खूप खूप शुभेच्छा आणि कौतुक !!
कु.वेद तुषार अनघा जोशी - Merit Rank -65,
कु. आद्या विपुल वल्लरी वैद्य - Merit Rank - 99
या क्लासच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा - इयत्ता सातवी यात मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन आणि कौतुक.
केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता, संकल्पना समजून त्याचा वापर, अवांतर वाचन, इतर माहिती यांचा उपयोग करून, यश संपादन केले आहे त्याबद्दल अभिनंदन.
केवळ परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी
ज्ञानार्थी क्लासेस
Dnyanarthi classes -ज्ञानार्थी क्लासेस
ज्ञानार्थी क्लासेस
केवळ परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी
Conceptual base learning !
Operating as usual
एक भारतीय म्हणून अभिमानाचा क्षण !
चांद्रयान ३ चंद्रावर land होताना कुतूहलाने बघणारी ही पुढची पिढी !
क्लास मध्ये चर्चा सुरू असताना उत्सुकतेने त्यात भाग घेणारी ही मुले आणि आज चंद्रावर आपला झेंडा अभिमानाने इस्रो ने फडकवला तो क्षण आनंदाने साजरी करणारी ही मुले,
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश.
एक भारतीय म्हणून अत्यंत अभिमानाचा क्षण.
इस्रो आपले आभारी आहोत आम्हला या क्षणाचे साक्षीदार केल्याबद्दल.
आपले आणि आपल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !
Officially it's
Child and Adolescent Counsellor and
Psychology Counsellor
Happy to share with you all, another feather in a cap.
😊
सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि शुभेच्छांमुळे हा टप्पा यशस्वीपणे पार करू शकले.
*ज्ञानार्थी* सुरू करताना उद्देश समोर होता मुलांना केवळ परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनवायचे. त्यांच्या संकल्पना स्पष्ट होतील असे शिक्षण !
पुस्तकाचा आधार घेऊन त्या बाहेरील ज्ञान !
हे सगळ करत असताना, प्रत्येक मूल वेगळे आहे आणि ते खास आहे, त्यांच्यातले हे वेगळेपण जपून शिकवता येईल का? वेगळे काही करता येईल का हा विचार मनात आला आणि प्रवास सुरू झाला तो child and adolescent psychology course करण्याचा NHCA Singapore या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला आणि अभ्यास सुरू झाला.
आणि आजचा हा निकाल.
ज्ञानार्थी वेगळेपण जपताना आता आपल्या क्लास मध्ये मुलांचे
बाल आणि किशोर वयातील मुलांचे समुपदेशन केले जाईल.
त्यांना समजून अधिक चांगल्या पद्धतीने शिकविले जाईल.
आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा अशाच पाठीशी राहू देत.
😊🙏
Science !!
Learning through experiments and activities !!
Look at the faces of happy kids, they are just enjoying science !!
आनंदी क्षणचित्रे !!
आजचा हा सोहळा ज्ञानार्थीच्या चमू सोबत !!
ज्ञानार्थीचा तिसरा वाढदिवस !
केवळ परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी
हेच होत मनात ज्ञानार्थी सुरू करताना!
एक एक टप्पा पुढे जात आज ज्ञानार्थी चा तिसरा वाढदिवस साजरा करतोय.
हळू हळू हे आमचं रोपट मोठं होतय !
शिष्यवृत्ती, शिकवणी, होमिभाभा, दहावी, mpsp, लेखन कौशल्य, व्याकरणाचे क्लास, तज्ञ मार्गदर्शकांच्या साहाय्याने अभ्यास सहली आणि अजूनही....
एक एक गोष्टी क्लासमध्ये समाविष्ट करत आहोत.
क्लासची लायब्ररी, सायन्स लॅब, संस्कृत विषय, संगणक, जलसुरक्षा !!
क्लासमध्ये नियमितपणे देशातल्या विदेशातल्या घडामोडींवर चर्चा करताना मुलेही आनंदाने सहभागी होतात.
ज्या उद्देशाने क्लास सुरू केला आहे, त्याचे यश बघायला मिळते आणि आनंद वाटतो, समाधान हे किंचित अंशी नक्कीच जास्त आहे.
अनेक गोष्टी अनुभवल्या, चढ उतारही बघितले, शिकवताना बऱ्याच गोष्टी शिकतोय आणि यातूनच पुढे जातोय.
आमच्या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा आमच्यावर असलेला विश्वास यामुळे हे शक्य !
या प्रवासात मोलाची साथ देणारी आमची मुले आणि त्यांचे पालक यांचे विशेष आभार.
ज्ञानार्थी क्लासेस
Reviews from parents
Thanks a lot 😊🙏
Messgae from Anika Anurag's parents
Anagha teacher..
Taking online class from you for English, Hindi and Marathi writing skills has been very helpful for Anika..
You have taught her very well, especially for Marathi..You made all language grammar easy and have been available everytime we needed help..Your guidance and sincere teaching helped Anika score very good marks in the languages alongwith other subjects..Overall getting her an impressive 92.80% in 10th Boards..We will be ever grateful to you🙏🏻
Messgae from Maitrey Joshi's parents
लेखन कौशल्य आणि ग्रामर याची मैत्रेय ला सतत भीती वाटायची जरी त्याचे बरोबर असेल तरी.... पण या दोन्ही चा अभ्यास आणि सराव अनघाच्या मार्गदर्शनाखाली चांगला प्रकारे साधता आला. तिच्या फ्रेंडली स्वभावमुळे कधी कंटाळा नाही केला त्याने. कायम जायला उत्साही असायचा मराठी आणि इंग्लिश चे गुण खरोखरी त्याच्या मुळेच मिळाले...... अनघा असेच मार्गदर्शन करत रहा... धन्यवाद 🙏🏻
दहावीचा निकाल !!
ज्ञानार्थी क्लासेस चे यश, सलग दुसरे दहावीचे वर्ष !
