21/09/2026
अखेर तो क्षण आला.जो प्रत्येक कवी,लेखकांसाठी अनमोल असा क्षण असतो.तो म्हणजे स्वतःची साहित्य कृती साकार होणे.हा त्याच्यासाठी आनंदाचा,अभिमानाचा क्षण असतो.आज तो क्षण माझ्या आयुष्यात आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो.
आपण माझ्या कवितेवर दाखवलेले प्रेम,विश्वास तसेच तुम्ही दिलेले प्रोत्साहन याचमुळे ही साहित्यकृती आपल्या समोर आणू शकलो.आज तुम्हां सर्वांना सांगायला मला आनंद होत आहे की,माझा पहिला कविता संग्रह *"पायवाट"* हा प्रकाशित होत असून,प्रकाशन पूर्व नोंदणी सुरू झाली आहे.तरी आपली प्रत आजच राखून ठेवा.
प्रकाशन पूर्व सवलतीमध्ये तुम्हाला हा काव्य संग्रह फक्त 200 रुपयांमध्ये घरपोच मिळणार आहे.यामध्ये डाक सेवा किंवा कुरिअर सेवा चार्ज द्यावा लागणार नाही.कविता संग्रहाचे मूल्य 200 रुपये असून ही सवलत फक्त प्रकाशन पूर्व नोंदणी करणाऱ्यांना मिळणार आहे.
या कविता संग्रहामध्ये आपल्याला सामाजिक, धार्मिक,भावनिक,निसर्ग,शेती,ग्रामीण जीवन,तसेच प्रेम भावना या विविध विषयांवरील उत्तम कवितांचा आस्वाद घ्यायला मिळेल.
हा कविता संग्रह ज्येष्ठ साहित्यिक प्रसिद्ध कवी श्री.उत्तम कोळगावकर सर यांच्या प्राईम मिडिया प्रकाशन,नाशिक यांनी प्रकाशित केला आहे.कविता संग्रहाची प्रस्तावना प्रसिद्ध कवयित्री सौ.चित्रा ताई बाविस्कर यांनी लिहिली आहे. मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रे प्रसिद्ध चित्रकार श्री.सरदार जाधव यांची आहेत.
🔹 *कविता संग्रह - पायवाट.*
*कवी - श्री.राजेश साळुंखे.*
🔹 *प्रकाशक - ज्येष्ठ साहित्यिक श्री.उत्तम कोळगावकर सर,प्राईम मिडिया प्रकाशन, नाशिक.*
🔹 *पाठराखण (प्रस्तावना) - कवयित्री सौ.चित्रा ताई बाविस्कर,निवृत्त सचिव,नवी मुंबई महानगरपालिका.*
🔹 *मुखपृष्ठ व इतर रेखाचित्रे - प्रसिद्ध चित्रकार,श्री.सरदार जाधव.*
🔹 *ISBN नंबर - 978-81-180724-0-9*
जे प्रेम तुम्ही माझ्या कवितेवर केले,जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला,तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही माझ्या कविता संग्रहाला द्याल,हीच अपेक्षा!
पुस्तक मागवण्यासाठी कृपया 200 रुपये पेमेंट केलेला स्क्रीन शॉट तसेच आपला पूर्ण पत्ता पिन कोड सह मला खालील नंबर वर पाठवा.
पेमेंट तसेच पत्ता पाठवण्यासाठी संपर्क क्रमांक - *9167362472 (* *राजेश साळुंखे.)*
पुस्तक वाचून आपला अमूल्य अभिप्राय मला जरूर कळवा;त्यातून मला पुढील वाटच