26/11/2022
*महाराष्ट्र प्रशासकीय सेवा महाविद्यालयात संविधान दिन साजरा*
*गडहिंग्लज - येथील महाराष्ट्र प्रशासकीय सेवा कॉलेज ( एमपीएससी ) गडहिंग्लज या महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवृत्त नायब तहसीलदार श्री. लक्ष्मण पाटील, प्रमुख उपस्थिती सौ. विशाखा आनंद पाटील , प्राचार्या गंगाली पाटील यांनी भुषविले. यावेळी सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीमध्ये भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.*
*यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. लक्ष्मण पाटील यांनी संविधानाचे महत्व सांगुन सर्व हक्क व कर्तव्ये सांगितली. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले मतदान कार्ड काढण्याचे आवाहन केले. सौ. विशाखा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.*
*या कार्यक्रमाचे औचित्य साधून संविधान विषयीच्या भित्तीपत्रकांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २६/११ मध्ये शहीद झालेल्या जवानांना मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.*