04/12/2018
*स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय चाटोरीच्या गोविंद संपतराव कदम यांचे विज्ञान प्रदर्शनात यश* पालम येथे झालेल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी कदम गोविंद संपतराव याने जोगदंड राजेभाऊ प्रल्हाद यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक व "अजैविक कचरा व्यवस्थापन"या विषयावर प्रयोग सादर करण्यात आला.यातून जीवनात विज्ञानाचे महत्व प्रयोगाच्या माध्येमाने मांडण्यात आले. सदरील प्रयोगास द्वितीय पारितोषिक मिळाले असून हा प्रयोग जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पात्र ठरला आहे. या त्यांच्या यशा बद्दल संस्थाधेक्ष्य संदीप किरडे,सचिव सचिन जोशी,कोषाध्येक्ष सुभाष ढगे व प्राचार्य पवार डी बी यांनी अभिनंदन केले