MVP's Karmayogi Dulaji Sitaram Patil College Of Agriculture,Nashik

  • Home
  • India
  • Dindori
  • MVP's Karmayogi Dulaji Sitaram Patil College Of Agriculture,Nashik

MVP's Karmayogi Dulaji Sitaram Patil College Of Agriculture,Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MVP's Karmayogi Dulaji Sitaram Patil College Of Agriculture,Nashik, Education Website, Dindori.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत, अखंड ह...
18/04/2026

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, कुशल प्रशासक, अफाट सामर्थ्यवान, उतुंग धाडस, शौर्य, पराक्रमी, कीर्तिवंत, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती (तिथीनुसार) निमित्त मराठा विद्या प्रसारक समाज संचालित KDSP कृषि महाविद्यालय, चाचडगाव येथे प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे नॅशनल हार्टीकल्स रिसर्च डेव्हलपमेंट फा...
18/04/2026

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (RAWE) शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचे नॅशनल हार्टीकल्स रिसर्च डेव्हलपमेंट फाउंडेशन (NHRDF) चितेगाव फाटा, नाशिक येथे सुरु असलेल्या ५ दिवसीय प्रशिक्षण शिबिरास दि. १८/०३/२०२६ रोजी केडीएसपी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, प्रा.श्वेता सातपुते, प्रा. श्वेता शेवाळे तसेच प्रा. अमोल डेर्ले उपास्थित होते. सदर प्रसंगी केंद्र प्रमुख डाॅ.सुजय पांडे, डाॅ.आर.सी.गुप्ता, श्री.सदाशिव खेलुकर, चेअरमन, चाटोरी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, ॲड.सुनंदा बर्वे,चाटोरी वि.का.सोसायटीचे संचालक श्री.नाना घोलप,सामाजिक कार्यकर्ता श्री.डि.के.बर्वे चितेगाव व इतर मान्यवर उपस्थित होते.

मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरामविप्र कृषी महाविद्यालयात जागति...
18/04/2026

मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरा
मविप्र कृषी महाविद्यालयात जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन उत्साहात साजरा

मविप्र समाज संचलित चाचडगांव येथील केडीएसपी कृषि महाविद्यालयात दरवर्षी प्रमाणे दि. २३ मार्च रोजी जागतिक वन दिन, जागतिक जल दिन व जागतिक हवामान दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मेरी येथील संशोधन सहाय्यक मा.श्री. कुणाल पाटील तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. बापूसाहेब भाकरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धीरज निकम यांनी केले.
सदर प्रसंगी द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी कु. संजना गडकर व कृषिविद्या विभागतील प्राध्यापक डॉ. विशाल गमे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. कुणाल पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधीर शिंदे यांनी केले व डॉ. विशाल गमे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

A career Guidance session on "Opportunities in Banking and Central Govt. Sector" was organized by KDSP Competitive Forum...
18/04/2026

A career Guidance session on "Opportunities in Banking and Central Govt. Sector" was organized by KDSP Competitive Forum under the guidance of Principal Dr. Bapusaheb Bhakare sir. RBI Assistant Mr. Sagar Mali delivered a fruitful session to students

केडीएसपी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष सगळे याला पाणी फाउंडेशन बैठकीसाठी निमंत्रण महाराष्ट्रातील जलसंधारण चळवळीला ...
18/04/2026

केडीएसपी कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आयुष सगळे याला पाणी फाउंडेशन बैठकीसाठी निमंत्रण

महाराष्ट्रातील जलसंधारण चळवळीला चालना देण्यासाठी Paani Foundation यांच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भारतभरातून ३० हून अधिक डिजिटल कंटेंट क्रिएटर्स सहभागी झाले होते.

या बैठकीसाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटिल कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी व या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रतिनिधी आयुष सगळे याला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्याने या उपक्रमात सहभागी होत महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.

बैठकीत Aamir Khan यांनी पाणी फाउंडेशनच्या १२ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ‘सत्यमेव जयते’ पासून सुरू झालेल्या या चळवळीने महाराष्ट्रातील जलसंधारण आणि शेती क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना (Agri Students) विशेष संदेश देताना त्यांनी सांगितले की, “शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आणि ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हीच शेतीत बदल घडवू शकता.”

तसेच बैठकीत जलसंधारण, शेतीतील सुधारणा, तसेच समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी डिजिटल माध्यमांची भूमिका यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्व क्रिएटर्सनी या चळवळीचा भाग बनून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

म. वि. प्र.  कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेटनाशिक (चा...
17/04/2026

म. वि. प्र. कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सह्याद्री फार्म्सला अभ्यास भेट

नाशिक (चाचडगाव): मविप्र समाजाच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगाव येथील चतुर्थ सत्रातील ८९ विद्यार्थ्यांनी मोहाडी येथील 'सह्याद्री फार्म्स'ला भेट देऊन कृषी-प्रक्रिया उद्योगाचा अभ्यास केला. 'अ‍ॅग्रो-एन्टरप्रेन्युअरशिप अँड बिझनेस मॅनेजमेंट' या विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत या औद्योगिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी सह्याद्री फार्म्समधील जागतिक दर्जाची यंत्रणा, अत्याधुनिक पॅक हाऊस, कोल्ड चेन मॅनेजमेंट आणि फळ प्रक्रिया युनिट्सची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकरी उत्पादक कंपनीच्या (FPC) माध्यमातून शेतकरी ते ग्राहक अशी साखळी कशी निर्माण केली जाते आणि निर्यातीसाठी कोणती मानके पाळली जातात, याचे तांत्रिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.

