
https://www.youtube.com/live/7Ho-W-OTMeQ?si=TJhiQ7Wszbap_X24
Today's program link 👇
SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023 SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Basic Activity Centre For Science And Solar Education, Education Website, Dombivli.
Operating as usual
https://www.youtube.com/live/7Ho-W-OTMeQ?si=TJhiQ7Wszbap_X24
Today's program link 👇
SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023 SAKHI SAHYADRI Live Dt. 02.11.2023
सौरऊर्जा वापर वेगाने वाढवणे ही काळाची गरज आहे. अजूनही 90 - 95 टक्के कुटुंबांमध्ये पारंपरिक इंधन वापरले जात आहे. सौरऊर्जा हा त्या इंधनांना पर्याय होऊ शकेल का? सर्वाना वापरता येणे शक्य आहे का? पावसाळ्यात काय करायचे? आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणाचा फायदा आहे का? समाजातील समज/ गैरसमज असे अनेक प्रश्न आणि उत्तरे घेउन येत आहोत वरील कार्यक्रमात👆.
तेव्हा नक्की पहा आणि आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनला पाठवण्यासाठी जरूर पाठवा.
Happy Dasara🌹🌹
BASSE in collaboration with Don Bosco high School, kalyan was organized a workshop on "Making Science Toys" by Abhay Yawalkar on 9th september 2023. We received an overwhelming response from students and Science faculty.
Finally.....Offline sessions starting in Dombivli !!
मूलभूत कृतीशील विज्ञान आणि सौर ऊर्जा केंद्राच्या फिरत्या आणि ऑनलाईनला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादानंतर डोंबिवलीत ऑफलाईन केंद्र सुरु केलं आहे . विद्द्यार्थ्यांमध्ये मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, प्रयोगातून कृतिशील विज्ञान शिक्षण घेउन कौशल्य विकास व्हावा आणि दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयोग करता यावा हे उद्दिष्ट समोर ठेवून अनेक उपक्रमांची आखणी केलेली आहे. या उपक्रमांचा फायदा होमीभाभा बालवैज्ञानिक, NMMS, NTS यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये होत आहे.
उपक्रमांच्या अधिक माहितीसाठी https://basse.co.in/ संकेतस्थाळाला जरूर भेट द्या.
केंद्राचा पत्ता : 1, शंकर स्मृती, सुभाष रोड, RBL बँकेच्या शेजारी, डोंबिवली, पश्चिम.
संपर्क क्र. 098927 39798, 9869065547
https://youtube.com/watch?v=OB_hVs0pFZU&feature=share
जी 20: ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या मुंबईतील बैठकीचं महत्व जाणून घेवूया! बातम्या ऐकण्यासाठी 'Mumbai AIR News’ या चॅनलला Subscribe करा.आमच्या वेबसाईट ला भेट द्या. @ https://newsonair.gov.in/Marathi/Mara... आमच्या ट्विटर अकांऊट ला .....
"स्वयंपाक घरातील उपकरणे आणि इंधन बचत" या विषयावरील सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमाची लिंक 👇
SAKHI SAHYADRI 04.05.2023 SAKHI SAHYADRI 04.05.2023
शाश्वत विकासासाठी गृहिणींकडून स्वयंपाक घरात होऊ शकते हजारॊरुपयांची आणि राष्ट्रीय संपत्तीची बचत.
*योग कार्यशाळा*
विद्यार्थी आणि पालक
सर्वाना नमस्कार
*मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा केंद्र, डोंबिवली* आयोजित योग कार्यशाळा
🗓️कधी : गुरुवार दिनांक 3 मार्च ते 10 मार्च
⏰वेळ : सायं 5 ते 6
शास्त्रशुद्ध पद्धतीने होणाऱ्या या वर्गात 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी आणि पालक सहभागी होऊ शकतील. अभ्यास करताना एकाग्रता, उत्तम आरोग्य आणि व्यायाम यांची सांगड घालणारा हा वर्ग असेल.
हे *वर्ग निःशुल्क* असून फक्त मुलांनी यात सातत्य ठेवावे आणि लॉकडाऊन काळात झालेले शारीरिक आणि मानसिक नुकसान भरून काढावे इतकेच ध्येय यामागे आहे. इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी आणि आपल्या जवळील नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांनाही सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यावे ही इच्छा. नोंदणी आवश्यक.
