Bambini world-Bambini preschool

Bambini world-Bambini preschool

Share

Bambini world-Preschool has courses as follows: play group, nursery, JrKG, SrKG, tuitions for I to

24/06/2025
05/06/2025

पर्यावरण दिन
Environment Day

04/06/2025

जागतिक पर्यावरण दिनाची पूर्वतयारी

Photos from Bambini world-Bambini preschool's post 24/04/2025

"कासव" - निसर्गातील शांत स्वभावाचा हा जीव- या बद्दल नेहमीच कुतुहल वाटत आले आहे.बालपणीच्या ससा कासवाच्या बोधकथेतील शांत आणि सकारात्मक विचाराने जिंकलेले कासव असू दे की अगदी शेकडो वर्षे जगणारे महाकाय (Galapagos - गॅलापागॉस) कासव असू दे! " कासव" हा नेहमीच कुतुहलाचा विषय ठरला. याच कुतुहुलाच्या कक्षा रुंदावत एका अश्या कासवाच्या प्रजाती बद्दल आपण जाणून घेत आहोत ते म्हणजे "ऑलिव्ह रिडले" कासव. ह्या प्रजातीतील मादी कासव समुद्रात कोठेही असली तरी अंडी घालण्यासाठी मात्र ज्या समुद्रकिनारी तिचा स्वतःचा जन्म झाला, त्याच किनारी येते. ऑलिव्ह रिडले हे कासव ओडिशाच्या समुद्रात असते. अंडी घालण्यासाठी थेट 3500 किमीचा प्रवास करत कोकणातील समुद्रकिनारी येते, जणूकाही दूर आपल्या माहेरी बाळंतपणासाठी आलेली माहेरवाशीण!

अंडी घातल्यानंतर ती अंडी वाळूत लपवून मादी कासव पुन्हा समुद्रात पुढच्या प्रवासात निघून जाते. ५०- ६० दिवसांनी अंड्यातून नाजुक, गोंडस-गोडुले "ऑलिव्ह रिडले" कासव बाहेर येतात. कोणीही मदतीला नसताना, समुद्र कोणत्या दिशेला आहे - हे माहित नसताना, आपली इवलीशी पावले समुद्राच्या दिशेने टाकत पुढे सरसावतात. आणि हलकेच लाटेवर स्वार होत आपल्या पुढील प्रवासासाठी निघतात.

लहान कासवांची अंड्यातून निघून समुद्रात पोहचण्यापर्यंतची सफर पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंदच!
आपल्या कोकणात वेळास, अंजर्ले या समुद्रकिनारी मार्च ते मे महिन्यात हा आनंद आपल्याला घेता येतो.
त्या गावातले रहिवाशी कासवाची अंडी आणि लहान पिल्लांची काळजी घेतातच, सोबत येथे येणाऱ्या पर्यटकांचा सुद्धा पाहुणचार सुरेख करतात.

मुंबई आणि पुण्याहून शुक्रवारी रात्री टूर निघते. सकाळी सूर्योद्यावेळी कासवांचा हा सोहळा दाखवला जातो. जर नाही पाहता आले, तर पुन्हा सूर्यास्ताला किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योद्यावेळी पाहता येते. नंतर "बाणकोट किल्ला" पाहून कोकणी पाहुणचार म्हणजेच ताजे मासे आणि सोलकढी अनुभवायची. रविवारी हरिहरेश्वर पाहून रविवारी रात्री आपल्या घरी परत जाता येते. नशीब बलवत्तर असेल तर हरिहरेश्वर येथील समुद्रात डॉल्फिन सुद्धा दर्शन देतात. अगदी सहज आणि सोपा अश्या या निसर्ग सहलीचा आनंद घेण्याचे नियोजन केवळ मार्च ते मे महिन्यांच्या कालावधीतच करता येते.

आयुष्यात एकदातरी हा सोहळा पाहायला हवाच!

- डॉ निखिल जाधव
- सौ. सुचिता सावंत
बॅम्बिनी वर्ल्ड स्कू

Bambini Kiddos made sweet dishes their own and enjoyed it 
#bambini #preschool #indianculture 28/03/2025

