10/08/2022
#विसपूते_माध्यमिक_व_उच्च_माध्यमिक विद्यालयाचा
िरंगा' उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार...
धुळे दि. ८
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत 'घरोघरी तिरंगा' अर्थात 'हर घर तिरंगा' अभियानाचे सुक्ष्म नियोजन प्रभावीपणे करण्याचे शासनस्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. त्याउद्देशाने आज विद्यालयातील विद्यार्थ्यांना यानिमित्त केंद्र व राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून १३ ते १५ ऑगस्टदरम्यान 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविण्यात येत आहेत. अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकवायचा आहे. तो ध्वज गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावा. ध्वज फडकवितांना ध्वज संहितेचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. असे या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राचार्य श्री पी. बी. पाटील यांनी सांगीतले. तसेच यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहीती दिली. यावेळी प्राचार्य श्री पी. बी. पाटील, श्री एस. आर. पाटील, श्री डी. डी. पवार, श्री ए. के. पाटील, श्री एस. बी. भदाणे, श्री विजय देसले, श्रीमती अपर्णा पाटील, श्री महेंद्र बाविस्कर, श्री योगेंद्र पाटील, श्री महेश पाटील, श्री कुणाल साळूंके, श्रीमती राजश्री मासूळे, श्री तुषार कुलकर्णी, श्री अभिज्ञ पवार, श्री महेश पवार, श्री विलास भामरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या घडवून आणला त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. नानासाहेब महेंद्र विसपूते, सचिव मा. स्मिताताई विसपूते यांनी अभिनंदन व कौतूक केले.