मैत्रेय जोशी - ९४%
अनिका अनुराग - ९४%
निशी सत्रा - ७१%
लेखन कौशल्य महत्वाचे का?
मैत्रेय आणि अनीका लेखन कौशल्यासाठी क्लास लावलेला.
आज त्यांचा दहावीचा निकाल
मैत्रेय - इंग्रजी - ८४, मराठी - ९०
अनिका - इंग्रजी - ८७, मराठी - ९१, हिंदी संस्कृत - ९४
निशिला गणित विज्ञानाची भीती होती, आज निशीचा रिझल्ट हा नक्कीच समाधानकारक आहे.
भाषा या विषयात गुण मिळवायचे असतील तर लेखन सरावाकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.
आजचे या मुलांचे यश आम्हाला आनंद आणि समाधान देऊन गेले आहे.
मुलांचे खूप अभिनंदन आणि कौतुक.
ज्ञानर्थी क्लासेस मध्ये लेखन कौशल्य कसे करावे, व्याकरणाचे महत्व या गोष्टी सहज सोप्या पद्धतीने शिकवल्या जातात.
गणित, विज्ञान या विषयांबरोबर भाषा सुद्धा तितकीच महत्वाची आहे.
ज्ञानार्थी क्लासेस चे हे यश आपल्या सगळ्यांसोबत वाटून घेताना आम्हला विशेष आनंद होत आहे.
ज्ञानार्थी क्लासेस
केवळ परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी
अनघा जोशी
वल्लरी वैद्य
डॉ. उमेश मुंडल्ये
ज्ञानार्थी क्लासेस
नमस्कार !!
आपला क्लास ५ जून २०२३ पासून सुरू होत आहे.
गेल्या वर्षी क्लासमध्ये आपण लायब्ररी सुरू केली.
आम्हाला आनंद आहे की यावर्षी आपण अजून काही गोष्टी सुरू करीत आहोत.
१. संस्कृत विषय
२. कॉम्प्युटर विषय
३. जल सुरक्षा विषय
४. सायन्स लॅब
५. सायन्स activities
६. Monthly test series
७. Nature trails
८. Study tours
९. Science Projects
१०. Social Science Activities
जून २०२० मध्ये ज्ञानार्थी क्लासेसची स्थापना केली, उद्देश हाच की मुलांना ज्ञानार्थी बनवायचे !
पुस्तक सोबतीला घेऊन त्याच्या मदतीने बाहेरील जगही दाखवायचे.
निरीक्षण, गप्पा, वाचन, लेखन यांच्या मदतीने ज्ञान वाढवायचे.
मुलं आणि पालक यांनी आमच्या वेगळेपणावर विश्वास ठेवला.
आमच्या मुलांच्या शिकताना चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचे समाधान हेच आमचे यश.
यात मार्कांच्या मोजपट्टीपेक्षा किंचित अंशी सरस ही ज्ञानाची आणि समाधानाची मोजपट्टी आहे.
क्लासचे वातावरण घरातल्या अभ्यासाच्या खोलीसारखे !
भारतीय बैठक, प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष, त्याप्रमाणे शिकविणे आणि सोबतीला शिस्तही!
आणि त्याचमुळे रविवारी पण आम्ही क्लासला येतो असा हट्ट त्यातूनच !!
ज्ञानार्थीचे वेगळेपण जपताना,
दरवर्षी नव नवीन मुलांसाठी सुरू करायचे हा ही निश्चय त्यातूनच !
अभ्यास सहलीत मुले रमतात.
ग्रंथालयातली पुस्तके वाचून चर्चा करतात.
आणि यावर्षी विज्ञानाचे प्रयोग आणि छोटे वैज्ञानिक उपक्रम ही मुले प्रत्यक्ष विज्ञान प्रयोगशाळेत करतील.
आमचे यंदा हे तिसरे वर्ष !
चढ उतार हे प्रत्येक क्षेत्रात बघायला मिळतातच. प्रत्येकाचे विचार वेगळे आणि त्यामुळे निर्णय आणि मतेही !
ज्ञानार्थी मध्ये मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागस हसू आणि पालकांचे समाधान याचा आलेख कायमच चढता आहे.
याचा आम्हा सगळ्या ज्ञानार्थीच्या टीम ला आनंद आहे.
ज्ञानार्थी क्लासेस
केवळ परीक्षार्थी नव्हे ज्ञानार्थी
We are feeling blessed with positive reviews.
Thank you so much 😊🙏
Message from a school teacher. It's our honour and we are blessed to have such kind words and positive review. 😊 Thank you so much Madam 😊😊🙏
ज्ञानार्थी क्लासेस
मुलांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी व्हावे हाच केवळ उद्देश ज्ञानार्थी मागचा !!
संकल्पना स्पष्ट झाल्या की विषय अधिक चांगल्या प्रकारे कळतो, उमगतो.
ज्ञानार्थीचे वेगळेपण !
1. मुलांच्या विविध क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येतो.
निरीक्षण, वाचन, विचार करणं, ॲनालिटीकल विचार करण्याची क्षमता, इत्यादि
2. केवळ पुस्तकात न अडकता, पुस्तकाशी मैत्री करून त्यातले संदर्भ घेऊन, सभोवतालच्या गोष्टींसोबत अभ्यास करणे,
निरीक्षण क्षमतेचा विकास आणि अंमलबजावणी.
3. वाचन आणि मुद्देसूद लेखन कौशल्य विकास
4. स्व अध्ययनाची आवड
5. का? आणि मग कसे? या प्रश्नांवर भर
6. दडपण न घेता अभ्यास
मातृभाषा दिनाच्या निमित्ताने !!
आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे. २१ फेब्रुवारी २००० पासून हा दिवस युनेस्कोने साजरा करायला सुरूवात केली.
बांग्लादेशाच्या पुढाकाराने हा दिवस मातृभाषा दिवस म्हणून साजरा होतो. आपली मातृभाषा टिकवण्यासाठी बांग्लादेशात झालेल्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जावा ही त्यांची मागणी मान्य झाली.
