Sai Krupa Nursery

मिरची रोपे तयार साईकृपा नर्सरी पिंपरखेड ता दिंडोरी जि नाशिक  * संपर्क * मो:-7875999918/7972927569
10/12/2023

मिरची रोपे तयार साईकृपा नर्सरी पिंपरखेड ता दिंडोरी जि नाशिक
* संपर्क *
मो:-7875999918/7972927569

10/11/2023

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली हि निशा,
आनंदाने सजल्या दाही दिशा,
#धनत्रयदशीच्या या शुभ दिनी आपणास मनपूर्वक शुभेच्छा..

https://instagram.com/sai.krupanursery?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

साई कृपा नर्सरीS.K. Tray Industries.
01/10/2023

साई कृपा नर्सरी
S.K. Tray Industries.

28/09/2023

हि समिंदराची लाट
देवा पाहते तुमची वाट,
ढोल ताशाच्या या गजरात
देव निघाले थाटा माथाट..
#गणपती_बाप्पा_मोरया
#पुढच्या_वर्षी_लवकर_या..
🙏💐🙏

https://instagram.com/sai.krupanursery?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==

🌱🌶️ मिरची लागवड 🌶️🌱रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय...
23/09/2023

🌱🌶️ मिरची लागवड 🌶️🌱
रोजच्‍या आहारात मिरची ही अत्‍यावश्‍यक असते. बाजारात हिरव्‍या मिरचीस वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशातूनही चांगली मागणी आहे. महाराष्‍ट्र मिरचीची लागवड अंदाजे 1 लाख हेक्‍टरी क्षेत्रावर होते. महाराष्‍ट्रातील मिरचीखालील एकूण क्षेत्राापैकी 68 टक्‍के क्षेत्र नांदेड जळगांव धुळे सोलापूर कोल्‍हापूर नागपूर अमरावती चंद्रपूर उस्‍मानाबाद या जिल्‍हयात आहे. मिरचीमध्‍ये अ. व क. जीवनसत्‍व भरपूर प्रमाणात असल्‍याने मिरचीचा संतुलीत आहारात समावेश होतो. तिखटपणा व स्‍वाद यामुळे मिरची हेक्‍टरी महत्‍वाचे मसाल्‍याचे पिक आहे. मिरचीचा औषधी उपयोग सुध्‍दा होतो.

👉हवामान
उष्‍ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्‍पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्‍हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते. पावसाळात जास्‍त पाऊस व ढगाळ वातावरण असल्‍यास फूलांची गळ जास्‍त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्‍या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. आणि उत्‍पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्‍पन्‍नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

👉जमीन
पाण्‍याचा उत्‍महिन्‍यातम निचरा होणा-या ते मध्‍यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्‍या जमिनीत योग्‍य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्‍यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्‍याचा योग्‍य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये. पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्‍यम काळी आणि पाण्‍याचा उत्‍तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्‍हाळयात मध्‍यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्‍या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

👉हंगाम
खरीप पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात आणि उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

👉वाण
पुसा ज्‍वाला : ही जात हिरव्‍या मिरचीसाठी चांगली असून या जातीची झाडे बुटकी व भरपूर फांद्या असलेली असतात. फळे साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असून फळांवर आडव्‍या सुरकुत्‍या असतात. फळ वजनदार व खुप तिखट असते. पिकलेली फळे लाल रंगाची असतात.

पंत सी - १ : हिरव्‍या व लाल (वाळलेल्‍या ) मिरचीच्‍या उत्‍पादनाला ही जात चांगली आहे. या जातीची फळे उलटी असतात. मिरची पिकल्‍यावर फळांचा आकर्षक लाल रंग येतो. फळे 8 ते 10 सेमी लांब असून साल जाड असते. फळांतील बियांचे प्रमाण अधिक प्रमाणात असून बोकडया रोगास प्रतिकारक आहे.