नोंदणीसाठी संपर्क
9892739798, 8422972628
डॉ वसंतराव गोवारीकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनास सुरुवात करून दिली ती 1987 साली.
त्यावेळी ते भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख होते.सातत्याने 35 वर्ष विज्ञान दिन संपूर्ण देशभर साजरा करताना खूप आनंद होत आहे. साडेतीन दशकातील एकूण 33 विज्ञान दिन मला अनुभवता आले. काही वेळा तर एकाच दिवशी 2/3 कार्यक्रमांना मला मार्गदर्शक अतिथी म्हणून जाण्याची संधी विज्ञान प्रेमींनी दिली. यात शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था आणि प्रसार माध्यमांचा समावेश आहे. यातील काही शाळांमधून वारंवार बोलावणे तर असतेच परंतु या शाळा, संस्थांमध्ये निरनिराळे उपक्रम करून तेथे विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आजमितीला त्या संस्था विज्ञान दिन साजरा करण्याचे सातत्य टिकवून आहेत. याचे समाधान पैशात ही विकत घेता येणार नाही हे निश्चित. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा, प्रयोग सत्र, विज्ञान खेळणी कार्यशाळा, व्याख्याने, भित्तीपत्रक स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा होताना आज आपण पाहत आहोत. ही जमेची मोठी बाजू म्हणावी लागेल. जस जसा काळ जाईल तसतसे यात नावीन्यताही येईल. आता विज्ञान दिनाचा हा वृक्ष मोठा झालेला आहे. त्यावेळी संपूर्ण समाजापर्यंत विज्ञान कसे पोहचू शकेल यावर मेहनत घ्यावी लागेल. प्रदर्शन, भित्तीपत्रके हे समाजप्रबोधनाचे माध्यमे आहेत. या माध्यमांचा पारंपरिक पद्धतीने आपण वापर करतच आहोत. पण याबरोबरच कृतिशील उपक्रम अधिक प्रभावी ठरतील आणि ठरत आहेत हे निश्चित. रोजच्या वापरात येणारे विज्ञान समाजाला कसे उपयोगी आहे, त्यातून आर्थिक फायदा, वेळेची बचत, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि उद्या येणाऱ्या समस्यावर उपाय यावर भर द्यावा लागेल. विज्ञान वास्तवाला धरून असते, त्यातून फक्त आणि फक्त सत्यता ते समाजा समोर आणत असते. डॉ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे संशोधन आजही पदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कॅन्सर सारख्या आजारात गाठींचे स्वरूप बघण्यासाठी रमण यांचे संशोधन उपयोगी ठरत आहे.
यावर्षीचा विज्ञान दिन त्रिदल एजुकेशन सोसायटी ची पाटील बालमंदिर माध्यमिक शाळेत साजरा केला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुलांनी कमीत कमी वेळात प्रतिकृती तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे सर्व प्रतिकृती कार्यरत होत्या आणि ते पाहताना मुलांमधील आत्मविश्वास दिसत होता. याच ध्यासाने विज्ञान रुजलं तर देशात एक उत्तम वैज्ञानिक वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. यातूनच भावी पिढीला वैज्ञानिक मार्गाचा विस्तार करत आपले ध्येय गाठता येईल.
अभय यावलकर
विज्ञान अभ्यासक आणि प्रसारक.
Basic Activity Centre For Science And Solar Education now takes appointments on their Page.
Happy Students with Home lab
17 Home lab Successfully Installed
*विविध स्पर्धा आणि मूलभूत विज्ञान शिक्षणाकरिता Basic Activity Center for Science & Solar Education (BASSE) चा उपक्रम - घरची प्रयोगशाळा (Home Lab) एक उत्तम पर्याय*
लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाचे स्वरूप काहीसे दिसायला सुरवात झाली आहे तर पुढील 10 वर्षात याचे परिणाम प्रकर्षाने जाणवतील. ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न (BASSE )करत आहे.
Basse ने आपल्या मुलांसाठी *होम लॅब* चा अतिशय उत्तम आणि ठोस पर्याय सुरु केलेला आहे. प्रयोग साहित्याची एकदाच गुंतवणूक करावयाची असून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे प्रयोग या साहित्यातून करता येणार आहे.