जगातील सर्वच भाषा, बोली यांचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं म्हणून हा दिवस साजरा होतो.
बहुभाषेतून शिक्षण ही शिक्षणाच्या नव्या रूपांतरणाची काळाची गरज
ही यावर्षीची संकल्पना !
मातृभाषेतून शिक्षण हे नेहमीच आनंददायी आणि ज्ञान वृद्धिंगत करणारे असते.
मातृभाषेतून शिक्षणामुळे सहजता
येऊन तणावरहित शिक्षण होतेच परंतु व्यक्ती अधिकाधिक समृद्ध होते.
आपल्या भारत देशाला अनेक भाषांचा थोर असा वारसा लाभलेला आहे.
आपल्या माय मराठी सोबतच हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, पंजाबी, ओडिया, बंगाली, गुजराती, अशा इतर अनेक भाषा आपल्या भारतात बोलल्या जातात, शिकल्या जातात.
मातृभाषेतून मिळणारी सहजता आणि व्यक्त करण्याची शैली ही काही वेगळीच.
आजही बहुतांश व्यक्ती मातृभाषेतूनच प्रथम विचार करतात आणि स्वप्नही पाहतात.
सफरचंद म्हंटल्यावर लाल लाल रसरशीत 🍎 असे सफरचंद उभे रहाते apple नव्हे.
आमच्यासारख्या अनेक मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून शिकलेल्या पालकांची मुले मात्र मातृभाषेतून शिक्षण घेताना दिसत नाहीत.
पालकच इतके साशंक असतात.
एक शिक्षिका म्हणून हे नक्कीच ठामपणे सांगू शकते की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास मुले ताण रहित होऊन जास्ती मोकळेपणाने अभ्यास शिकतात आणि तो विषय सहज समजू शकतो.
ती मुले स्वतःला चांगल्या पद्धतीने त्या गोष्टीशी , शिकत असलेल्या गोष्टीशी जोडू शकतात.
एक पालक म्हणूनही हेच सांगेन, की माझ्या मुलगा मातृभाषेतून शिक्षण घेत आहे आणि त्याची शैक्षणिक प्रगती सोबतच खेळातील आणि इतर कलांमधील प्रगतीही उत्तम आहे.
आनंददायी शिक्षणामुळे हा फायदा नक्की होतोय.
आपल्या मातृभाषेसोबतच इतरही भाषा विशेष महत्व देऊन त्यांचे संवर्धन करायला हवे.
नवीन शिक्षण धोरणामध्ये पहिल्या पाच इयत्ता मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना आहे.
याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.
मुलांच्या मनावरचे अभ्यासाचे ओझे हलके होऊन त्यांना शिक्षणाची आवड आणि शिकताना आनंद हे नक्कीच होऊ शकेल.
ज्ञानार्थीं क्लासेस
बालदिन
आज बालदिन ! समस्त बाळ गोपाळांना बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
मज्जा करा, धमाल करा. कितीही मोठे झालात तरी तुमच्यातील दडलेले मूल हरवू देऊ नका.
आपल्याकडे जशी सगळ्या सोयी सुविधा लाभलेली बाळं आहेत तशीच काही ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहिलेली, कष्ट करणारी, रोजच्या दोन वेळेच्या अन्नासाठी धडपड करणारी, मेहनत करणारी सुद्धा बाळं आहेत. या सगळ्या बाळांना मूलभूत सुविधा मिळतील तेव्हा खऱ्या अर्थाने बाल दीन न रहाता बालदिन साजरा होईल.
सौ. अनघा तुषार जोशी
ज्ञानार्थी क्लासेस
ज्ञानार्थी क्लासेस
विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावं हा क्लासचा उद्देश.
Conceptual learning चा फायदा होतोच.
Happy to Share !!
Again a proud moment of "ज्ञानार्थी क्लासेस"
आपल्या क्लासमधील विद्यार्थिनी समृद्धी दामले शिष्यवृत्ती परीक्षेत वर्गातून पहिली आली.
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा समृद्धी.
आज विजयादशमी
या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा
पाटीवर १ या अंकाची सरस्वती काढून पूजनाचा दिवस त्याचसोबत इतरही विद्यार्जनाची साधने पूजनाचा दिवस.
सरस्वती, ती ज्ञानदायिनी आहे.
तिची उपासना करून, आजच्या दिवशी ज्ञान प्राप्तीसाठी, आपल्याजवळील ज्ञान देण्यासाठी सतत प्रयत्न करत रहायचे.
आजवरचा अडीच वर्षांचा हा ज्ञानार्जनाचा आणि ज्ञान देण्याचा प्रवास बघता तिच्या कृपादृष्टिशिवाय हे असाध्यच होतं.
एक एक पाऊल पुढे टाकत हा प्रवास आपल्या सर्वांच्या साथीने पुढे नेत आहोत.
ज्ञानार्थी क्लासेस सुरू करण्यामागची प्रेरणा हे ज्ञानार्थी बनविणे हाच होता आणि आहे.
आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या सगळ्यांसोबत ही बातमी सांगताना विशेष आनंद होत आहे.
लवकरच एक नवीन उपक्रम घेऊन येतोय.
सध्याच्या विज्ञान स्पर्धेच्या युगात आपल्याकडील innovation and creative thinking ला जास्त महत्व आहे.
रट्टा मारून कुणीही शोध लावू शकता नाही. त्यासाठी कल्पकता आणि दृष्टिकोन महत्वाचा.
विज्ञानाची गोडी आणि विज्ञानाकडे बघायचा दृष्टिकोन आणि रोजच्या आयुष्यात विज्ञानाचा वापर याचा समावेश या उपक्रमात असेल.
मुलांच्या कल्पना विश्वात आम्ही डोकावणार आहोत.
त्यांच्या सोबत कल्पक उपक्रम करणार आहोत.