संकेश्‍वरी 32 : या जातीची झाडे उंच असतात. मिरची 20 ते 25 सेमी लांब असून पातळ सालीची असतात. सालीवर सुरकुत्‍या असतात. वाळलेल्‍या मरचीचा रंग गर्द लाल असतो.

जी - 2, जी - 3, जी - 4, जी - 5 या जातीची झाडे बुटकी असतात. या मिरचीच्‍या अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या जाती आहेत. फळाची लांबी 5 ते 8 सेमी असून फळांना रंग गर्द तांबडा असतो.

मुसाळवाडी - या जातीची झाडे उंच वाढतात. खरीप हंगामासाठी ही जात चांगली असून बोकडया, भूरी आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पुसा सदाबहार - या जातीची झाडे उंच असून पाने इतर जातीपेक्षा रूंद असतात. पिकलेली मिरची तेजस्‍वी लाल रंगाची असते. या जाती हिरव्‍या मिरचीचे सरासरी उत्‍पादन साडेसात ते दहा टन व वाळलेल्‍या मिरचीचे दीड ते दोन टन उत्‍पादन मिळते. ही जात मावा कोळी या किडींना तसेच डायबॅक आाणि विषाणूंजन्‍य रोगांना प्रतिकारक आहे.

या शिवाय विद्यापीठांनी विकसीत केलेंडर अग्निरेखा, परभणी टॉल , फूले ज्‍योती, कोकणक्रांती, फूले मुक्‍ता फूले सुर्यमुखी, एनपी- 46 या सारख्‍या अधिक उत्‍पादन देणा-या जाती लागवडीयोग्‍य आहेत.

👉बियाणाचे प्रमाण
हेक्‍टरी 1 ते दीड किलो बियाणे वापरावे.

👉पूर्वमशागत
एप्रिल मे महिन्‍यात जमिन पुरेशी नांगरून वखरून तयार करावी. हेक्‍टरी 9 ते 10 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

👉लागवड
जिरायती पिकासाठी सपाट वाफयावर रोपे तयार करतात. तर बागायती पिकासाठी गादी वाफयावर रोपे तयार केले जातात. गादी वाफे तयार करण्‍यासाठी जमीन नांगरून आणि कुळवून भुसभुशीत करावी. जमिनीत दर हेक्‍टरी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. नंतर 25 फूट लांब 4 फूट रूंद 10 सेमी उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्‍येक गादी वाफयावर 30 किलो चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे

बी पेरण्‍यासाठी 8 ते 10 सेमी अंतरावर वाफयाच्‍या रूंदीला समांतर ओळी हतयार करून त्‍यानंतर या ओळीमध्‍ये दोन सेमी ओळीवर बियांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकून टाकावे. बियाण्‍यांची उगवण होईपर्यंत वाफयांना दररोज झारीने पाणी द्यावे. बी पेरल्‍यानंतर 30 ते 40 दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात.

उंच आणि पसरट वाढणा-या जातींची लागवड 60 बाय 60 सेमी अंतरावर आणि बुटक्‍या जातींची लागवड 60 बाय 45 सेमी अंतरावर करावी. कोरडवाहू मिरचीची लागवड 45 बाय 45 सेमी अंतरावर करावी. रोपांची सरीवरंबा पध्‍दतीवर लागवड करावी.

दर्जेदार रोप म्हणजे दमदार उत्पादन🔥💪
रोपची गुणवत्ता आणि दर्जा म्हणजे साई कृपा नर्सरी.
संपर्क
078759 99918

Sai Krupa Nursery चे S.K.Tray Industries.🔥
20/09/2023

Sai Krupa Nursery चे S.K.Tray Industries.🔥

आज पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्व शेतकरी  ग्राहक बांधव व सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा.!
19/09/2023

आज पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या सर्व शेतकरी ग्राहक बांधव व सर्व हितचिंतकांना हार्दिक शुभेच्छा.!

Address

Dindori
422202

Telephone

+917875999918

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Krupa Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sai Krupa Nursery:

Shortcuts

Share