठ महाविद्यालय, गॅलेक्सी इंग्लिश स्कूल, पीपल्स व्हो. ट्रे. सेंटर तथा गॅलेक्सी डिफेन्स अकॅडमी, वाळूज यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुनील वाकेकर साहेब तथा सचिव मा. श्रीमती जयश्री बनकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली *लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती* यानिमित्त अभिवादन पर कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र कॉलेजचे प्राचार्य मा. श्री अनिल नेवगे सर हे होते. प्रमुख पाहुणे गॅलेक्सी डिफेन्स स्कूलचे प्रमुख मा. जावेद पटेल सर हे होते. प्रमुख वक्ते प्रा. श्री नितीन खंदारे सर हे होते. गॅलेक्सी स्कूलचे मुख्याध्यापक श्री आर. के. सुरडकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किरण तांबट सर यांनी केले. अभिवादन पर कार्यक्रम घेण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. लोकमान्य टिळक यांच्या अतुलनीय कामगिरीला उजाळा दिला .तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी, त्यांचे साहित्य वाचावे असे आवाहन केले.
प्रा. श्री नितीन खंदारे सर यांनी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची साहित्य संपदा, तळागाळातील लोकांसाठी, कामगारांसाठी, उपेक्षितांसाठी त्यांनी केलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकला.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य श्री. अनिल नेवगे सर यांनी केला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गीता भावले हिने केले.

Address

Waluj-Nagar Road College Road
Gangapur
431133

Opening Hours

Monday 10am - 3pm
Tuesday 10am - 3pm
Wednesday 10am - 3pm
Thursday 10am - 3pm
Friday 10am - 3pm
Saturday 10am - 2pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र विज्ञान, कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, वाळूज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category