Cambridge International School Dhule

Cambridge International  School Dhule Cambridge International School in the part of the Adarsh Group of Institutions. It is a co-education

24/12/2024
24/04/2024
आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न...धुळे दि. २...
26/01/2024

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न...

धुळे दि. २६

भारतीयांसाठी उत्साहाचा दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन. आपला भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. आजचा प्रजासत्ताक दिन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या भव्य प्रांगणात उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते, प्रमूख अतिथी नायब सूभेदार मा. श्री आर. सेंथील कुमार, माजी विद्यार्थी मेजर कमलेश भदाणे, मा. श्री भगवंत चव्हाण, प्राचार्य श्री राजेंद्र गवळी, श्री पी. बी. पाटील, श्री छोटू मासूळे, श्री झेड. एफ. पिंजारी, श्रीमती मिनाक्षी महाले, श्रीमती भारती पंजाबी, कार्यालयीन अधीक्षक मा. श्री आर. एन. पाटील, सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून प्रमूख अतिथींचे स्वागत केले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाॅलीटेक्नीक विभागाचे प्राचार्य श्री झेड. एफ. पिंजारी यांनी केले. त्यानंतर विविध विभागातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व मनोगते व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. जयेश गाळणकर व श्री ए. के. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

आदर्श शैक्षणिक संकुलात "भक्ती वंदना" कार्यक्रम संपन्न:-दि.२२/०१/२०२३ सोमवार रोजी  अयोध्येमधील भव्य, दिव्य असे श्रीराम मं...
23/01/2024

आदर्श शैक्षणिक संकुलात "भक्ती वंदना" कार्यक्रम संपन्न:-

दि.२२/०१/२०२३ सोमवार रोजी अयोध्येमधील भव्य, दिव्य असे श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त,
आदर्श शैक्षणिक संकुलामध्ये "भक्ती वंदना" कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे चिमुकले विद्यार्थी यांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांच्या आगमनाने झाली. या कार्यक्रमात आदर्श संस्थेचे अध्यक्ष मा.नानासाहेब महेंद्र विसपुते आणि सचिव मा.स्मिताजी विसपुते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ह.भ.पा.पुरोहित श्री.धनंजय देशपांडे हे वक्ते होते तसेच श्री. निलेश दिक्षित, श्री. जितेंद्र कुलकर्णी होते.
श्री.धनंजय देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. "Not failure but low aim is crime" असे प्रतिपादन त्यांनी केले. जीवनात कठिण परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना सामोरे जावे. या कार्यक्रमात प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन कमलताई डी. विसपूते प्राथमिक विद्यामंदीराचे मुख्याध्यापक श्री.छोटू मासूळे यांनी केले. तर प्रभावी सूत्रसंचालन कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षिका सौ. किरण देवरे यांनी केले.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सौ. कमलताई डी. विसपूते प्राथमिक विद्यामंदीर, बापूसाहेब डी. डी. विसपूते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आदर्श पाॅलीटेक्नीक, बापूसाहेब डी. डी. विसपूते शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, आदर्श माॅन्टेसरी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, केंद्रीय अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथील विद्यार्थी व स्टाफ सहभागी झाले. यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्रजी विसपूते व सचिव मा. स्मिताताई विसपूते यांचे मार्गदर्शन लाभले व प्राचार्य श्री राजेंद्र गवळी, श्री पी. बी. पाटील, श्री छोटू मासूळे, श्रीमती मिनाक्षी महाले, श्री झेड. एस. पिंजारी, श्री किशोर देसले, श्री शेखर भावसार व डाॅ. प्रकाश देवरे, कार्यालयीन अधीक्षक श्री आर. एन. पाटील व सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी यांनी मेहनत घेतली.

*स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरातील मंदिरांची करण्यात आली स्वच्छता : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा आदर्शवत उपक्रम* धुळे ...
21/01/2024

*स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी शहरातील मंदिरांची करण्यात आली स्वच्छता : आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचा आदर्शवत उपक्रम*

धुळे दि. २०

'स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर' आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. स्वच्छतेचे महत्व आपल्याला माहीत आहे. आणि हेच महत्व विद्यार्थ्यांना शालेय जीवनात पटवून दिले तर त्याचा दुरागामी परिणाम दिसून येतो. याच उद्देशाने आज आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विविध विभागातील विद्यार्थ्यांनी शहरातील धार्मिक मंदिरांची व परिसराची स्वच्छता केली. यावेळी एकवीरा देवी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर विद्यानगरी, दत्त मंदिर, शनी मंदिर गोंदूर रोड, संतोषी माता मंदीर, गजानन महाराज मंदिर, दत्त मंदिर तुळशीराम नगर, महादेव मंदिर, नकाणे रोड, साईबाबा मंदिर नकाणे रोड, खंडेराव मंदिर, प्रभाकर टाॅकी समोर, राम मंदीर नकाणे, साईबाबा मंदिर, साक्री रोड, गणपती मंदीर, पांजरापोळ, विठ्ठल मंदिर मालेगाव रोड, वार कुंडाणे गावातील मंदिर इ. मंदिरांची संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक, पाॅलीटेक्नीक, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, कैम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल, डेअरी डिप्लोमा काॅलेज, प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा व आदर्श माॅन्टेसरी व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या विभागातील विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव स्मिताताई विसपूते यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून मुख्याध्यापक श्री छोटू मासूळे, प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री झेड. एफ. पिंजारी, श्री शेखर भावसार, श्री किशोर देसले, श्री राजेंद्र गवळी, डाॅ. प्रकाश देवरे, श्रीमती डाॅ. मिनाक्षी महाले, श्रीमती भारती पंजाबी, कार्यालयीन अधीक्षक श्री आर. एन. पाटील सर व सर्व स्टाफ व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.

Address

Adarsh Educational Campus, Nakane Road, Deopur Dhule
Dhule
424002

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm

Telephone

+919356618089

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cambridge International School Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Cambridge International School Dhule:

Shortcuts

Share

Category