"Be innovative and creative thinker"
उपक्रमाबाबत अधिक माहिती लवकरच share केली जाईल.
ज्ञानार्थी क्लासेस
UBUNTU
Means I am because we are !
What a meaningful sentence and the way to sweet gesture of gratitude.
I am because we are !!
मी आपल्यामुळे आहे!
यात मी पण नाहीच जे आहे ते आपण आहोत.
सध्याच्या युगात, rat race मध्ये आपल्या मुलांना उतरवताना, आणि त्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर आपल्या मित्राबद्दल, आपल्या सहकाऱ्याबद्दल असूया मराठीतल्या स्वच्छ भाषेत जेलसी, म्हणजेच द्वेष मनात पसरत जातो आणि तीच आपली जीवनपद्धती आहे आणि असेच वागायचे असते अशाच विचारसरणी बरीचशी मुले वागताना दिसतात.
यात काही पालकही काही अंशी सहभागी आणि पाठिंबा देताना दिसतात.
या सगळ्या विचारधारणे मध्ये आणि मुळे ती मुले त्या स्पर्धेचे उद्दिष्ट आणि त्यातील गंमतच विसरून जाताना दिसतात.
नुसते उद्दिष्ट आणि गंमत नव्हे तर आपल्या सहकाऱ्याबद्दल, आपल्या मित्राबद्दलचा जिव्हाळा, प्रेम हे सगळंच विरून, विसरून जातात.
त्या नात्यातील गंमतही !
आणि जर सरतेशेवटी प्रत्येक जण असाच आणि याच विचारधारणेचा झाला तर पुढच्या पिढीचे काय? त्यांच्यातील परस्परांतील संबंधांचे काय?
आज एक शिक्षक म्हणून
हे सगळं बघताना, त्रास होतो,
वाईट वाटतं आणि या सगळ्यात महत्वाचे मुलांच्या मनात सकारात्मक ऊर्जा आणि योग्य विचार करण्यासाठी काय करता येईल हाही विचार चालूच असतो.
आपण ज्ञानार्थी मध्ये, वेगवेगळ्या उपक्रमांमार्फत, लेखन कौशल्य, शिकवणीतून, चर्चासत्रातून मुलांमध्ये या सकारात्मक विचारांचे बीज पेरण्याचा प्रयत्न करतो.😊
ज्ञानार्थी क्लासेस
आज कांदळवन संवर्धन दिन
कांदळवन ही आपल्या जैवविविधतेमधील एक महत्वपूर्ण भाग आहेत.
जैवविविधतेमधील सगळेच घटक महत्वाचे खरंतर, पण कांदळवन ही समुद, खाडीलगत असणारी एक महत्वपूर्ण जैवविविधतेतील संरक्षण भिंत !!
जागतिक कांदळवन संवर्धन दिन 2016 पासून साजरा केला जातोय.
कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो.
दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोर या देशात कांदळवन संवर्धन आणि संरक्षणाची सुरवात झाली,
नंतर 2015 साली युनेस्कोने यांस मान्यता दिल्यानंतर 2016 पासून जागतिक कांदळवन संवर्धन दिन 26 जुलै रोजी साजरा केला जातोय.
भारताला तिन्ही बाजुंनी समुद्रकिनारा लाभला आहे आणि म्हणून कांदळवनही तेवढ्याच प्रमाणात लाभले आहे.
कांदळवन संरक्षण भिंत का तर त्सुनामीसारख्या नैसर्गिक संकटांपासून संरक्षण करण्यासाठी कांदळवन !
समुद्राचं आक्रमण रोखण्यासाठी उपयोगी असतात ही वनं मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतात.
माश्यांच्या प्रजननासाठी ही वनं उपयोगी असतात.
कांदळवनांमध्ये मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळते.
ही कांदळवने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
जैवविविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे खरंतर!
लोकसहभाग आणि जनजागृतीतून कांदळवनांचे संरक्षण आणि संवर्धन नक्की करता येऊ शकेल.
येणाऱ्या पिढ्यांना आपण काय देऊया?
आपला निसर्गसंपन्न वारसा देऊया !
एक शिक्षक या नात्याने निसर्गाचे महत्व कळण्यासाठी पटण्यासाठी असे अनेक उपक्रम या संदर्भात करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
ज्ञानार्थी क्लासेस
ज्ञानार्थी क्लासचे पहिले दहावीचे वर्ष
आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे हे यश आपल्यासोबत साजरे करताना विशेष आनंद होतोय.
सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक🤗☺️☺️
आज ज्ञानार्थीचा दुसरा वाढदिवस !!
दोन वर्षांपूर्वी, 15 जून 2020 ला जेव्हा ज्ञानार्थी सुरू केलं, तेव्हा सगळं जग बंद होतं !
वेगळ्या विचाराने ज्ञानाधिष्ठित शिकवणं, फक्त मार्क्स हा विचार न करता हा मुख्य विचार घेऊन, ज्ञानार्थी सुरू केलं.
प्रथम ऑनलाईन माध्यमातून सुरू झालेला क्लास हळूहळू ऑफलाईन झाला.
पडद्यापल्याडची आमची मुले प्रत्यक्ष समोर आली आणि तो आनंद अवर्णनीय होता.
आज क्लासला दोन वर्षे पूर्ण होताना विशेष आनंद होतोय
आमचे विद्यार्थी आणि पालक यांच्या साथीने दोन वर्षे पूर्ण झाली.
आपल्या सगळ्यांचे आभार.
आज जागतिक पर्यावरण दिन, या निमित्ताने
केवळ एक दिवस साजरा न करता हा दिवस कायमस्वरूपी फायदा होईल अस प्रत्यक्ष काम केलं पाहिजे.
डॉ. मुंडल्यांनी सांगीतल्याप्रमाणे "देवराई" ही संस्था सुदृढ आणि समृद्ध करण्याचा दृष्टीने कृती करण्याचा संकल्प करूया.
