29/01/2020
हस्ती स्कूल येथे ७१वा. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !
दोंडाईचा - वि. प्र.- हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल & ज्यु. कॉलेज,दोंडाईचा येथे ७१ वा. २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे ध्वजारोहण भारतीय सशस्र सेना दल निवृत्त जवान महेंद्र गिरासे- चिलाणेकर यांचे हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी हस्ती बँकेचे व्हा. प्रेसिडेंट पहलाज माखिजा, हस्ती चँरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष किशोर जैन, हस्ती स्कूल चेअरमन कैलास जैन, व्हा. चेअरमन दिलीप वाघेला, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कुचेरिया, जनरल मॅनेजर माधव बोधवानी, मँनेजर अनिल मराठे तसेच हस्ती स्कूल कमिटी सदस्या डॉ मंजिरीताई सोहनी, सदस्य दिनेश वोरा, आणि प्राचार्य हरिकृष्ण निगम हे मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर हस्ती कॅडेट कॉर्पस छात्र सैनिकांनी संचलन करून अतिथींना मानवंदना दिली. यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यात सलाम इंडिया, देश रंगीला, देशभक्ती पँरोडी गीतांवर समुह नृत्य; तसेच हिंदी व मराठी पाठ्यपुस्तकातील देशभक्तीपर कविता देश के मिट्टी का कण कण, यह धरती हिंदुस्तान की, जय जवान जय किसान यांचे सुमधुर आवाजात समुह गायन सादर केले. सोबतच प्राथमिक विभागातील चिमुरड्यांनी राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभाव संदेश देणाऱ्या 'नफरत की लाठी तोडो, लालच का खंजर फेको' या गितावर आधारीत 'नृत्य नाट्य' सादर केले. तसेच इ.१ली. ते इ.९वी. चे विद्यार्थ्यी- समृद्धी सांगळे, आश्लेषा कागणे, अलिमा पिंजारी, अदिती पाटील, प्रथम रूपचंदाणी, सर्जन पावरा, ओवी बिरारीस, मोहम्मद बोहरी, भाविका धनगव्हाळ, आदित्य पाटील, वैष्णवी सोनवणे, रचना मावची, अजित पावरा, जय बागल, साई पाटील, केशवी बागल यांनी अस्खलीत व धाराप्रवाही इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून भारतीय प्रजासत्ताक दिनविषयी आपली मनोगते व्यक्त करीत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमा दरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर विविध खेळांच्या शालेय व असोसिएशन स्पर्धांमध्ये शाळेचा नावलौकिक गाजविणाऱ्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व मेडल्स प्रदान करून कौतुक करण्यात आले. यात पूजा पवार, सुशिला गायकवाड, शैला चौरे, सपना देसाई, नेहा अहिरे, सोनी देशमुख- फ्लोअरबाँल, कानन जैन व स्वयं बोरसे- तलवारबाजी, संदीप पाडवी व पूजा पवार - हाँकी आणि हर्ष देवरे व दिव्येश तिरमले - टेनिस बाँल क्रीकेट. या खेळाडूंचा समावेश होता. कार्यक्रम स्थळी ' बाल वीर पुरस्कार-२०१९ ' प्राप्त करणारे भारतीय विद्यार्थ्यांची हस्तीच्या बाल चित्रकलाकारांनी रेखाटलेली छायाचित्रे व राष्ट्रभक्ती पर रेखाटलेली चित्रे यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना व विद्यार्थ्यांना स्वीट वाटप करण्यात आले.
मान्यवरांच्या मनोगते चौकटीत
१. महेंद्र गिरासे
" हस्तीच्या बाल कलाकारांनी अप्रतिमरित्या सादर केलेला देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सदैव स्मरणात राहील. आदर्श देशभक्त नागरीक घडविण्याचं कार्य हस्ती शाळा करीत आहे ! "
२. कैलास जैन
" हस्ती शाळेच्या सर्वच क्षेत्रात सुरू असलेल्या अविरत प्रगतीचा सार्थ अभिमान वाटतो. तसेच राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करणाऱ्या हस्तीच्या खेळाडूंना 'राष्ट्रीय खेळाडू' बँज प्रदान करण्यात येईल.सोबतचं प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रदान करण्यात येणाऱ्या प्रशस्ती पत्र व प्रमाण पत्रावर विद्यार्थ्याच्या नावा नंतर येणाऱ्या वडिलांच्या नावा आधी 'आईचे' नाव लिहीले जाईल. यामुळे शालेय वयातचं 'स्त्री सन्मान' संस्कारांचं शिंपण विद्यार्थ्यांवर होईल. "
Visit us on - https://www.hastipublicschool.com/