या अभ्यास भेटीचे यशस्वी नियोजन प्रा. ए. के. डेरले यांनी केले. त्यांना प्रा. एस. जे. कडलग, प्रा. वाय. एल. भागुरे पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

या भेटीमुळे कृषी पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यातील उद्योजकतेच्या संधी आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळाल्याचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांनी यावेळी नमूद केले.

मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्रूत  नाशिक शहर स्थित के टी एच एम   महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ११ वीत शिकणाऱ्या ...
17/04/2026

मराठा विद्या प्रसारक समाजाचे सर्वश्रूत नाशिक शहर स्थित के टी एच एम महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या ११ वीत शिकणाऱ्या ६० विध्यार्थी आणि विद्यार्थिनीची मराठा विद्या प्रसारक समाज संचालित आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय चाचडगाव येथे अभ्यास भेटीचे आयोजन करण्यात आले होते. हि भेट के टी एच एम महावियलचे प्राध्यापक रेडगावकर सर, कदम सर,अहिरे सर आणि भोसले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. या भेटी दरम्यान उपस्थित विध्यार्थ्यानी कृषि महाविद्यातल्यातील सर्व विभाग, विभागाच्या सर्व सुस्सज प्रयोगशाळा, प्रशस्त अध्यापन कक्ष, प्लेसमेंट विभाग, स्पर्धा परीक्षा मंच कक्ष, सर्व अद्यावत पुस्तकांनी समृद्ध ग्रंथालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र आणि मुले आणि मुली यांसाठी असलेल्या सुस्सज वसतिगृहांना भेट दिली. सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि प्राध्यापकांनी विध्यार्थ्यांना त्या विषयातील मिळणाऱ्या शेतीभिमुख वैज्ञानिक अद्ययावत विविध संकल्पनाची ओळख करून दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी उत्सहाने सहभाग घेऊन विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रात्यक्षिक आधारित कार्यानुभवाधिष्ठित टिश्यू कल्चर मोड्युल, नर्सरी मॅनेजमेंट मोड्युल, मधुमक्षिका पालन मोड्युल, माती व पाणी परीक्षण मोड्युल, जिवाणू खत निर्मिती मोड्युल यांची प्रत्यक्ष पाहणे व निरीक्षण केले आणि पशुसंवर्धन आणि दुग्धशात्र विभागातील प्रा कैलास भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली मोड्युल च्या विध्यार्थ्यानी तयार केलेल्या दर्जेदार लस्सी चा आस्वाद घेतला.
महाविद्यालयातील प्रशस्त अशा सेमिनार हॉल मध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांनी विध्यार्थ्यांना या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्यरत यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणादायी माहिती आणि वर्तमानात आणि भविष्यातील कृषि क्षेत्राचे महत्व विशद केले. तसेच प्रा. डॉ विशाल गमे यांनी कृषि महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणाऱ्या निकष आणि पात्रतांची सविस्तर माहिती विध्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी आवर्जून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील उपलब्ध करियर संधीचे मार्गदर्शन करण्यासाठी कृषिभूषण श्री भूषण निकम यांचे माहितीपूर्ण सत्र ठेवण्यात आले होते. कृषी महाविद्यालयची अभ्यास भेट सर्व विध्यार्थ्यानी आणि प्राध्यापकांनी अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी झाल्याचे संगितले.या प्रसंगी बोलताना के टी एच एम महाविद्यालयाचे प्राध्यापक रेडगावकर सर यांनी हे कृषि महाविद्यालय निसर्गरम्य वातावरणात आणि सर्व सोयींनी सुस्सज असून उत्तम प्राविण्यपुर्ण प्राध्यापकांद्वारे परिपूर्ण असल्याचे नमूद केले. तसेच सदर अभ्यास भेट आयोजनाबद्दल प्राचार्यांचे आभार व्यक्त केले. भेटीचे यशस्वीतेसाठी मराठा विद्या प्रसारक समाजचे शिक्षणाधिकारी डॉ अजित मोरे आणि प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्रा. पंकजसिंह चौहाण यांनी संपूर्ण अभ्यास भेटीचे आयोजनात समन्वयकाची भूमिका पार पाडली . कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन यांनी प्रा. डॉ. सुधीर शिंदे यानी केले.

Grateful and proud to share that MVP KDSP Agriculture college today successfully organized  a Campus Placement Drive und...
17/04/2026

Grateful and proud to share that MVP KDSP Agriculture college today successfully organized a Campus Placement Drive under the dynamic leadership of Principal Dr.Bapusaheb Bhakare, Dr. D. R. Nikam; Head, KDSP Campus Placement cell unit and a dedicated team of Prof. P. N. Patil, Dr. S. P. Deshmukh , Prof. U. B. Palghadmal.
With the participation of 5 reputed, emerging agriculture companies
1. Palvi Agro Chemicals and Fertilizers, Pune ;
2. Alligo Horizon Pvt. Ltd; Nashik ,
3. Mauli Organic Pvt.Ltd; Nashik,
4. Sanap HiTech Nursery; Nashik ,
5. Ecogenesis Lifesciences, Malegoan
The event created valuable opportunities for our students to step into their professional journey. It was truly inspiring to witness the enthusiasm, confidence, and talent of students throughout the process. More than 50 students of college including Alumni participated in this Placement drive. Finally the authorities of these reputed companies gave positive feedback and important suggestions for more improvement of students during the closing meeting with Principal and Placement unit team.
A heartfelt thanks to all participating companies, our dedicated team, and everyone who contributed to making this event a success.

16/04/2026

MVP KDSP College of Agriculture Campus Placement Drive

Address

Dindori

Alerts

Be the first to know and let us send you an email when MVP's Karmayogi Dulaji Sitaram Patil College Of Agriculture,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share