Basse ने प्रत्येक इयत्तेचे 100हुन अधिक प्रयोगांची आखणी केलेली आहे. या प्रयोगांतून मूळ संकल्पना स्पष्ट होणार आहेत. शिवाय हाताने केलेले मूळ प्रायोगिक काम दीर्घकाळ लक्षात राहणार असून प्रत्यक्ष त्याची व्यवहारातील उपयोगीताही मुलांना कळणार आहे. वर्षभरातील 40 रविवार, 100 प्रयोग हे विद्यार्थी करतील अशी योजना यात केलेली आहे. सुमारे 60 साधने, 30 रसायने, स्लाईड्स, दर्जेदार सूक्ष्मदर्शक इ. साधने या प्रयोगशाळेत असणार असून दर रविवारी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा. पहिल्या बॅचच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर 23 जानेवारी पासून दुसरी बॅच सुरु करत आहोत.
ही प्रयोगशाळा बालवैज्ञानिकांना दीर्घकाळासाठी उपयोगात येणार आहे. कौशल्य विकसनासोबत अंतर्गत आत्मविश्वास निर्माण करेल. अर्थातच नवनिर्मितीला यातून वाव मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री वाटते.
इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी रविवार, 16 जानेवारी 2022 पर्यंत नोंदणी करावयाची आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:- 9892739798, 8422972628
*बालदिन विज्ञानोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा*
मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा शिक्षण केंद्र (BASSE), डोंबिवली यांनी लॉकडाऊन काळात *अनुभूती* या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते. सुमारे 45 रविवारी निरनिराळ्या कृती करून मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग केला. दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी बालदिनानिमित्त मुलांनी केलेल्या प्रयोगांचे सादरीकरण आयोजित करून विज्ञानोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी नेहरू विज्ञान केंद्राचे उपसंचालक श्री उमेशकुमार रोस्तगी आणि रॅलीज इंडिया कंपनीचे व्हा. चेअरमन ह्युमन रिसोर्स आणि सस्तेनेबिलिटी श्री अलोक चंद्रा या मान्यवरांनी ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सुमारे 250 हुन अधिक विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत झाला.
कार्यक्रमात माननीय श्री अलोक चंद्रा यांनी मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा शिक्षण केंद्र (BASSE) च्या संकेत स्थळाचे (website) उदघाटन केले .
संकेतस्तळ (Website):http://basse.co.in/
या उदघाटन प्रसंगी त्यांनी प्रयोगशीलता कशी महत्वाची आहे, हाताने केलेले काम आपण विसरू शकत नाही, अशी कामे आपण वारंवार केल्यामुळे कौशल्य विकसित होऊन संकल्पना विकसित होण्यास मदत होते याचे महत्व सांगितले आणि हेच कार्य श्री अभय यावलकर करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करत त्यांनी संकेत स्थळाचे उदघाटन केले.
श्री उमेशकुमार यांनी कृतिशीलतेचे महत्व विद्यार्थ्यांना सांगताना मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा शिक्षण केंद्र (BASSE) तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान पोहचवण्याच्या ध्येयाने काम करत असल्याचे सांगितले. कृतिशीलतेचा अनुभव घेऊनच आपण प्रत्यक्ष वावरतो आणि अनुभवसंपन्न यशस्विता हाच अनुभूती उपक्रमाचा ध्यास आहे. म्हणूनच विद्यार्थी - पालक, शिक्षक, जेष्ठ नागरिक यांना याचे महत्व पटलेले आहे. समाजपयोगी विज्ञानाच्या या ध्येयपूर्तीसाठी सर्व स्तरातून अनेक मान्यवरांच्या सदिच्छा सहकार्य मिळत आहे.
एखादा उपक्रम दीर्घकाळ चालून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करतो आणि त्यात सातत्य टिकून ठेवतो हेच त्या उपक्रमाचे यश आहे असे मत श्री अभय यावलकर यांनी मांडले. अजून खूप काम करायचे आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि सदिच्छा मिळत राहतील अशी आशा करतो. आज सुरु केलेलं संकेतस्थळ विद्यार्थ्यांना मूलभूत आणि कृतिशील विज्ञानाचे उपक्रम देण्यास पूरक ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
BASIC ACTIVITY CENTER FOR SCIENCE AND SOLAR EDUCATION (BASSE)
*Anubhuti*
Toys and experiments will be taken from the students in this workshop. This will enhance their research attitude.