ज्ञानार्थी क्लासच्या अभ्यास सहलीत "देवराई भेट" ही सहल असते तज्ञ मार्गदर्शक डॉ. मुंडल्ये सोबत असतात, त्यांच्यासोबत देवराईभेट ही पर्वणीच !
विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तक न बघता, पुस्तकांशी संबंधित विविध गोष्टी बघाव्यात हा प्रयत्न ज्ञानार्थीचा नेहमीच !
देवराई त्यातील एक.
चला, आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संकल्प करूयात, देवराई सुदृढ आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृती करण्याचा, आपला देवराई हा वारसा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा.
डॉ. उमेश मुंडल्ये यांच्या फेसबुक वॉलवरून
सोयी, सुविधा, सवलती, जात, धर्म आणि त्यातून केला जाणारा द्वेष या वरवरच्या गोष्टींत जगबुडी आल्याच्या थाटात चर्चा(?) करणारी मंडळी निसर्ग, पर्यावरण या आपल्या जगण्यासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी आवश्यक विषयावर गंभीर चर्चा आणि प्रत्यक्ष काम कधी करणार?
या विषयावर प्रत्यक्ष काय करता येईल, काय केलंय यावर चर्चा करायला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त एक दिवस उत्सव साजरा करून सोडून न देता कायमस्वरूपी फायदा होईल असं प्रत्यक्ष काम करायला,कोणी उत्सुक आहे का?
आज जागतिक पर्यावरण दिवस.
पूर्वी लोकांच्या दैनंदिन व्यवहारातून निसर्ग संतुलन, संरक्षण, संवर्धन होत असे. त्यासाठी आपल्या शहाण्या पूर्वजांनी सर्व उपाय परंपरा, रूढी अशा गोष्टींमधे गुंफून त्याला धार्मिक अधिष्ठान देऊन ते उपाय प्रभावी पद्धतीने अंमलात येत राहतील याची काळजी घेतली होती.
अशीच एक उपाययोजना म्हणजे “देवराई”. देवाच्या नावाने राखून ठेवलेला जंगलाचा एक पट्टा किंवा तुकडा. त्यातील कोणतीही गोष्ट व्यापारी वापरासाठी वापरली जात नाही. झाडं तोडली जात नाहीत. अशा हजारो देवराया देशभर विखुरलेल्या आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात पावणेचार हजार देवरायांची नोंद मी केली आहे.
लोकांची प्राथमिकता, मानसिकता बदलल्याने या संस्थेला धोका उत्पन्न झाला आहे. लोकसहभागातून देवरायांचं संवर्धन हा एक महत्त्वाचा उपाय करणं आपल्या अस्तित्त्वाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.
आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी “देवराई” ही आपली पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा वारसा असणारी संस्था सुदृढ आणि समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृती करायचा संकल्प करूया!
आपण हे आपल्या अस्तित्वासाठी करतोय, निसर्गावर किंवा दुसऱ्या कोणावर उपकार म्हणून नाही ही जाणीव मनात असू दे एवढीच अपेक्षा आहे.
ज्ञानार्थी क्लास 6 जून पासून सुरू होत आहेत.
पुस्तकाचा संदर्भ घेऊन पुस्तकाबाहेरचेही शिक्षण !!
विद्यार्थ्यांवर वैयक्तीक लक्ष !
लवकरात लवकर प्रवेश घ्या.
प्रवेशासाठी संपर्क :
अनघा जोशी +91 9920296028
वल्लरी वैद्य +91 9270061194
ज्ञानार्थी क्लासेस
पुस्तकासोबतच पुस्तकाबाहेरच शिक्षण कायमच उपयोगी पडत, आणि ज्ञानात भर पडून अजूनच समृद्ध होतो,
या उद्देशानेच "ज्ञानार्थी" कायमच वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.
होमीभाभा स्पर्धेसाठी एक अभ्यास सहल तज्ञ मार्गदर्शकांच्या सोबत क्लासमार्फत फेब्रुवारी महिन्यात (प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यावर) नेण्यात आली होती.
मुलांना उपक्रम लिहिण्यासाठी या सहलीचा उपयोग होईल हा उद्देश.
सांगायला आनंद आणि अभिमान आहे की क्लासतर्फे नेण्यात आलेल्या या अभ्यास सहलीमध्ये सहभागी झालेला विद्यार्थी सोहम वैशंपायन याला या परीक्षेत सुवर्ण पदक मिळाले.
सोहम आणि त्याच्या पालकांचे अभिनंदन
डॉ. उमेश मुंडल्ये तज्ञ मार्गदर्शक होते.
त्यांच्यासोबत आयोजलेली अभ्यास सहल नेहमीच मुलांना उपयुक्त ठरते.
डॉ. उमेश यांचा या विषयातील सखोल अभ्यास, मुलांना केलेलं योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास सहल असूनही मोकळं वातावरण या सगळ्या गोष्टी मुलांच्या प्रगतीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी उपयुक्त ठरतात.
डॉ. उमेश हे ज्ञानर्थीचच भाग आहेत याचा विशेष आनंद आहेच. 😊
ज्ञानार्थीचा कायमच मुलांना वेगळं आणिमुलांसाठी उपयुक्त देण्याचा प्रयत्न असतो.
प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत.
प्रवेशासाठी संपर्क
अनघा जोशी
+ 91 9920296028
वल्लरी वैद्य
+ 91 9270061194
# सकारात्मक पालकत्व -१
*संगोपन*
शब्द छोटा, सोपा असला तरी अर्थ मात्र खोल !
सध्याच्या स्पर्धात्मक युगात, आता ही स्पर्धा मानायची की नाही हा जरी व्यक्तिनिहाय प्रश्न असला तरी ! आपला पाल्य सगळ्याच क्षेत्रात कसा उत्कृष्ट असला पाहिजे आणि त्याच्या असण्यासाठी सगळे नीतिनियम, नैतिकता बाजूला सारून त्याला *मदत* करून आघाडीवर आणण्याची जी काही करामत पालक करतात ना, ते बघून वाईट तर वाटतच पण चिंता अधिक वाटते ती त्या पाल्याची.
