Shivratna Institute of Management Studies

Shivratna Institute of Management Studies

Share

We realize that education is very essential for the complete development of individual. As an import

04/06/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या बीबीए भाग 1 या परीक्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंगाई असे यश संपादन केले आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 04/06/2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या बीबीए भाग 3 व भाग 2 या परीक्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश संपादन केले आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

22/05/2026

🎓 *BBA प्रवेश प्रक्रिया सुरू – शैक्षणिक वर्ष 2026-27* 🎓

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर- अकलूज येथे BBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत.

✅ अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकवर्ग
✅ आधुनिक ग्रंथालय सुविधा
✅ प्रत्येक वर्षी Campus Drive व Placement संधी
✅ उद्योगाभिमुख शिक्षण पद्धती
✅ व्यक्तिमत्व विकास व कौशल्य प्रशिक्षण
✅ प्रशस्त व शैक्षणिक वातावरण

*आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा!*

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8805069228 / 9011311406 / 9766568401

21/05/2026

Admission open ...

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 01/03/2026

मुंबईत “Youth Conclave on Road Safety” विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित ......

महाराष्ट्र शासन, युनिसेफ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे 25 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य RTO विभागाचे अधिकारी, मुंबई विद्यापीठाचे NSS जिल्हास्तरीय संचालक डॉ. सुशील शिंदे आणि NSS लिव्हिंग ऑफिसर मिलिंद काळे सर तसेच unicef च्या सौ. स्वाती मोहपात्रे मॅडम उपस्थित होत्या.

ही कार्यशाळा प्रामुख्याने NSS स्वयंसेवकांसाठी आयोजित करण्यात आली होती. “Youth Conclave on Road Safety” या विषयावर झालेल्या या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमधील सुमारे 500 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. रस्ते अपघात कसे टाळता येतील, हेल्मेटचा वापर, सीट बेल्टचा उपयोग यांसारख्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयींबाबत RTO अधिकारी.
1. विवेक सुंद्रानी - IMV (Inspector of Motor Vehicle)
2. गोपाळ हराळे - IMV (Inspector of Motor Vehicles)
3. रोहित ममादे IMV (Inspector of Motor Vehicles)
4. प्रविण पाटील - AMVI (Assistant Motor Vehicle Inspector)
5. हर्षवर्धन शहापूरकर - AMVI (Assistant Motor Vehicle Inspector)
6. शर्वरी मुजमुले - AMVI (Assistant Motor Vehicle Inspector)
या सर्व अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत राष्टीय सेवा योजनेच्या एकूण 20 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकरनगर, अकलूज येथील कु. मानसी अमोल कुलकर्णी (भाग-१) या विद्यार्थिनीची निवड झाली. तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापिका स्नेहा धाईंजे मॅडम यांची या कार्यशाळेसाठी संघप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 03/02/2026

दिनांक: 03/02/2026 रोजी शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शंकर नगर अकलूज मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 या विषयक विशेष सेमिनार आयोजित करण्यात आले. "Budget 2026: A Vision for India’s Future" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना नवीन आर्थिक धोरणे आणि त्यांचा व्यवसाय क्षेत्रावर होणारा परिणाम समजून घेण्यास मदत झाली.

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 24/01/2026

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, शंकर नगर, अकलूज येथे दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी “नॅशनल स्टार्टअप डे” साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयात विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या कंपनीची माहिती प्रभावीपणे कशी गोळा करावी, तसेच ‘केस स्टडी’ कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगविश्व समजून घेण्यास मदत झाली.

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 14/01/2026

14 जानेवारी मकर संक्रांति निमित्त माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते कैलासवासी सहकार महर्षी शंकरराव नारायणराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शंकर नगर अकलूज येथे प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे सहकार महर्षी यांच्या समाधीचे दर्शन सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतले.

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 14/01/2026

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शंकर नगर अकलूज येथे दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

Photos from Shivratna Institute of Management Studies's post 02/08/2025

शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज शंकर नगर अकलूज येथे काल दिनांक एक ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ याचा 21 वा वर्धापन दिन तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 105 वी पुण्यतिथी तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती यानिमित्त महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय साठे बी एम, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच वरिष्ठ प्राध्यापक श्री कंगळे एन आर, यांनी विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमास प्राध्यापक सय्यद व्ही एच व महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका धाईंजे एस आर शिक्षकेतर कर्मचारी श्री हर्षद घोंगडे व महाविद्यालय शिपाई सौ आशाताई खंडागळे यांचे सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. भूमिका कळमकर बीबीए भाग 2 तसेच कु.महेश शिंदे बीबीए भाग 3 या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

Want your school to be the top-listed School/college in Gandhinagar?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Gandhinagar