There will be 3 levels of 15 Sundays of this creative activity. (Each level will be 15 Sundays. Thus, 3 levels will be 45 Sundays.)
Language : Hindi and English
This workshop starts from 1st August 2021.
400 science kits successfully completed and dispatched
Various educational puzzles available here for primary and secondary
प्रथम वर्धापन दिन
Basic Activity Center for Science and Solar Education (BASSE)
*प्रथम वर्धापन दिन*
*सस्नेह निमंत्रण*
दिनांक: 30 मे 2021
वेळ : सकाळी 10:30
मूलभूत कृतिशील विज्ञान आणि सौरऊर्जा केंद्र समाजाभिमुख आणि आनंददायी विज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करत आहे. गेल्या २९ वर्षांपासून सुरु असलेले प्रयत्न कोविड १९ च्या काळातही सुरु आहे. लॉकडाऊन परिस्थितीतही भारतातील शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान यशस्वीरीत्या पोहचवले. या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तसेच त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि उजाळा मिळावा यासाठीच हा सोहळा साजरा करत आहोत.
कार्यकार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण फेसबुक पेजवर
Link
https://www.facebook.com/pg/Basic-Activity-Centre-For-Science-And-Solar-Education-102994951410021/offers
Contact No. : 9892739798 , 8422972628
BASIC ACTIVITY CENTER FOR SCIENCE AND SOLAR EDUCATION (BASSE)
*चला समजून घेऊ स्वयंपाक घरातील विज्ञान आणि सोबत पैसेही वाचवू*
पारंपरिक पद्धतीचा अवलंब केल्याने वेळ आणि इंधनाचा अपव्यय होतांना दिसतो. हे टाळण्यासाठी स्वयंपाकाची भांडी, ती वापरण्याची पद्धती आणि स्वयंपाक करताना ची रचना योग्य केल्यास वेळ, इंधन आणि पैसा वाचू शकतो तसेच नैसर्गिक साधन संपत्ती वाचते यासाठीच हा समाजाभिमुख उपक्रम.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्र. 9892739798, 8422972628
सौरऊर्जेवरील प्रयोग या कार्यशाळेची छोटीशी झलक
"विज्ञान मित्र"
हा उपक्रम २८ एप्रिल ते २ मे दरम्यान नुकताच संपन्न झाला . पाच दिवसाच्या या अभ्यासक्रमास महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातील विविध ठिकाणचे 22 विद्यार्थी जोडले गेले. विविध वैज्ञानिक आणि सद्यपरिस्थीवर आधारित विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच प्रयोग आणि प्रयोगाचा विस्तार करून प्रकल्पात रूपांतर करणे , वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब व्यवहारात कसा करावा याचा अनुभव मुलांनी घेतला. अनेक वर्षांनंतर चार दिव्यांग मुलांसोबत हा उपक्रम करण्याचा आनंद मिळाला. ह्या चार विज्ञान मित्रांसोबत इतर बालमित्रांमध्येही जी जिज्ञासा निर्माण करता आली त्याचा आनंद पैसे देऊनही विकत घेता येणार नाही हे निश्चित .
Monday | 9am - 8pm |
Tuesday | 9am - 8pm |
Wednesday | 9am - 8pm |
Thursday | 9am - 8pm |
Friday | 9am - 8pm |
Saturday | 9am - 8pm |
Sunday | 9am - 9pm |
BinaryFunda focuses on the latest trends in the Tech World, primarily Java and related technologies along with tutorials related to those. The tutorials are designed keeping in mind the trends in the industry.
Engrow English Learning course is a specialist course that focuses not only on speaking but also on s
Passionate Assignment Writer | Dedicated to Crafting High-Quality Academic Content
Inspired by his commitment to reach the latest modern computer education at an affordable
Education is about learning for everyone, everywhere. Subscribe to our channel.
Inspired by his commitment to reach the latest modern computer education at an affordable
Codeachive is offering industry relevent best IT professional training program with 100% placement.
Knowledge is power. ♥️🌟Power Excel you to the world.💐
Ikidz is a chain of Premium Play School in your locality that ensures intellectual, social & emotion