अनेक प्रश्न पडतात अशावेळी
१. पालकांच्या कुबड्या कुठपर्यंत आणि केव्हांपर्यंत ते पोरगं घेऊन जाईल?
२. नैतिकता, नीतिमूल्ये याची अचूक जाण त्याला मिळेल का?
३. आता येतो तो सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर प्रश्न तो म्हणजे पालकांच्या कुबड्यांशिवाय जेव्हा त्याला जगाचा सामना करावा लागेल तेव्हा त्याला तो करता येईल?
साध्या साध्या गोष्टींमध्ये निर्णय घेता येतील, क्वचितप्रसंगी जर परिस्थिती योग्य नसेल तर ती स्विकारुन त्यावर मार्ग काढता येईल? अपयश स्विकारता येईल? धडपडाव लागतच पण परत उठून उभं राहता येत आणि ते स्वतःलाच राहावं लागतं हे त्याला कळेल का?
आणि जर तो या सगळ्याशी जुळवून घेण्यास अपयशी ठरला, आणि जीवन (आयुष्य म्हणणार नाही कारण अशा spoon feeding ची सवय असलेल्या मुलांना आयुष्य काय हे माहीतच नसतं) संपवलं तर त्याचा दोष नक्की कुणाचा?
त्या पाल्याचा की नको त्या स्पर्धेमध्ये (ज्या स्पर्धेचा आयुष्यात पुढे काहीही उपयोग होत नाही) सतत आपलं मुलं पुढे असलंच पाहिजे हा अट्टाहास असणाऱ्या पालकांचा!
मला खरतर प्रचंड कीव येते या मुलांची (हल्लीच्या)
नको तेवढे exposure पालकांना मिळाल्यामुळे बिचाऱ्या मुलांचे वांदे झाले आहेत.
मला माझ्या शालेय किंवा कॉलेजच्या कारकिर्दीत कधीही कुणाचीही आई अभ्यासासाठी, इतर अनेक गोष्टींसाठी शिक्षकांना भेटल्याचे स्मरत नाही.
शिक्षण ही गरज आहेच पण तेव्हा सगळ्यात पुढेच असलं पाहिजे, पहिलंच आलं पाहिजे हा अट्टाहास अजिबातच नव्हता.
मला नेहमीच आपल्या आधीची पिढी फारच समंजस आणि सहनशील वाटते.
आपण सगळ्यात अती अडकत जातोय का? किंवा दुसरं काहीच ध्येय नाहीये आपल्या लेकराखेरीज, बरं ही स्पर्धा आपल्या लेकरापुरती मर्यादित नाहीये, आपल्या पाल्यासोबतच्या सवंगड्यांविषयी स्पर्धक म्हणून द्वेष निर्माण होण्याइतपत विचारशक्ती जातेच कशी?
हीच नात्यातील सहजता, सुदृढपणा आपण शिकवतोय का?
मुलं आत्मकेंद्री बनत आहेत की पालक मुलांवरून आत्मकेंद्री बनत आहेत हा नक्कीच विचार करण्याचा विषय आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की आपल्याला *संगोपन* या शब्दाचा नक्की अर्थ कळलाय का?
© अनघा तुषार जोशी
आज जागतिक पुस्तक दिन !
वाचाल तर वाचाल !
अगदी लहानपणापासून कानावर पडत आलेलं हे वाक्य !
आणि जसजसे मोठं होत गेलो तेव्हा उमगत गेला, वाचाल तर वाचालचा अर्थ !
लहानपणी एवढी आवड होती पुस्तक वाचायची, लायब्ररीतुन पुस्तक घेतलं की तिथूनच रस्त्यातून चालत चालत घरी येताना पुस्तक हातात धरून वाचायला सुरुवात करायचे,
ओळखीचे दुकानदार विचारायचे सुद्धा घरी लाईट नाहीयेत की काय 🤣🤣
एवढं पुस्तकाच माझ्याशी घट्ट नातं !
आता सांगून पटणार नाही कुणाला, एवढं वाचन कमी झालंय !
हल्ली गॅझेटच्या जगात पुस्तक वाचणं म्हणजे time consuming वाटायला लागलंय की काय या मुलांना, त्यापेक्षा ऐकण चांगलं ! वाचायला कंटाळा येतो वगैरे !
वाचन का करावं, कस करावं, त्यामुळे काय होतं हे सगळं सांगितलं पाहिजेच की या पिढीला !
वाचन संस्कृती जपली पाहिजे,
प्रत्येक भाषेत किती छान साहित्य आहे, ते वाचलं पाहिजे.
आपला हा वाचनाचा वारसा पुढे न्यायला काय करता येईल हा प्रश्न नेहमीच पडतो मला.
एक शिक्षक या नात्याने, वेगवेगळे उपक्रम करायला आवडतात,
लेखन कौशल्य सुरू केलं, तेव्हा त्याच सोबत आता वाचन कौशल्य सुरू करतोय आज या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने !
मुलांसाठी लायब्ररी सुरू करतोय,
मुलांनीच सांभाळायची अशी !
सगळी management मुलांनी बघायची.
कितीही नवनवीन तंत्रज्ञान आलं, तरी पुस्तक हातात येऊन वाचण्याचा आनंद काही निराळाच ना !
© ज्ञानार्थी क्लासेस
Dr Umesh Mundlye यांचा अतिशय माहितीपुर्ण लेख
आज (२२ एप्रिल) जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो.
माणूस या एकाच कचरा करणाऱ्या प्राण्याने आपल्या हावेपोटी निसर्गाला हानी पोहोचवण्याचं काम उत्साहाने हाती घेतलंय असं एकूण घटनांवरून सिद्ध होतंय. ही गोष्ट लक्षात आणून देऊन, जाणीव जागृती करून परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी हा दिवस साजरा करायला १९७० च्या दशकात अमेरिकेत सुरूवात झाली. सध्या सुमारे दोनशेच्या आसपासच्या संख्येच्या देशांमधे हा दिवस साजरा केला जातो.