आमच्या Bambini शेफ उपक्रमासाठी आम्ही नेहमीच पारंपारिक पण काळानुरूप विसरलेले चविष्ट पदार्थ मुलांना बनवायला शिकवतो. लहान मुले असल्याने गरम पदार्थ बनवता येऊ शकत नाही. चाकू, धारदार वस्तू यांचा कमीतकमी वापर हवा. "मुलांचे प्रोजेक्ट म्हणजे पालकांच्या डोक्याला ताप" असे Bambini चे प्रोजेक्ट कधीच नसतात. आमचे उपक्रम म्हणजे मुलांनी आणि शिक्षिकांनी हसत खेळत शिकत केलेले उपक्रम. लहान मुलांना कुतूहल भारी, पण संयम अजिबातच नाही. त्यामुळे संयम सुटेपर्यंत पदार्थ पोटात जायला हवा, नाहीतर काही खैर नाही. यावर्षीचे बालगोपाळ पुढल्या वर्गात आलेले असतात, त्यामुळे दरवर्षी नवीन पदार्थ हवा. आणि सर्वात महत्वाचे - सर्व मुलांना आवडायला हवा!!!!
या सर्व ' जाचक ' पण गोड अटींमुळे Bambini रिसर्च टीम (शिक्षण तज्ञ) ला "Bambini शेफ पदार्थ " निवडायला खूप मेहनत लागते.

या वर्षी आमचा निवडलेला पदार्थ होता- गोडे पोहे.
अगदी सहज बनणारा चविष्ट पदार्थ. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर फास्ट फूडच्या व्याख्येत चपखल बसणारा.
पदार्थ निवडला, आता "Bambini शेफ" ची तयारी पण दणक्यात हवी. शेफ म्हटला की पांढरी शुभ्र टोपी हवीच हवी. मग काय, आमच्या मुलांनी A4 मापाच्या दोन कागदांनी स्वतःसाठी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली पांढरी शुभ्र टोपी बनवली आणि त्यावर आपले नावही लिहिले. टोपी बनवता बनवता आयत- rectangle, दंडगोल - cylinder shape अशी भूमितीही शिकून झाली. आणि हो, एवढे करत असताना एकही कागद वाया जाऊ दिला नाही!
दुसऱ्या दिवशी अगदी उत्साहाने आमचे छोटे छोटे शेफ हजर झाले. शिक्षिकांनी साहित्य म्हणजेच पोहे, कोमटसर पाणी, किसलेला गुळ आणि चवीसाठी मीठ आणलेच होते. पाच पाच मुलांचे लहानसे गट तयार केले गेले. प्रत्येक विद्यार्थ्याने हातभार लावला आणि बनले स्वादिष्ट - पारंपारिक -पौष्टिक गोडे पोहे.

आम्ही सर्वांनी गोडे पोहे आनंदाने खाल्ले. काही पालक तर आपल्या मुलानी बनवलेला पहिला पदार्थ घरी देवाला "नैवेद्य" म्हणून नेला. किती गोड!!

तुम्हीही बनवा सहज सोपे - स्वादिष्ट गोडे पोहे.

Tr सुचिता सावंत
Dr निखिल जाधव
Bambini world school
डोंबिवली

Bambini Kiddos made sweet dishes their own and enjoyed it #bambini #preschool #indianculture

#india #montessori #bambini 10/11/2024

जे आपण वाचतो तसे आपण १० वर्षांनी होतो, असे म्हटले जाते. हे खरे की खोटे माहिती नाही, पण "एक होता कार्व्हर" ने वैज्ञानिक होण्यासाठी नक्कीच प्रेरीत केले. दुपारी दोन ते रात्री नऊ - असे एका दमात कार्व्हर वाचले होते. ही कमाल आहे वीणा गवाणकर मॅडम यांच्या लेखणीची.
Bambini शाळा चालू करताना सहज, सोपे, जवळचे वाटले म्हणून bambini हे नाव घेतले. वीणा गवाणकर यांच्या " माँटेसरी" पुस्तकाने समजले की जगातील पहिल्या माँटेसरी शाळेचे नाव सुद्धा Bambini होते. प्रत्येक शिक्षकाने वाचावे असे हे मराठी भाषेतील पहिले पुस्तक.
आज वीणा गवाणकर मॅडम सोबतच्या थोर भेटने खूप प्रेरणा मिळाली.

#india #montessori #bambini

03/10/2024

Exam time is also happy time!!

Enjoy evaluation.. it is to improve ourselves!!!

Photos from Bambini world-Bambini preschool's post 03/10/2024

Yellow 🟡 color..

30/08/2024

संगीत मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे. "मोबाईल नको" असे सांगूनही मुले मोबाईल सोडत नाही. त्यांना जर आपण आपल्या सुंदर संस्कृतीची ओळख करून दिली, की मोबाईल अगदी सहज दूर सारता येऊ शकतो.

Want your school to be the top-listed School/college in Dombivli?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address

Shop No. 11, Suman Heights, Opp. Lodha Heritage Garden, Lodha Heritage
Dombivli