या वर्षीची संकल्पना (Theme) आहे, “Invest in our planet”.
लोकसहभाग, समाजाचा सहभाग, उद्याोगांचा सहभाग, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील धोरणं ठरवणाऱ्या आणि राबवणाऱ्या यंत्रणांचा सहभाग, या सर्वांची आर्थिक, भावनिक आणि श्रमाच्या माध्यामातून झालेली गुंतवणूकच यापुढे पृथ्वीवरचं माणसाचं अस्तित्व किती काळ टिकेल हे ठरवणार आहे.
गेली दोन वर्षं कोरोनाच्या साथीमुळे माणूस हा प्राणी मोठ्या प्रमाणावर घरात बसल्यामुळे थोडा सकारात्मक बदल हवा आणि पाणी या नैसर्गिक स्त्रोतांमधे काही काळ दिसला होता. भीती काहीशी दूर झाल्यावर म्हणा किंवा सवय झाल्यामुळे म्हणा, एकदा माणूस परत बाहेर पडला आणि ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती झाली आहे. नंतर कोरोनाची दुसरी, तिसरी लाट येऊन गेल्या. कोरोनावर अनेक लसीही आल्या आहेत. सध्या तर कोरोना हा शब्दच सगळे जवळपास विसरले आहेत. परत एकदा ये रे माझ्या मागल्या, असं असल्यासारखं वातावरण झालं आहे. फार कोणी काही शिकलंय यातून असं काही जाणवत नाही.
हवेबद्दल, पाण्याबद्दल, जमिनीबद्दल, खरंतर एकूणच नैसर्गिक स्त्रोतांबद्दल, आपले गैरसमज फारच विचित्र आहेत. अगदी टोकाचा स्वकेंद्रित विचार करायचा झाला तर, जोपर्यंत आपल्यामधे स्वत:चं अन्न स्वत: तयार करणं जमणार नाही तोपर्यंत तरी आपल्यातल्या बहुसंख्य लोकांना मनातून वाटत नसेल तरीही जमीनीचं आणि सर्वच नैसर्गिक स्त्रोतांचं आरोग्य सांभाळावं लागणार आहे. आपण फारच गृहित धरतोय सगळ्याच नैसर्गिक स्त्रोतांना. त्याचे दुष्परिणाम भोगत असूनही शहाणपणा सुचत नसल्याने आपण “विकास म्हणजे स्वनाशाकडे वेगाने वाटचाल”, अशी समजूत करून घेतल्यासारखं आपलं वागणं चालू आहे.
आत्ता, परिस्थितीमुळे, अनेकांना नैसर्गिक स्त्रोत, वातावरणातील समतोल, प्रदुषणाचा परिणाम, आपली गरज आणि हाव यातला फरक, अशा अनेक गोष्टी नक्की कळल्या आहेत. त्यामुळे, काही सकारात्मक बदल करून, जीवनशैलीत सुधारणा करून, आपलं आणि पुढच्या पिढ्यांचं जगणं आनंददायी करायचं असेल तर ही संधी स्वत:ला बदलायला उत्तम आहे.
चला, आपणही आपल्या आणि पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षित आणि समृद्ध भवितव्यासाठी निसर्गाचा समतोल राखायला आपल्या कृतीतून प्रयत्न करूया.
जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा!
ज्ञानार्थी क्लासेस तर्फे गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि
नुतन वर्षाभिनंदन
आज गुढीपाडवा, शुभदिवस, आपल्या क्लासच्या जाहिरातींचा श्रीगणेशा केला.
हा आनंद आपल्या सगळ्यांसोबत द्विगुणित करीत आहोत.
सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहू देत.
डॉ. उमेश मुंडल्ये यांनी लिहिलेला लेख !
आजच्या जागतिक वन दिनानिमित्त
आज जागतिक वन दिन. २०१२ पासून आजचा दिवस, म्हणजे २१ मार्च, हा “International day of forests” म्हणून साजरा करायचा निर्णय झाला.
या वर्षी संकल्पना आहे, “"Forests and sustainable production and consumption”. म्हणजे जंगलांना पूर्वीचं समृद्ध रूप मिळवून देणं हाच पर्यावरणाचं आणि पर्यायाने त्यातल्या सर्व घटकांचं कल्याण करण्याचा मार्ग आहे. थोडक्यात, शाश्वत उत्पादन आणि विनिमय आणि जंगल.
जंगलांमधे एवढं काय आहे?
* जमिनीवर असलेल्या जैवविविधतेपैकी अंदाजे ८०% जैवविविधता जंगलांमधे आढळते. सुमारे ६०,००० पेक्षा जास्त वृक्ष प्रजाती जंगलांमधे आढळतात.
* जगातील दीड अब्ज लोकांपेक्षा जास्त लोक जंगलांवर अन्न, निवारा, रोजगार, चरितार्थ, औषधं, इत्यादि गोष्टींसाठी अवलंबून आहेत.
* दरवर्षी आपण जगभरात मिळून सुमारे १ कोटी हेक्टर एवढं जंगल कायमस्वरूपी गमावत आहोत.
* जमिनीचा ऱ्हास होण्याचं प्रमाण जगभरात प्रचंड वाढलंय. सुमारे २ अब्ज हेक्टर जमीन, म्हणजे दक्षिण अमेरिकेपेक्षा जास्त भूभाग, यामुळे प्रभावित होते आहे.
ही माहिती डोळे उघडायला लावणारी आहे. मग हा प्रश्न मनात येतो की हे दिवस का साजरे करायचे?
आपण आपल्या सोयी सुविधांसाठी, जाणते अजाणतेपणाने, निसर्ग आणि पर्यावरण यांचं काय करून ठेवलंय ते लक्षात यावं आणि या दिनानिमित्त त्यावर खरंच गंभीर विचार होऊन प्रत्यक्ष काही काम घडावं यासाठी आपण हे दिवस साजरे करायचे असतात. दुर्दैवाने आपण १ दिवसाचा उत्सव करून दिवस साजरा करून टाकतो आणि ३६४ दिवस परत दुर्लक्ष करतो. कारण आपण निसर्गापासून भावनिक दृष्ट्या इतके दूर गेलो आहोत की हा निसर्गच आपल्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक आहे हेच आपल्या लक्षात राहीलेलं नाही.
आपण खरंच किती गंभीर आहोत आत्ताच्या परिस्थितीबाबत? नैसर्गिक स्रोतांचे अतिशोषण आपण करतोय, तेही गरजा नाही तर हाव पुरी करायचा प्रयत्न म्हणून, हे आपल्यापैकी किती लोकांना पटतंय? फक्त दिन साजरा करून नक्की काय मिळवतोय आपण? (तो तरी करावासा वाटतोय का?)
माणसाने कितीही प्रगती केली तरी जोपर्यंत त्याला प्राणवायू हवाय आणि जोपर्यंत हरितद्रव्य त्याच्या त्वचेत तयार होत नाही तोपर्यंत तरी, झाडं असणं आणि ती चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या संख्येने असणं, ही माणसाची गरज आहे.
पृथ्वीवरून माणूस नष्ट झाला तर निसर्गावर काही वाईट परिणाम नाही होणार (कदाचित चांगला परिणामच होईल), पण आपलं अस्तित्त्व टिकवायचं असेल तर माणसाला निसर्गातला समतोल परत साधावाच लागेल. आणि ते एक दिवसाचं काम नाहीये.
यासाठी लोकसहभागाची गरज आहे. प्रत्यक्ष जंगल वाढवायचे प्रयत्न करण्याची गरज आहे, फक्त वृक्ष लागवड करून हवा तो परिणाम साधला जाणार नाही.
आपल्याकडे तर जंगल वाढीला पोषक भरपूर गोष्टी आहेत. गेले कित्येक पिढ्या जीवनशैलीचा एक भाग बनवून राखलेली “देवराई” ही संस्था आणि त्यामुळे राखले गेलेलं जंगल, जैवविविधता, पाणी, माती आणि या सगळ्यांच्याच महत्त्वाविषयी मनात राखली गेलेलं ममत्व.
आता गरज आहे ती प्रत्येकाने आपला कामाचा वाटा उचलण्याची. आणि हे लक्षात ठेवण्याची की हे जंगल, झाडं आहेत म्हणून आपण श्वास घेतोय आणि आपण आपल्या करणीने आपलं आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचं जगणं खूप मुश्कील करून टाकतोय. सरकारनेच सगळं केलं पाहिजे असा नियम नाही. आपल्या अस्तित्वासाठी प्रत्येकानेच काम करणं आवश्यक आहे. आणि आपल्याकडे लोकसहभागातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाची परंपराही समृद्ध आहे. गरज आहे ती परंपरा परत पुनरूज्जीवीत करायची.
देवराई - आपल्या पूर्वजांनी देवराई ही पर्यावरणाच्या साथीने चालणारी लोकसहभागातून चालवलेली पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन संस्थाही आपण दुर्लक्षित करून संपवत चाललो आहोत. ही संस्था डोळ्यांसमोर आणि डोक्यात ठेवून काम करणं, आहे त्या देवराया वाचवणं, नवीन तयार करायचं काम सुरू करणं, इत्यादि करायची गरज आहे. आणि हे कायम करत राहण्याची गरज आहे.
चला तर, इथे फक्त चर्चा करण्यापेक्षा दरवर्षी प्रत्येकी किमान ५ झाडं लावून जगवूया. आणि त्यातून प्रत्यक्ष पैसे मिळणार नाहीत पण पशु पक्षी यांना उपयोगी पडतील अशीच झाडं निवडूया. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की फक्त वृक्ष प्रजातींची लागवड करून फायदा होणार नाही तर चांगल्या जैवविविधतेचे जंगलाचे पट्टे तयार करायची गरज आहे. त्यात यश मिळालं तर त्यातूनच बरेचसे प्रश्न सुटणार आहेत. पण यासाठी वर्षभर आणि कायमच प्रत्यक्ष जमिनीवर काम करायची गरज आहे. नुसतं सोशल मिडीया वर चर्चा करून किंवा एक दिवस काम करून परिणाम दिसणार नाही.
मग, कोण कोण येतंय कामाला?
डॉ. उमेश मुंडल्ये
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Dombivli
421201
1st Floor , Nehete Niwas, Opposite G. P. Parsik Bank , Drive Rajendra Prasad Road , Shiv Mandir Chowk
Dombivli, 421201
Dombivli, 421201
Busy Bees Phonics & Grammar Class 3.5 yrs to 10yrs @ DOMBIVLI East/West
Manpada Road
Dombivli, 421203
kidz educare preschool is an early childhood program in which children combine learning with play in a program run by professionally trained adults.
1st Floor, Deshmukh Building, Tilak Road, Phadke Cross Road, Above Pizzahut, Opposite HDFC Bank Dombivli East, Thane/
Dombivli, 421201
Wings Academy is one of the well known IT training Institutes in Dombivli/Thane, Mumbai and Maharash
Shop No. 11, Suman Heights, Opp. Lodha Heritage Garden, Lodha Heritage
Dombivli
Bambini world-Preschool has courses as follows: play group, nursery, JrKG, SrKG, tuitions for I to
Nextop Tutor Shop No. 221 Commerce Plaza Opp To National Plywood, 4 Rasta
Dombivli, 421201
Subhash Road
Dombivli, 421202
GuruGyaan announces - DIPLOMA IN EARLY CHILDHOOD CARE AND EDURICHMENT I hear, I forget| I see, I r
Dombivli, 421201
On this channel i will be uploading videos related to Microsoft Office Excel, Word, Power Point. The